माजी महापौर संदीप कोतकर यांना अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात मिळणार का उमेदवारी? काय म्हणाले जिल्हाधिकारी? वाचा माहिती

नियमांच्या अधीन राहूनच ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात असते. यामध्ये उमेदवारी देताना ती कोणाला द्यावी किंवा एकूणच उमेदवाराची पार्श्वभूमी पाहूनच उमेदवारी देण्यासंदर्भात देखील काही नियम आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाच्या निवडणूक लढवण्यासंबंधी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत.

Ajay Patil
Published:
ahilyanagar news

Ahilyanagar News: कालच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आली व आता त्यानुसार 20 नोव्हेंबर 2024 ला मतदानाची प्रक्रिया पार पडेल व 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

आपल्याला माहित आहे की देशातील कुठल्याही निवडणुका असल्या तर त्या निवडणुका पार पडण्याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची असते.

निवडणुकांच्या संदर्भातली असलेली नियमावली आणि उमेदवारांच्या बाबतीत असलेले नियम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निश्चित केलेले आहेत.

त्या सगळ्या नियमांच्या अधीन राहूनच ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात असते. यामध्ये उमेदवारी देताना ती कोणाला द्यावी किंवा एकूणच उमेदवाराची पार्श्वभूमी पाहूनच उमेदवारी देण्यासंदर्भात देखील काही नियम आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाच्या निवडणूक लढवण्यासंबंधी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत.

या मुद्द्याला धरून जर आपण अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले माजी महापौर संदीप कोतकर यांचे उदाहरण जर घेतले तर त्यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे.

यानुसार जन्मठेप झालेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येते का? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे व हाच प्रश्न पत्रकारांच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले की,शिक्षेचे स्वरूप पाहून ऐनवेळी निर्णय होईल असे त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक आचारसंहितेबाबत पत्रकार परिषद झाली त्यावेळी पत्रकारांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे आता माजी महापौर संदीप कोतकर यांना उमेदवारी मिळणार की नाही? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 कोतकरांबाबत कागदपत्र पाहूनच घेतला जाईल निर्णय: जिल्हाधिकारी

माजी महापौर संदीप कोतकर हे अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांना खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. या अनुषंगाने जन्मठेप झालेल्या व्यक्तीला निवडणूक लढविता येते का? या पत्रकारांच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षेचे स्वरुप पाहून ऐनवेळी निर्णय होईल, असे स्पष्ट केले.

निवडणूक आचारसंहितेबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी जन्मठेप झालेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येते का? असा प्रश्न केला.

यावर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निवडणूक लढवण्यासंबंधी वेगवेगळ्या तरतूदी आहेत. यामध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा आहे? किती वर्षाची शिक्षा आहे? प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे का?

त्यामुळे असा अर्ज आला तर आयोगाच्या नियमाप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.पत्रकारांचा प्रश्न संदीप कोतकर यांच्याबाबत असल्याने ते उमेदवार झाले आणि त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरूनच सदरचा निर्णय होणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र यामुळे कोतकर यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe