तरुणांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे आले पाहिजे – विवेक कोल्हे

Published on -

आपल्याकडे उद्योग क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. उपलब्ध संधीचा लाभ घेत ग्रामीण भागातील तरुणांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन कॉलेजच्या विकास समितीचे युवा सदस्य सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.

येथील सद्गुरु गंगागीर कॉलेज मध्ये यशस्वी उद्योजक कसे व्हावे, या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आपण सदैव मदत करण्यासाठी आपल्या सारख्या नवउद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

श्री सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात बीबीए आणि आयक्यूएसी विभागाच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास मंचच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी विवेक कोल्हे म्हणाले की, स्वप्न पाहण्यासाठी कुठलाही टॅक्स लागत नाही. मात्र मेहनत घेऊन जिद्द कष्ट प्रामाणिकपणा आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवल्यास यश तुमचेच आहे.

जीवनात अभ्यासासोबतच विद्याथ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखून आवडीचे क्षेत्र निवडले तर त्यांना पुढील कालावधीत ध्येय साध्य होतात. सैनिक सीमेवर राहून देशसेवा करतात, तद्वत तुम्ही आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले. तर ते देशसेवा केल्यासारखेच आहे, असा मूलमंत्र त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी प्राचार्य डॉ. आर. आर. सानप, प्रा. एन.बी. साळवे, प्रा. एम.बी. गवारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. विवेक कोल्हे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरण मिळेल, असे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी सांगितले.

या चर्चासत्रात अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे आपले विचार मांडले. प्रा. एन.बी. साळवे यांनी प्रास्ताविक केले. तर प्राचार्य आर. आर. सानप यांनी स्वागत केले. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News