आज तुम्ही आमच्यावर कारवाई केली पण उद्या….? वाळूतस्करांची पोलिसांना धमकी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने ताब्यात घेत, ती पोलिस स्टेशनला घेवून येत असताना उद्या जामीनावर सुटल्यानंंतर आम्ही किंवा हस्तकांकरवी तुम्हाला ॲण्टीकरप्शनच्या केसमध्ये अडकवू अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील ढवळपुरी फाटा येथे अवैध वाळूवाहतूक करणारे विनाक्रमांकाचे दोन डंपर पोलिसांनी ताब्यात घेतले.

विनापरवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी रामराव इंद्रभान गाडेकर (वय ४० वर्षे रा.पानोली ता.पारनेर),स्वप्निल कांतिलाल गाजरे (वय ३३वर्षे रा.राळेगण सिध्दी), संतोष दिगंबर मंजुळकर (वय ३१ रा.मेहकर ता.लोणार जि.बुलढाण),

संदीप पोपट मेंगाळ (वय २४ वर्षे रा.काळेची ठाकरवाडी ता.पारनेर) या चौघांना ताब्यात घेवून पोलिस स्टेशनला घेवून येत असताना,तुम्ही आज आमच्या वाहनावर केस कराल

पण उद्या जामीनावर सुटल्यानंंतर आम्ही किंवा हस्तकांकरवी तुम्हाला ॲण्टीकरप्शनच्या केसमध्ये अडकवू अशी धमकी दिली. याप्रकरणी पोना.राहुल कारभारी शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक तपास सपोनि वाघ हे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe