माझ्या घरासमोर येऊन शिवीगाळ का केली? असे विचारणाऱ्या तरुणासोबत घडले असे काही … !

Updated on -

Ahmednagar News : तुम्ही माझ्या घरासमोर येऊन शिवीगाळ का केली, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एक तरूणाला सात जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड, धारदार वस्तूने मारहाण करण्यात आली आहे.

यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथील शिवनेरी चौकात ही घटना घडली. तर महेश गोरख आठवले (वय ३८ रा. इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशनजवळ, नगर) असे या मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.

जखमी झालेल्या आठवले यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर मंगळवारी पहाटे त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय गजानन भंनगाडे, महेश अशोक वाघचौरे, वैभव म्हस्के, निसार गुलाब शेख (चौघे रा. बोहरी चाळ, रेल्वे स्टेशन, नगर), मनोज साठे ऊर्फ ठाकुर (रा. काटवन खंडोबा, नगर) व दोन अनोळखी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.

यातील संशयित आरोपी यांनी फिर्यादी महेश यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली होती. त्यामुळे माझ्या घरासमोर येत शिवीगाळ का केली. असा जाब विचारण्यासाठी महेश सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शिवनेरी चौकात गेले.

तुम्ही माझ्या घरासमोर येऊन शिवीगाळ का केली असे विचारताच विजय भंनगाडे याने महेशला शिवीगाळ करून धारदार वस्तूने महेश यांना मारहाण केली. मनोज साठे याने लोखंडी रॉडने डोक्यात मारून जखमी केले.

महेश वाघचौरे, वैभव म्हस्के, निसार शेख व दोन अनोळखी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe