अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- लग्नाचे आमिष दाखवून रस्तापुर ता.नेवासा येथील शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका युवकास शनिशिंगणापुर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की,मागील आठवड्यात रस्तापुर ता.नेवासा शिवारातील अशोक रायभान उकिर्डे यांच्या मालकीच्या ऊसाच्या शेतातील
आंब्याच्या झाडाजवळ पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हा प्रकार कुणास सांगितल्यास तुला व तुझ्या आई-वडिलांना जीवे मारुन टाकेल अशी धमकी दिली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून किशोर रमेश काकडे यास अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे पुढील तपास करत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com