एखाद्याचा जीव गेल्यावर रस्त्याचे डांबरीकरण करणार का?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- कान्हुरपठार नवलेवाडी अपुर्ण रस्त्यावर अपघांताची मालिका सुरु असून, एखाद्याचा जीव गेल्यावर डांबरीकरण करणार का? असा संतप्त सवाल या भागातील नागरिकअधिकाऱ्यांना करत आहेत.

याबाबत माहीती अशी की,कान्हुर पठार वरून नवलेवाडी मार्गे वडगाव दर्या ला जोडणाऱ्या रस्त्यावर खडी टाकुन दोन ते तीन महिने लोटले आहेत.

आता ती खडीही रस्त्यावरून निसटत चाली आहे, यामुळे दुचाकीस्वारांना ते चुकविताना अपघात होत आहेत. त्यामध्ये ते गंभीर जखमी होत आहे. दोन्ही बाजुच्या साईड पट्ट्या नसल्याने अपघातग्रस्त वाहन थेट चारीत जात आहेत.

रस्त्यावरील बारीक खडी बाजुला येऊन त्यावरून वाहने घसरत आहेत, याबाबत ग्रामपंचायत सदस्यांसह परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन दिले आहे.

यावर त्वरित डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. अन्यथा आपल्या कार्यालयात उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता डी.एम वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच हे काम पुर्ण होईल असल्याचे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment