अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर महानगरपालिकेच्या अमृत योजनेंतर्गत कामाचा शुभारंभ झाला असून, पाईपलाईन टाकण्यासाठी जागा उपलब्ध असतांना देखील या कामाचा ठेका घेणार्या ठेकेदाराने मात्र डांबरी रस्ताच खोदल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
निर्मलनगर जवळील पाउलबुधे कॉलेज ते नित्यसेवा चौकापर्यंत अमृत योजनेतंर्गत रस्याच्या कडेने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे
हे काम करतांना ठेकेदाराने मात्र जागा उपलब्ध असतांनाही चांगला डांबरी रस्ताच खोदला असल्याने महानगरपालिकेने या ठेकेदाराकडूनच या रस्त्यांचे डांबरीकरण करुन घेऊन दंड करुन बेकायदेशीरपणे रस्ता खोदल्याप्रकरणी कारवाई करण्याचे धाडस मनपा दाखवेल का? असा सवाल माजी नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार यांनी केला आहे.
याबाबत नगरसेविका रुपालीताई वारे यांनीही मनपा आयुक्तांना निवेदन देऊन चांगला डांबरी रस्ता खोदणार्या ठेकेदारवर मनपाने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करावी व नियमानुसार दंडात्मक रक्कम वसुल करावी, अशी मागणी केली आहे.
पाउलबुधे कॉलेज ते नित्यसेवा चौकापर्यंत या खोदाईच्या कामात निम्मा रस्ता खोदल्याने सर्वसामान्य नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
एखाद्या नागरिकाला नळ कनेक्शन घ्यायचे असले तरी रस्ता खोदण्यासाठी परवानगी घेऊन तो रस्ता दुरुस्त करावा लागतो. सर्वसामान्य नागरिकांकडून एक हजार रुपये घेऊन रस्ता खोदणार्यांकडून नुकसान भरपाई वसूल केली जाते.
मग या ठेकेदाराकडून देखील दंड वसूल करुन तो रस्ता डांबरीकरण करुन घ्यावा. ठेकेदारावर बेकायदेशीरपणे रस्ता खोदकामाबाबत कारवाई करावी, अशी मागणी श्री.वारे व श्री.पवार यांनी केली आहे.
मनपाच्या अधिकार्यांचे व ठेकेदाराचे हितसंबंध असल्यामुळेच मनपा कारवाई करण्यास टाळाटाळ करते, असा आरोप त्यांनी केला आहे.
याप्रकरणे श्री.वारे व श्री.पवार यांनी मनोज पारखे यांना वस्तुस्थिती दाखवून पाहणी केली. याबाबत मनपा काय निर्यण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved