जिल्ह्यात यलो अलर्ट जारी; पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-पुढचे 48 ते 72 तासांत राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बदललेलं वातावऱण आणि अवकाळी पाऊस यामुळे फळबागा शेतमालाचं नुकसान होईल अशी चिंता बळीराजाला पडली आहे.

भारतीय हवामान विभागानं कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेल्या आंदाजानुसार 7 जानेवारी ते 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाण्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.

हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये दोन दिवस ‘यलो अलर्ट’ असल्याचा इशारा दिला आहे. उर्वरीत राज्यात काही भागांमध्ये रिमझित पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment