Ahmednagar News : दिसायला डिक्टो मनोज जरांगे पाटील, पाहून तुम्हीही हैराण व्हाल ! जामखेड मध्ये बेमुदत उपोषण

Published on -

Ahmednagar News : मागील सहा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत.

त्यांना पाठिंबा म्हणून जरांगे पाटलांसारखे हुबेहूब दिसणारे भुतवडा येथील हनुमंत मोरे हे देखील गुरुवार (दि १५ फेब्रुवारी) पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेच कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी जरांगे पाटील १० फेब्रुवारी २०२४ पासून आमरण उपोषणास बसले आहेत.

सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पाठिंबा म्हणून आता मनोज जरांगे पाटलांसारखे दिसणारे हुबेहूब जामखेड तालुक्यातील भुतवडा गावचे तरुण हनुमंत मोरे हे देखील उपोषणाला बसले आहेत.

हनुमंत मोरे यांच्या उपोषणास जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आला आहे.

मोरे व मराठा क्रांती मार्चाच्या वतीने जामखेड चे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या सारखेच दिसत असल्याने मोरे यांना भेट देण्यासाठी व पहाण्यासाठी नागरीकांचा गर्दी होत आहे.

उपोषणकर्ते हनुमंत मोरे म्हणाले, मी जरांगे पाटील यांच्या सारखा दिसतो याचा मला अभिमान वाटतो. ते आंतरवाली सराटी येथे देखील गेले होते.

तसेच जामखेड येथुन मुंबई येथे निघालेल्या मोर्चात देखील ते त्या वेळी सहभागी झाले होते. तसेच मराठा समाजाच्या आसलेल्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी मी मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने होणार्‍या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी प्रा.मधुकर, राळेभात शहाजी, विकास राळेभात, मंगेश आजबे, संभाजी राळेभात, महादेव डोके, जयसिंग डोके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News