नामदार प्राजक्त तनपुरे आता अहमदनगरकरांच्या सेवेत …

Published on -

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा व नगरविकास राज्य मंत्री तथा राहुरी मतदार संघाचे आमदार ना. प्राजक्त तनपुरे यांनी सावेडी, प्रेमदान चौक येथील बिझनेस सेंटर या इमारतीमध्ये सुरु केलेल्या जन संपर्क कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.

ना. तनपुरे यांनी फित कापून या संपर्क कार्यालयाचे लोकार्पण केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे, संदेश कार्ले, शरद झोडगे, शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.शशीकांत गाडे,

राष्ट्रवादीचे सरचिटणीस सोमनाथ धूत, रामदास ससे, अजय गुंड, स्वीय सहाय्यक राजेंद्र चोभे आदि उपस्थित होते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहराच्या ठिकाणी संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे.

कामाची मोठी जबाबदारी असली तरी सर्वसामान्य जनतेशी नाळ कायम जोडली राहणार आहे. नागरिकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहेत. तर कोरोनाच्या कठिण प्रसंगात देखील आपण सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी असल्याची भावना राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.

राज्यमंत्री झाल्यापासून जिल्ह्यातील विविध विकासकामांना मुर्त स्वरुप देण्यास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेतला आहे. विविध खात्याची जबाबदारी असल्याने कामाचा मोठा व्याप आहे. मतदार संघातील नागरिकांची गैरसोय होऊ नये व त्यांना ना.

तनपुरे यांच्याशी सहज संपर्क साधता यावा यासाठी शहराच्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय कार्यान्वीत करण्यात आला आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकाळी 10 ते 5 या वेळेत हे संपर्क कार्यालय सुरु राहणार असून, आठवड्यातून एक दिवस मंत्री महोदय स्वत: संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News