आपला परिसर हा संतांची पावन भूमी आहे. जीवन जगताना संतांचे आर्शिवाद खूप महत्वाचे असतात मंदिर बांधले गेलेच पाहीजेत मात्र देव -देवतांचे पावीर्त्य राखणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
आपण दिलेल्या मतदान रुपी प्रेमाची भरभराट त्याची उतराई म्हणून खारीचा वाटा उचलत भगवान विश्वकर्मां मंदिराचा सभा मंडप पूर्णत्वास नेऊ ग्रामपंचायत मार्फत ठराव घेऊन पूर्तता करावी राजळे शब्द देतात तो पूर्ण करतात.

असे मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले. खरवंडी कासार येथे आयोजित भगवान विश्वकर्मा जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
यावेळी संतोष महाराज गिते, जयभगवान महासंघाचे बाळासाहेब सानप, भाजपा महिला ता.अध्यक्षा काशिबाई गोल्हार, खरवंडी कासार सेवासोसायटीचे चेअरमन वामण किर्तणे, सुतार संघ ता.अध्यक्ष भागवत वाघमारे, बुधाजी ढाकणे, बाळासाहेब गोल्हार, दिलीप पवळे, रोषण बागवान, माणिक बटुळे, बाळासाहेब बटुळे, मिडसांगवीचे सरपंच दत्तात्रय पठाडे, महेश हजारे, सुरेश केळगंद्रे, भगवान गायकवाड, प्रदिप पाटिल, बापुराव अंदुरे, भाऊसाहेब सांगळे, रामभाऊ गर्जे आदि उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली विश्वकर्मा देवतांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणुकीनंतर महाप्रसादाने कार्यंक्रमाची सांगता झाल. प्रास्ताविक आजिनाथ भालेकर, आभार बाळासाहेब वाघमारे यांनी मानले.