उपवासाच्या अन्नातून महिलांना झाली विषबाधा; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-सण उत्सवाचा काळ सुरु झाला आहे. कालपासून सुरु झालेल्या नवरात्री निमित्त अनेक जण उपवासाचे व्रत करत असतात. खासकरून महिलांकडन उपवास केला जात असतो.

दरम्यान उपवासाचा पदार्थ खाल्याने राहुरी तालुक्यामधील आठ महिलांना विषबाधा झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. नवरात्र उत्सव सुरू असल्याने महिला भगिनी उपवास करताना शाबुदाना, भगर आहारात घेतात.

मात्र राहुरी फॅक्टरी वरील राहुरी तालुक्यातील एका दुकानातून परिसरातील गावातील महिलांनी भगर खरेदी केली होती. उपवासाची हि भगर खाल्यानंतर महिलांसह एक पुरुषाला त्रास जाणवू लागला,

त्यामुळे तत्काळ त्यांना लोणीच्या पीएमटीध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीमध्ये असे समजले की, या सर्वाना भगर खाल्याने विषबाधा झाली आहे.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने सखोल चौकशी करावी व संबंधित भेसळखोर दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नवरात्र उत्सवास कालपासून सुरुवात झाली आहे.

मात्र काही किराणा दुकानदारांनी ही संधी समजून भेसळयुक्त भगर, साबुदाणा विक्री सुरू केल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहे.

याचाच परिणाम म्हणजे राहुरी तालुक्यातील ७ ते ८ महिलांना अन्नातून विषबाधा झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment