पाथर्डीतील ‘तो’ नरभक्षक कोण ? बिबट्या की तरस ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-  जिल्ह्यातील विविध तालुक्यात बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याने अनेक ठिकाणी हौदोस घालताना दिसत आहे. परंतु पाथर्डी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने 15 दिवसांत तीन बालकांना बिबट्यानेे पालकांसमक्ष उचलून नेत ठार मारले. यामुळे ग्रामीण भागात मोठी दहशत पसरलीआहे.

त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी आता राज्यभरातील अनुभवी व विशेष कौशल्य नेमबाजांना पाथर्डी तालुक्यात पाचारण करण्यात आले आहे. वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी अहोरात्र बिबट्याचा शोध घेत आहेत. पण बिबट्या सापडतही नाही. बिबट्या नरभक्षक बनल्याचे लोकांचे म्हणणे आहे, तर अन्य प्राणी खाणारा बिबट्या नसून तरस असावा, असे वन विभागाच्या कर्मचार्‍यांचा तर्क आहे.

बिबट्या सोडून तरस अचानक सक्रिय झाल्याने लोकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, वन विभागाने डोंगराळ भागातील गावात राहणार्‍या ग्रामस्थांना बिबट्याला पिटाळण्यासाठी फटाक्यांचे वाटप केले आहे. तालुक्यातील डोंंगराळ, निर्जन ठिकाणं आणि गर्भगिरी डोंगराच्या भागातून बिबट्याचा माग काढण्यात येत असून वन विभागाचे तब्बल 80 अधिकारी-कर्मचार्‍यांसह बिबट्याला शोधण्यासाठी दोन ड्रोनसह पंचवीस ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले आहेत.

सिन्नर, जुन्नर, संगमनेर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि बीड येथील पथके दाखल झाले असून त्यांनी त्या नरभक्षक बिबट्याची शोध मोहिम हाती घेतली आहे. सर्च लाईट, नाईट मोड कॅमेरे, खोल दरीत उतरण्यासाठी अत्याधुनिक ट्युब संच, बेशुद्ध करण्यासाठीच्या बंदुका व औषधे रेस्क्यु व्हॅन्स,

अंगावर फेकण्यासाठीचे जाळे, लाठया काठ्या, मानेभोवतीचे सेफ्टी बेल्टी, वॉकी टॉकी सेट अशा सर्व प्रकारच्या अत्याधुनिक साधन सामुग्रीसह शहरातील हंडाळवाडीपासून वृद्धेश्वर घाट परिसर व गर्भगिरी डोंगर रांगाचा निर्जन प्रदेश या भागामध्ये सर्व कर्मचारी व अधिकारी विखुरले गेले आहेत. ऑपरेशन बिबट्या मोहिमेतील विस्कळीतपणा अजूनही न संपल्याने बिबट्या तीन दिवसात हाती लागला नाही. जिल्हा प्रशासनाकडूनही ताजी माहिती वारंवार विचारण्यात येत आहे.

तर वनविभागाच्या शोधमोहिमेवर अधिकारी लक्ष ठेवून आहेत.औरंगाबाद व पुणे येथील पथके रविवारी तपास कार्यात सहभागी होऊन विविध ठिकाणी लावण्यात येणार्‍या पिंजर्‍याची संख्या वाढवण्यात आली आहे. बीड व नगर जिल्हा वनविभागाच्या वतीने गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये विशेषता करंजी ते मोहटादेवी अशा पट्टयात संयुक्तपणे मोहीम राबवली जात आहे.

तीन ते चार दिवसांच्या अंतराने बिबट्या हल्ला करतो असे अनुभव पाहता डोंगराळ भागातील विविध गावांमध्ये लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. काल सायंकाळपर्यंत काहीही हाती लागले नसल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment