‘त्या’ फोडाफोडीमध्ये नेमका कुणाचा हात ? पार्थ पवार यांच्या पारनेर दौऱ्यामुळे…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  पारनेर नगरपंचायतीची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने असे केल्याने हा राज्यभर विषय गाजला.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही गोष्ट रुचली नव्हती. आमचे नगरसेवक परत पाठवा असा निरोपही उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांच्यापर्यंत पोहचवण्यात आला होता.

पक्ष प्रवेश करताना अजित पवार अनुकूल नसल्याचं आमदार निलेश लंके यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पण राष्ट्रवादीने प्रवेश न दिल्यास या पाच नगरसेवकांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही असं नगरसेवकांनी स्पष्ट केल्याने

त्यांना अखेर प्रवेश दिल्याचा निर्वाळा राष्ट्रवादी देत आहे. परंतु आता पारनेर मधल्या शिवसेना नगरसेवक फोडाफोडी मागे नेमकी कोणाची फूस? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

याचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पारनेर दौऱ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत.

पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची 26 जूनला पारनेरमध्ये जाऊन अचानक भेट घेतली. आमदार निलेश लंके यांनीच ट्विटरच्या माध्यमातून पार्थ यांच्या दौऱ्याची माहिती दिली.

इतकंच नाही तर पार्थ यांनी लंके यांच्या घरी कुटुंबीयांसोबत जेवण केले. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांशी गाठीभेटी केल्या आणि स्थानिक राजकीय परिस्थितीची माहिती घेतली.

त्यानंतर बरोबर एका आठवड्याने शिवसेनेचे नगर पंचायतीतील पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे पार्थ यांच्या पारनेर दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून फोडाफोडीच्या राजकारणाला नेमकी फूस कोणाची याबात तर्क वितर्क लढवले जात आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment