अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ९८६ झाली आहे. लवकरच रुग्णसंख्या हजारांचा टप्पा ओलांडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दररोज येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह अहवालांची संख्या पाहता कोरोना हजारीपार गेल्यास अवघड परिस्थिती उद्भवणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ६४९ झाली आहे.
शहरातील व जिल्ह्यातील परिस्थिती पहिली तर कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्यास रुग्णसंख्या नक्कीच हजारी पार केल्याशिवाय राहणार नाही हे वास्तव नाकाररून चालणार नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews