अहमदनगरला यथेच्छ झोडपले ! १ हजार १७० हेक्टरचे नुकसान, अनेक घरांची पडझड, पहा सविस्तर..

अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाने चांगेलच मनावर घेतले आहे. नगर तालुका, संगमनेर, नेवासे, श्रीगोंदे, अकोले तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे.

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाने चांगेलच मनावर घेतले आहे. नगर तालुका, संगमनेर, नेवासे, श्रीगोंदे, अकोले तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे.

अवघ्या मागील तीन दिवसांच्या पावसाने हजारो हेक्टरचे नुकसान झाले आहे. रविवार ते मंगळवार या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील १ हजार १७० हेक्टर क्षेत्रावरील कापूस, मूग, बाजरी या खरीप पिकांचे तसेच उसाचे नुकसान झाले आहे.

यामध्ये सर्वाधिक श्रीगोंदा तालुक्यातील १ हजार १३५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या पावसाने नऊ घरांची पडझड झाली आहे. रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला.

नगर शहररासह ग्रामीण भागात पाऊसाने चांगलेच झोडपले. जेऊर, पिंपळगाव माळवी, डोंगरगण, नेप्ती, एमआयडीसी आदी भाग पावसाने चांगलाच झोडपला. तसेच श्रीगोंदे, अकोले, संगमनेर, नेवासे, शेवगाव पाथर्डी आदी भागातही जोरदार पाऊस झाला.

या पावसाचा फटका खरीप पिकांना बसला आहे. सध्या कापूस, बाजरी ही खरीप पिके वाढीस लागली आहेत. पावसाने बहुतांश ठिकाणी या पिकांचे नुकसान झाले आहे. मुगाची काढणी सुरु आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

नुकसान झालेल्या पिकांची प्राथमिक पाहाणी केली असता श्रीगोंदा तालुक्यातील १ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

पावसाने श्रीगोंदा तालुक्यातील एका घराची पडझड झाल्याचा अहवाल श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई शाखेला पाठविला आहे.

अनेक तालुक्यात पडझड
नगर तालुक्यातही तीन दिवसांच्या पावसाने शेतपिकांचे नुकसान केले आहे. नगर तालुक्यातील ३५ हेक्टर क्षेत्रावरील कापूस, बाजरी आणि मुग पिकांचे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे नगर तालुक्यातील तीन घरांचे अंशतः पडझड झाली आहे. राहुरी तालुक्यातील दोन, अकोले, नेवासा, संगमनेर, श्रीगोंदा या तालुक्यांतील प्रत्येकी एका घरांची पडझड झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe