शिर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- शिर्डी शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जवळच राहणाऱ्या ओकार प्रकाश मल्हार वय २० याने २६जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान बळजबरी करत जवळच असलेल्या

रिकाम्या खोलीत नेऊन धमकी देत अत्याचार केला. अशी फिर्याद तिच्याआईने पोलिसात दिल्यामुळे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी ओंकार मल्हार यास तात्काळ अटक करण्यात आली.

राहाता येथील न्यायालयापुढे त्याला हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून

अधिक तपास उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे करीत आहे. या घटनेने शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment