अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : श्रीरामपूर मधील नांदूर भागात ॲपे रिक्षाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. संकेत दिनकर शिंदे (रा. नांदूर) असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक प्रल्हाद शिंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, ७ मे रोजी संकेत शिंदे हा रोडवर बाजूला उभा होता. त्यावेळी रात्री १० वाजत ॲपे रिक्षा नंबर एमएच १७ बीझेड ०७६४ जोरात आली.
तिने मोटारसायकल नंबर एमएच १७ डब्ल्यू ६४१ हिस जोराची धडक देऊन संकेत यालाही धडक दिली. या घटनेनंतर चालक रिक्षा सोडून पळून गेला.
उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. याबाबत ४ जून रोजी अशोक प्रल्हाद शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
‘