अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर तीन अंकी रुग्णसंख्या वाढत आहेत. सोमवारी कोव्हिड नियंत्रण कक्षातील महिला कर्मचार्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह निघाला आहे.
तर रविवारी आयकर खात्याच्या ऑफिसमधील पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आलं होत. नगर शहरातील कोरोना नियंत्रण कक्ष जुन्या महापालिकेत असून तेथून कोरोना आकडेवारी अपडेट केली जाते.
आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचार्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता या महिलेच्या संपर्कातील कर्मचार्यांची टेस्टींग केली जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान रविवारी इन्कम टॅक्स ऑफिसमधील पाच जणांना कोरोनाची लागण झाली. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
नगर शहरातील करोनाग्रस्तांची नोंद घेण्यासाठी महापालिकेने जुन्या महापालिका कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वीत केला आहे. तेथेही आता करोना शिरला आहे.
जिह्यातील कोरोना बाधितांची संख्या सहा हजारांच्या पुढे गेली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही चार हजारावर गेली आहे.
एकूण बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे जवळपास ६४ टक्के आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे ७८ जणांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या तुलनेत सव्वा टक्का आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा