नेवासा विधानसभा मतदारसंघ शिंदे सेनेच्या वाट्याला जाणार का भाजपच्या? अनिश्चिततेच्या वातावरणात मात्र इच्छुकांची धावपळ

राज्यामध्ये मात्र राजकीय वातावरण तापायला लागले असून  जागावाटपा संदर्भात मात्र चर्चेच्या फैरी झडू लागल्या आहेत. अजून देखील बऱ्याच मतदार संघाच्या बाबतीत महाविकास आघाडी असो की महायुती यांच्यामध्ये जागावाटप निश्चित झाले नसल्याकारणाने विद्यमान आमदारांसहित अनेक इच्छुकांचे जीव मात्र टांगणीला लागल्याचे चित्र आहे.

Ajay Patil
Published:
vidhansabha nivdnuk

Ahilyanagar News: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजले असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण राज्यांमध्ये एकाच वेळी या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबर 2024 ला निकाल जाहीर केले जाणार आहेत.

मात्र या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये मात्र राजकीय वातावरण तापायला लागले असून  जागावाटपा संदर्भात मात्र चर्चेच्या फैरी झडू लागल्या आहेत. अजून देखील बऱ्याच मतदार संघाच्या बाबतीत महाविकास आघाडी असो की महायुती यांच्यामध्ये जागावाटप निश्चित झाले नसल्याकारणाने विद्यमान आमदारांसहित अनेक इच्छुकांचे जीव मात्र टांगणीला लागल्याचे चित्र आहे.

अशीच काहीशी परिस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने बघितले तर मागच्या वेळी हा मतदारसंघ भाजपकडे होता.

परंतु या विधानसभा निवडणुकीत नेवासा विधानसभा मतदारसंघ शिंदे सेनेकडे जाईल अशा हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मात्र भाजपच्या माध्यमातून हा मतदार संघ भाजपकडेच राहावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

या सगळ्या प्रयत्नांमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जे काही इच्छुक आहेत त्यांची मात्र पळापळ होताना दिसून येत आहे. सध्या तरी महायुतीच्या जागा वाटपामध्ये नेवासा विधानसभा मतदारसंघाची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेल्याची चर्चा सुरू आहे.

 2019 मध्ये नेवासा मतदार संघाची स्थिती काय होती?

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे शंकरराव गडाख यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली होती.

तेव्हा शंकरराव गडाख यांनी तब्बल 30000 मतांनी बाळासाहेब मुरकुटे यांना पराभूत केले होते. त्यानंतर मात्र शंकरराव गडाख यांनी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता

व तेव्हापासून ते आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे. जरी ही जागा आता शिंदे सेनेला सुटली तरी शिंदे सेना विरुद्ध उद्धव ठाकरे सेना असा रंजक सामना या ठिकाणी पाहायला मिळू शकतो.

 भाजपकडून मात्र इच्छुकांची गर्दी

यावर्षी भाजपकडून बाळासाहेब मुरकुटे इच्छुक आहेत व त्यासोबतच उत्तर जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष विठ्ठल लंघे हे देखील नेवासा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

नेमके दोघांनी पक्षाकडे या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता मुरकुटे विधानसभा लढवणार की लंघे याबाबत मतदारसंघांमध्ये चर्चा असल्याचे दिसून येत आहे. या जागेबाबत भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अजून देखील चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

परंतु ही जागा शिंदे सेनेच्य वाटेला गेल्याची चर्चा देखील जोरात सुरू असल्याचे चित्र आहे.दुसरे म्हणजे ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेली तर एकेकाळचे बाळासाहेब मुरकुटे यांचे खंदे समर्थक समजले जाणारे उद्योजक प्रभाकर शिंदे हे उमेदवारीसाठी एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची देखील चर्चा आहे.

त्यामुळे ही जागा जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेली तर प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी मिळू शकते. जर असे झाले तर भाजपकडून इच्छुक असलेले मुरकुटे आणि विठ्ठल लंघे बंडखोरी करतात की शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe