‘या’ तालुक्यात अतिवृष्टी: वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला; विद्यार्थ्यांसह नागरिकांचा धोकादायक प्रवास

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील साकत परिसरात शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी (दि. २४) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले होते. यामुळे अनेक वाड्या व वस्त्यांचा संपर्क तुटला, तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त होऊन पिके पाण्याखाली गेली आहेत. या पावसामुळे साकत कोल्हेवाडी कडभनवाडी जोडणारा लेंडी नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला होता. यामुळे … Read more

पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा ‘मुळा’चे दरवाजे उघडले; इतक्या हजार क्युसेकने विसर्ग सुरु

Ahmednagar News : शुक्रवारी सायंकाळी राहुरीत सुरू झालेला धुव्वाधार पाऊस शनिवारी मध्यरात्री थांबला. दरम्यान, शनिवारी दुपारनंतर पुन्हा पावसाच्या आगमनाने जनजीवन विस्कळीत झाले. शुक्रवार सायंकाळ ते मध्यरात्री पर्यंतच्या पावसाची गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत विक्रमी नोंद झाली. मुळानगर १२८ मिलिमीटर, राहुरी १०० मिलिमीटर, कोतूळ २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धुव्वाधार पावसामुळे खरीप हंगामातील कपाशी व सोयाबीन पिकात … Read more

राज्यात अनागोंदी वाढली ; सरकारने तातडीने पायउतार व्हावे किंवा केंद्राने राष्ट्रपती राजवट लागू करावी..!

Ahmednagar News : राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली असून अनागोंदी वाढली आहे. महिला व बालिका असुरक्षित असल्याने या सरकारने तातडीने सत्तेवरून पायउतार व्हावे किंवा केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती, काळे झेंडे तसेच तोंडाला काळा मास्क लावून … Read more

सीना नदीला पूर; कल्याण महामार्ग वाहतुकीसाठी बंद, मनपाची ‘ती’ व्यवस्था तातडीने सुरू

WATER

Ahmednagar News : सर्वदूर पावसाने तालुक्यातील शेतकरी सुखावला असला, तरी काढणीला आलेल्या मुगाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील बहुतांश नद्यांतून पाणी वाहिले असून, मोठ्या तलावांत पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे.अनेक छोटे तलाव, बंधारे तुटुंब भरले आहेत. नगरला देखील मुसळधार पाऊस झाल्यामुळे सीना नदीला पहिला पूर आला. कल्याण रोडवरील अमरधामजवळील पुल या पाण्याखाली … Read more

पावसाचे जोर’धार’ ! अहमदनगरमधील चार तालुक्यांसह ‘या’ मंडळांत अतिवृष्टी, ‘या’ महामार्गावरील पूलही पाण्याखाली

rain

Ahmednagar News : शहर परिसराला शुक्रवारी (दि. २३) रात्री मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला होता, कल्याण रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने पहाटेपासून या रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. पावसामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. पावसाचे हे पाणी नागरिकांच्या घरातही घुसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. … Read more

अहमदनगरला यथेच्छ झोडपले ! १ हजार १७० हेक्टरचे नुकसान, अनेक घरांची पडझड, पहा सविस्तर..

pavus

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाने चांगेलच मनावर घेतले आहे. नगर तालुका, संगमनेर, नेवासे, श्रीगोंदे, अकोले तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. अवघ्या मागील तीन दिवसांच्या पावसाने हजारो हेक्टरचे नुकसान झाले आहे. रविवार ते मंगळवार या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील १ हजार १७० हेक्टर क्षेत्रावरील कापूस, मूग, बाजरी या खरीप पिकांचे तसेच उसाचे … Read more

अहमदनगरमधील ‘या’ कारखान्यांना धक्का ! अजित पवार, फडणवीसांसोबत असणाऱ्या नेत्यांना फुटला घाम

politics

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. मात्र याच दरम्यान राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. कारण विधासभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांच्या १७ साखर कारखान्यांना दिलेल्या कर्ज वितरणाचा निर्णय वादात सापडला आहे. यात नगर जिल्ह्यातील अनेक कारखानदारांचा समावेश असल्याने या कारखान्यांची व या कारखान्यांवर असलेल्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. सत्ताधाऱ्यांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ शाळा, अंगणवाडींना मिळणार नवीन वर्गखोल्या

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात शाळा, वर्गखोल्यांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. मागील काही दिवसांत अनेक वर्गखोल्यांचे नूतनीकरण देखील झाले आहे. दरम्यान आता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी २५ शाळा खोल्या, सहा अंगणवाडी खोल्यांना जिल्हा स्थानिक विकास योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी पावले उचलली आहेत. पाचपुते यांनी मतदारसंघातील … Read more

कांद्याने शेतकरी मालामाल ! ५० रुपये किलो होणार

onion

Ahmednagar News : कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून चांगलेच तेजीत आले आहेत. २० रुपये किलोपासून तरआता थेट ४५ रुपयांवर कांदा आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. कांद्याचे भाव ५००० रुपयये प्रतिक्विंटल वर जाऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे यंदा कांद्याने शेतकरी मालामाल होतील असे म्हटले जात आहे. अहमदनगरमधील बाजार समित्यांत कांद्याचे दर … Read more

कुकडीचे पाणी येणार, ‘सीना’ क्षेत्रात ‘इतकी’ आवर्तने मिळणार, शेतकऱ्यांना खुशखबर

sine avrtan

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन जोरदार झाले त्यानंतर आतापर्यंत पाऊस देखील समाधानकारक पडत गेला. परंतु जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस चांगला झाला असे नाही. काही भागात अत्यल्प झाल्याने जिल्ह्यातील काही धरणांमध्येच बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. मिरजगावसह परिसरातील अनेक गावांसाठी वरदान असणारे सीना धरण अद्याप कोरडेच आहे. सीना धरण पट्टयात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. … Read more

अहमदनगरमध्ये कोठे मुसळधार तर कोठे ढगफुटीसदृश, सीनालाही पूर

pavus

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात २२ व २३ ऑगस्टला जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी रात्रभर पाऊस सुरु होता. अहमदनगरमध्ये कोठे मुसळधार तर कोठे ढगफुटीसदृश पाऊस झाला. नगर नगर शहररासह ग्रामीण भागात पाऊसाने चांगलेच झोडपले. जेऊर, पिंपळगाव माळवी, डोंगरगण, नेप्ती, एमआयडीसी आदी भाग पावसाने चांगलाच झोडपला. त्यामुळे सीना नदीला दुथडी भरून पाणी वाहत होते. कल्याण-नगर मार्गावरील … Read more

अहमदनगरमध्ये रात्रीस खेळ चाले, गाव भीतीने कापे.. आमदारही टेन्शनमध्ये

rajale

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीस ड्रोन घिरट्या घालतायेत. मागील दोन दिवसांपासून शेवगाव व पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये रात्रीच्या वेळी आकाशात काही उंचीवर चमकणाऱ्या ड्रोनच्या पिरट्यांनी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ड्रोनच्या घिरट्यांनी अनेक अफवांचे पेव फुटल्याने अनेकांनी रात्र जागून काढली. याबाबत मात्र प्रशासन अनभिज्ञ आहे. मागील … Read more

अहमदनगरमध्ये मागील १८० दिवसात ११३ मुली वासनेच्या बळी, पहा आकडेवारी

muli

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार, महिला बेपत्ता होणे आदी घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बदलापूर घटनेने सध्या महाराष्ट्र पेटलाय. इतकेच नव्हे तर बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिल्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने जर लाखो मुली आणि महिला बेपत्ता … Read more

आणलेला सिलेंडर लीक निघाला, शेजारीच चूल सुरु होती.. दोन कुटुंब, ९ लोंकाना होरपळवणारी घटना ‘अशी’ घडली

apghat

Ahmednagar News : घरगुती गॅस गळती होऊन उडालेल्या भडक्यात नऊ जणांसह चार जनावरे जखमी झाले. ही घटना काल शुक्रवारी (दि. २३) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यात जीवित हानी झाली नसली, तरी वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ही घटना राहाता तालुक्यातील एकरुखे येथे घडली. अधिक माहिती अशी, की एकरुखे गावातील गणेशनगर रोडवर गणेश … Read more

अहमदनगरमधील ‘या’ शाळेची स्कूलबस घसरली, मोठी दुर्घटना

apghat

Ahmednagar News : एका इंग्रजी शाळेतील बस रस्त्याशेजारी असणाऱ्या खड्ड्यात घसरल्याची दुर्घटना घडली आहे. शाळेकडून घरी जात असताना ही घटना घडली असून यात जवळपास २० विद्यार्थी होते अशी माहिती समजली आहे. घराकडे जात असतानाच ही दुर्घटना घडली. यामधील विद्यार्थ्यांना आपत्कालीन मार्गातून बाहेर काढण्यात आले आहे. अधिक माहिती अशी : श्रीरामपूर तालुक्यातील डहाणूकर इंग्रजी शाळेतील बस … Read more

अहमदनगरमधील ‘या’ शाळेची स्कूलबस घसरली, मोठी दुर्घटना

Ahmednagar News : एका इंग्रजी शाळेतील बस रस्त्याशेजारी असणाऱ्या खड्ड्यात घसरल्याची दुर्घटना घडली आहे. शाळेकडून घरी जात असताना ही घटना घडली असून यात जवळपास २० विद्यार्थी होते अशी माहिती समजली आहे. घराकडे जात असतानाच ही दुर्घटना घडली. यामधील विद्यार्थ्यांना आपत्कालीन मार्गातून बाहेर काढण्यात आले आहे. अधिक माहिती अशी : श्रीरामपूर तालुक्यातील डहाणूकर इंग्रजी शाळेतील बस … Read more

महाराष्ट्रातील भाविकांची बस नेपाळमध्ये बुडाली ! २७ मृत्यू, अनेक जखमी

apghat

महाराष्ट्रातून नेपाळमध्ये गेलेल्या भाविकांची बस शुक्रवारी महामार्गावरून घसरून १५० मीटर खाली दुथडी भरून वाहणाऱ्या मार्त्यांगडी नदीत कोसळली. या भीषण अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला असून, १६ जण जखमी आहेत. यामध्ये जळगाव मधील भाविकांचा समावेश आहे. दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतदेह त्यांच्या गावी आणण्यासाठी राज्य सरकार नेपाळ सरकार … Read more

चारित्र्यावर संशय..पत्नीचा सपासप गळा चिरला, स्वतः पोलीस ठाण्यात गेला

murder

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दिसतात. आता महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. पतीनेच पत्नीचा गळा चिरला व हत्या केली. चारित्र्यावर संशय असल्याच्या कारणातून ही हत्या झाली. धक्कादायक म्हणजे ही हत्या करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. ही घटना शेवगाव शहरात ब्राम्हण गल्लीत घडली. या घटनेनंतर … Read more