अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 842 झाली आहे.
लवकरच रुग्णसंख्या हजारांचा टप्पा ओलांडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दररोज येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह अहवालांची संख्या पाहता कोरोना हजारीपार गेल्यास अवघड परिस्थिती उद्भवणार आहे.
सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव मुकुंदनगर येथे झाला होता. प्रशासनाने योग्य उपाययोजना राबवून करोना शहरातून हद्दपार केला. जामखेडमध्येही त्याची पुनरावृत्ती झाली.
तेथील प्रशासनाने व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने करोना मुक्त झाले. परंतु आता नगर शहरात घुसलेला कोरोना आता संपण्याचे नाव घेईना.
सारसनगर, तोफखाना, सिद्धार्थनगर, पद्मानगर, माळीवाडा, गवळीवाडा, नालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले असून करोनाने ग्रामीण भागात ही पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे.
महापालिका क्षेत्रात आणखी दोन कन्टेन्मेंट झोन वाढले असून, बागरोजा हडको व बुरूडगावरोडवरील चाणक्य चौकाजवळील नंदनवन कॉलनी भागात मोठ्या प्रमाणावर करोनाचा संसर्ग होवून करोनाबाधित रुग्ण आढळून आले.
त्यामुळे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हे दोन्ही परिसर 24 जुलै पर्यंत कन्टेन्मेंट झोन, तर त्या भोवतालचे परिसर बफर झोन जाहीर केले आहेत.
शहरातील व जिल्ह्यातील परिस्थिती पहिली तर कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्यास रुग्णसंख्या नक्कीच हजारी पार केल्याशिवाय राहणार नाही हे वास्तव नाकाररून चालणार नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews