अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- नगर – देशातील पहिला डायलिसिस क्लब आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये होतोय ही अतिशय अभिमानाची बाब आहे.
अतिशय सुंदर अभिनव संकल्पना असून देशातील रुग्णांसाठी हा क्लब दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच या क्लबला आमचे संपूर्ण सहकारी राहील, अशी ग्वाही डॉ. प्रकाश कांकरिया यांनी दिली.

पत्रकार सुधीर मेहता यांच्या संकल्पनेतून डायलिसिस रुग्णांसाठी आचार्य श्री आनंदऋषीजी आणि आचार्य श्री दर्शनवल्लभजी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या श्री आनंद दर्शन डायलिसिस क्लब चे उद्घाटन विश्वस्त बाबूशेठ लोढा यांच्या हस्ते आणि सर्व विश्वस्तांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाले
हॉस्पिटलच्या झेंडावंदन राष्ट्रीय पत्रकार महासंघ नवीदिल्लीचे महासचिव नगर पर्यटन महोत्सवचे अध्यक्ष सुधीर मेहता यांच्या हस्ते झाले. परमजीत साभा वाल प्रमुख अतिथी होते. जैन सोशल फेडरेशनचे सतीश लोढा,
माणिकचंद कटारिया निखिलेंद्र लोढा, डॉ. वसंत कटारिया, सतीश मेहेर, अजित पारख, सचिन डुंंगरवाल, सुरेश कटारिया, अमोल कटारिया,
दिलीप गुगळे, डॉ. गोविंद कासट, डॉ.सुधा कांकरिया, डॉ.वैभवी वंजारे, आनंदऋषीजी ब्लड बँकेचे गणेश कांकरिया, अशोक कोठारी, सरोज कटारिया, श्रद्धा परदेशी,
कल्पना मेहता यांचेसह मान्यवर उपस्थित होते परमजीत सभरवल, दिपक धेंड, अजिंक्य देशमुख, कल्पना मेहता आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved