Mahindra Thar, Bolero, बुलेट ते सोन्याच्या अंगठ्यां ! महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेत्यांना काय काय मिळणार ?

Ahilyanagar News : संपूर्ण राज्याच्या कुस्तीप्रेमींच्या नजरा लागलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा भव्य शुभारंभ आजपासून अहिल्यानगरच्या वाडिया पार्क मैदानात झाला आहे. कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडानगरीत रंगणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी राज्यभरातील 42 संघांचे 860 नामवंत मल्ल सहभागी झाले आहेत. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा विशेष चर्चेत आहे, ती प्रचंड आकर्षक बक्षिसांमुळे ! पहिल्या तीन मल्लांना बक्षिसे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल ३३,५३१ रेशन कार्ड झाले बंद ! लवकर करा हे काम नाही तर तुमचे ही होईल बंद…

Ahilyanagar Ration Card : अहिल्यानगर जिल्ह्यातील ३३,५३१ शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. आर्थिक उत्पन्न अधिक असूनही कमी उत्पन्न गटातील शिधापत्रिका घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या तसेच स्थलांतरित कुटुंबांवर ही कारवाई करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंना योग्यरित्या मिळावा यासाठी केंद्र सरकारने ई-शिधापत्रिका प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिधापत्रिकांचे उत्पन्न गटानुसार … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! 61 हजार कुटुंबांना दीड लाख रुपये मिळणार…

Ahilyanagar News : नगर जिल्ह्यात हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान आवास योजना टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यासाठी 61,831 नवीन घरकुलांचे उद्दीष्ट मंजूर करण्यात आले आहे. ग्रामीण विकास यंत्रणेने प्रत्येक तालुक्याला उद्दिष्ट वाटप केले असून, लवकरच गावोगावी घरकुल बांधकामांना सुरुवात होणार आहे. 61,831 घरकुले मंजूर पंतप्रधान आवास योजना टप्पा 2 अंतर्गत … Read more

अमृतवाहिनीत रविवारी अमाल मलिकचा लाईव्ह कॉन्सर्ट ! मेधा महोत्सवात शरद तांदळे यांचे व्याख्यान

माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता पूर्ण शिक्षणासह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या मेधा महोत्सव 2025 मध्ये रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सायं.6 वा. बॉलीवूडचा आघाडीचा गायक व संगीतकार अमाल मलिक यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार असून दुपारी लेखक व व्याख्याते शरद तांदळे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त … Read more

संगमनेर तालुक्यातील प्रश्नांबाबत आ. सत्यजित तांबे पोहोचले थेट मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे !

Sangamner News : काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या. संगमनेर तालुक्यातील सर्व रस्त्यांकरता माजीमंत्री थोरात यांनी निधी मिळवला आहे. मात्र राजकीय हेतू ठेवून सत्ताधाऱ्यांनी मागील तीन वर्षापासून सर्व कामे रखडून ठेवल्याने या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीसह रखडलेल्या सर्व प्रकल्पांना गती द्यावी अशी मागणी आमदार … Read more

महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थाटच न्यारा असा आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचा नजारा

Ahilyanagar News : आजपासून अहिल्यानगर शहरात सुरू होणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी वाडियापार्क मैदानावर उभारण्यात आलेली स्व.बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी सजली आहे. मैदानावर राजवाड्याच्या प्रतिकृतीचे आकर्षक व भव्य प्रवेशद्वार उभारले आहे. आतमध्ये किल्ल्याच्या बुरुजाच्या प्रतिकृतीचे भव्य व्यासपीठ उभारले आहे. त्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पूर्णाकृती प्रतिमा तसेच जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

अहिल्यानगर शिवसेनेत राजकीय भूकंप ! उरलेसुरले प्रमुख पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत दाखल

Ahilyanagar Shivsena : अहिल्यानगरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे, कारण एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या ठिकाणचे बहुतांश प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी नगरमध्ये या पदाधिकाऱ्यांना पक्षात ठेवण्यासाठी चर्चा केली. मात्र, त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. आता हे पदाधिकारी … Read more

संगमनेर तालुक्यात संतापाची लाट ! माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले तालुक्याची मोडतोड…

Sangamner News : संगमनेरचा विकास रोखू पाहणाऱ्यांनी संगमनेर चा विकास व एकजूट मोडण्यासाठी पूर्णपणे राजकीय उद्देश ठेवून प्रशासकीय सोयीच्या नावाखाली संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . प्रस्तावित विभाजन हे राजकीय हेतू ठेवून करण्याचा कुटील डाव सत्ताधाऱ्यांचा असून संगमनेर तालुक्याची मोडतोड कदापिही सहन करणार नाही असा गर्भित इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा … Read more

पुणे-नाशिक महामार्गावरील दुर्दैवी अपघात ! पती-पत्नीचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर माळवाडी शिवारात झालेल्या कार अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला. हा हृदयद्रावक अपघात सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. पुण्यातील गुरुवार पेठेतील दरेकर वाड्यातील सचिन वसंतराव दरेकर (वय 57), त्यांची पत्नी रमा सचिन दरेकर (वय … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात गुलीयन बॅरी सिंड्रोमचा एकही रुग्ण नाही !

Ahilyanagar News : गुलीयन बॅरी सिंड्रोम नावाच्या आजाराने पुण्यात अनेक बाधित झाले आहेत. अहिल्यानगर शहरात एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, अहिल्यानगरहून पुण्याला येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने या आजाराबाबत दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. रुग्णालयात अशा प्रकारचे संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित आरोग्य विभागास कळवावे, … Read more

अहिल्यानगरच जिल्ह्याचं विभाजन होणार का नाही ? समोर आली महत्वाची अपडेट

Ahilyanagar News : महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा गेल्या ४० वर्षांपासून राजकीय आणि प्रशासकीय चर्चांचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र, राज्याच्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याच्या निर्णयाने विभाजनाच्या चर्चांना फेटाळून लावले आहे. या निर्णयामुळे जिल्हा विभाजनाचा प्रश्न सध्या प्रशासकीय पटलावरून दूर झाल्याचे दिसत आहे. अतिरिक्त … Read more

लाेखंड लुटण्यासाठी अहिल्यानगरच्या व्यावसायिकाची हत्या ! प्रेयसीला कॉल केला आणि झाला घात…

Ahilyanagar News : ट्रक मालक विजय मुरलीधर राऊत (५२, रा. केडगाव, अहिल्यानगर) यांची हत्या लुटमारीच्या उद्देशाने करण्यात आली असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. राऊत यांना ओळखणाऱ्या गणेश वसंत पवार (बदली चालक, रा. सुलतानपूर) याने मित्र गणेश गजानन कुटे आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ यांच्या मदतीने हा गुन्हा केला. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा करत … Read more

Mpkv Recruitment : कृषी क्षेत्रात करिअर सुरू करण्याची उत्तम संधी ! 787 नवीन नोकऱ्या – लवकर अर्ज करा!

Mpkv Recruitment : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर यांनी विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीत गट क आणि गट ड अंतर्गत वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजुर आणि इतर विविध पदांच्या एकूण ७८७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन … Read more

अहिल्यानगर मनपात भाजपची सत्ता ? भाजप एकटं लढल्यास काय होईल ?

mauni amavasya

Ahilyanagar News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. शिर्डीत झालेल्या भाजपच्या परिषदेत त्यांनी याबाबत सूचनाही दिल्या. याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही अशाच प्रकारची भूमिका घेतली होती, ज्यामुळे युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जर भाजपने खरंच स्वबळावर निवडणुका लढवल्या, तर शिंदे गट आणि अजित पवार गटही स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणते चित्र दिसेल, यावर आधारित आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

कॉफी आरोग्यासाठी वरदान की त्रास ? जाणून घ्या फायदे आणि तोटे ! दिवसातून किती कॉफी पिणे योग्य ?

कॉफी पिण्याचे फायदे आणि हानिकारक परिणाम जाणून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे, कारण भारतात आणि जगभरात अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. नवीन संशोधनानुसार, दररोज एक किंवा दोन कप कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु प्रमाण जास्त झाल्यास त्याचे नकारात्मक परिणामही होऊ शकतात. कॉफीचे फायदे हृदयविकाराचा धोका कमी होतो युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, दररोज … Read more

श्रीगोंद्यात बनावट वधूचा पर्दाफाश ! सत्यनारायण पूजेत धक्का…वधूने ऐकले आणि धूम ठोकली

Ahilyanagar News : श्रीगोंदा तालुक्यातील एका सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमात घडलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण गावात खळबळ उडवली आहे. नवविवाहित वधू आणि तिच्या मध्यस्थीने लग्नानंतर सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमातच बनावट ओळख उघड झाल्यानंतर धूम ठोकली. या घटनेने वराकडील मंडळींची केवळ फसवणूकच नाही, तर मोठ आर्थिक नुकसानही झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काय आहे प्रकरण? तालुक्यातील एका युवकाचे लग्न … Read more

अहिल्यानगर महानगरपालिकेत आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

अहिल्यानगर – ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी नगरकरांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी महानगरपालिका कटीबद्ध राहील, प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छ व सुंदर अहिल्यानगरसाठी महानगरपालिका प्रयत्नशील राहील, असे … Read more

Big Breaking ! अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखाना व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

Ahmadnagar breaking

सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची प्रगती काही दृष्ट प्रवृत्तींना पहावत नसल्याने अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी कारखान्याची बदनामी करण्याच्या दृष्टीने कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या बाबत सोशल माध्यमांवर वाईट व आक्षेपार्ह मजकूर टाईप करून पसरवल्याप्रकरणी संगमनेर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याबाबत पोलीस स्टेशन व सायबर क्राईम कडून तपासाला वेगाने … Read more