नोकरीसाठी तरुणांचे तहसिलसमोर उपोषण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा औद्योगिक वसाहतीतील मायडिया व कॅरिअर कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्त व स्थानिक तरूणांना नोकऱ्या,

तसेच विविध कामांचा ठेका देण्याच्या मागणासाठी वाघुुंडे येथील चार तरूणांनी सोमवारी सकाळी उपोषण सुरू केले. दुपारी तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

मायडीया, कॅरिअरचे प्रोजेक्ट हेड यादव उपस्थित होते. कंपनीत ८० टक्के स्थानिक तरूणांना संधी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. स्थानिकांना ठेका देण्याचे काहीच कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनामुळे आधीच अनेकांच्या नौकऱ्यांवर गदा आली आहे, अनेकांचा रोजगार गेला असल्याने आता पुन्हा नव्याने रोजगार मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment