निधी असूनही कामे रखडता कामा नये; आमदार राजळेंच्या प्रशासनाला सूचना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- पाथर्डी शहरातील रखडलेली व अर्धवट कामे तातडीने पूर्ण कराव्यात अश्या सूचना आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

तसेच यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या कि, पाथर्डी नगरपालिकेची सुरु असलेली विकास कामे दोन महिन्यात तातडीने पूर्ण करा. जॉंगिंगपार्क (कै.) माधवराव निऱ्हाळी सभागृह,

रामगिरीबाबा टेकडी सुशोभीकरण, रस्ते, गटारी व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही कामे प्राधान्याने मार्गी लागावीत. निधी असूनही कामे रखडता कामा नयेत.

जनतेला दिलेली विकासाची आश्वासने पूर्ण व्हावीत. ठेकेदारांनी कामे व पदाधिकाऱ्यांनी ती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा,

अशा सुचना आमदार मोनिका राजळे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. येथील व्हाईटहौस येथे पालिकेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

आमदार राजळे व पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जॉंगिंगपार्क (कै.) माधवराव निऱ्हाळी सभागृह, रामगिरीबाबा टेकडी सुशोभीकरण या कामाला भेटी देऊन पाहणी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment