शेवटच्या श्वासापर्यंत मराठ्यांशी गद्दारी करणार नाही : जरांगे पाटील

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे कल्याण व्हावे म्हणून कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, म्हणून आज पासून उपोषण सुरू करणार आहे.

मरेपर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार असून शेवटच्या श्वासापर्यंत मराठ्यांशी गद्दारी करणार नाही. असे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी श्रीगोंदा येथे बोलताना सांगितले.

लाखो मराठ्यांच्या पोरांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू दिसण्यासाठी टोकाची लढाई होणार असल्याने मराठ्यांनी या लढ्यात ताकतीने साथ दिली तर मराठ्यांच्या एकीचा धसका घेऊन सरकारने येत्या १५ तारखेला विशेष अधिवेशन बोलावत मराठा आरक्षणाचा आदेश पारित केला पाहिजे असे आवाहन केले.

श्रीगोंदा येथे श्रीगोंदा तालुका सकल मराठा समाज्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

मराठा समाजाने एकजूट दाखवत आंदोलने सुरू केल्याने त्यांना न्याय मिळायला लागला आहे. येणाऱ्या काळात मराठ्यांनी ही एकजूट कायम ठेवावी, मराठे न्यायासाठी एकत्र आले आहेत.

मराठयासमोर आरक्षणाबाबत अनेक प्रश्न, अडचणी आणि संकटे आली मात्र सगळ्यांचा कार्यक्रम शांततेत राबवत. करोड्यांच्या संख्येने मराठा एकत्र करून मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण घेतले आहे.

आत्तापर्यंत ६३ लाख मराठ्यांच्या नोंदी आढळून आल्या आहेत. मिळालेल्या नोंदीच्या आधारे दोन करोड मराठा समाज बांधवव ओबीसी आरक्षण मध्ये गेला असल्याने

७० वर्षानंतर आपण आपल्याच ताकतीवर मोठे झालो आहोत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाची मागणी नवी नाही.

मराठा आरक्षणाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारला धारेवर धरावे अशी आग्रही मागणी आपल्या आमदाराकडे करा.

ज्या आमदाराचे समाजावर प्रेम असेल तो सरकारवर दबाव आणून दोन दिवसात अधिवेशन बोलावून त्याचे कायद्यात रूपांतर करत त्याचा अहवाल न्यायालयात ठेवण्यास भाग पाडील तसेच जो आमदार मराठा आरक्षणाबाबत बाजूने बोलणार नाही

त्याला येणाऱ्या काळात मोठी शिक्षा भोगावी लागणार असल्याचा इशारा यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी देत मी असेन नसेन माहीत नाही आपले विचार आणि आपली जात फुटू देऊ नका असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe