दोस्तीत कुस्ती..तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जगात मैत्रीचे नाते हे सर्वात वेगळे असते. एकीकडे मैत्रीसाठी जीव देणारे उदाहरणे तुम्ही आजवर ऐकले असतील,मात्र इकडे जरा वेगळेच घडले आहे.

एका मित्राने साथीदारांच्या साह्याने आपल्याच मित्राला लुटल्याची घटना जामखेड मध्ये घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील फिर्यादी सुभाष अर्जुन गोलेकर (वय ५० वर्षे) हा दि २२ रोजी गोलेकर वस्ती वरुन खर्डा गावात कामा निमित्त आला होता.

या वेळी आरोपी भगवान निवृत्ती जोरे हा त्याचा मित्र भेटला व त्याने फिर्यादीस दारु पिण्यासाठी येण्याचा अग्रह धरला. त्यामुळे फिर्यादी व आरोपी हे दोघे मित्र दुचाकीवरून एका ठिकाणी दारु पिण्यासाठी बसले.

यानंतर आरोपी याने बाजुला जाऊन कोणाला तरी अज्ञात इसमास फोन करुन त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्या ठिकाणी आलेल्या अज्ञात इसमाने हातातील कसल्या तरी टनक वस्तूने फिर्यादी सुभाष गोलेकर याच्या डोक्यावर मारहाण केली व गंभीर जखमी केले.

यानंतर आरोपी आसलेला त्याचा मित्र भगवान निवृत्ती जोरे याने त्याच्या छातीवर बसुन फिर्यादीची ८० हजार रुपयांची सोन्याची चैन हिसकावून घटनास्थळाहुन पळ काढला. फिर्यादी हा गंभीर जखमी झाल्याने दुसर्‍या दिवशी शुध्दीवर आल्यावर सर्व प्रकार पोलीसांना सांगितला.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी भगवान जोरे यास तातडीने ताब्यात घेतले असुन दोघा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी भगवान जोरे यास अटक केली असुन पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा हे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment