तुम्ही एकदा तरी करून दाखवा, विखेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News: ‘सर्वच गोष्टी केंद्राने करायच्या मग तुमचे योगदान कायॽ केंद्राने आतापर्यत दोनदा पेट्रोल आणि डिझेलवर कर कपात केली. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनीही तसे निर्णय घेऊन जनतेला दिलासा दिला. तुम्ही एकदा तरी करून दाखवा,’ असे थेट आवाहनच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.


संगमनेरमध्ये विखे पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करांमध्ये कपात केली. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील नऊ कोटी लाभार्थींना २०० रुपयांचे अनुदान देऊन पंतप्रधांनी दिलासा दिला.

केंद्राच्या निर्णयावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला काय दिले? हे एकदा तरी सांगावे.’राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर ते म्हणाले, ‘जो बूॅंदसे गई वो हौदसे नही आती.

आधी आपल्या पक्षाच्या बगलबच्चांकडून वक्तव्य करून घ्यायची आणि नंतर समाजाला गोंजारत बसायचे ही पवारांची जुनीच नीती आहे. त्यांच्या या भुलभूलैय्याला जनता भुलणार नाही,’
‘ओबीसी आरक्षणाठी नेमलेल्या समर्पित आयोगाचे राज्यात प्रत्येक महसूल विभागात सुरू असलेले दौरे म्हणजे केवळ फार्स आहे. दोन तासांच्या भेटीमधून आयोग नेमका कोणता डेटा गोळा करणारॽ,’ असेही विखे पाटील म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe