‘बबन्या’ भाजपमध्ये प्रवेश करताच ‘बबनराव’ कसा झाला ?

22 ऑगस्ट 2019 :- विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आज जे नेते भाजपमध्ये जात आहेत तेच नेते राष्ट्रवादीत असताना त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेच नेते भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांना पावन करून घेतलं जातं असा हल्लाबोल त्यांनी केला. ते म्हणाले, बबनराव … Read more

प्रवीण चौगुलेच्या निष्ठेला सलाम – आ. जितेंद्र आव्हाड

ठाणे : सध्या राज्यात पळवापळवी सुरू असतानाच प्रवीण चौगुले या विटाव्यातील तरुणाने आपल्या नेत्याला त्रास होतोय म्हणून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे समर्थन करणार नाही. पण, त्याने दाखवून दिलेली ही निष्ठा महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारी आहे. त्यामुळे त्याला माझा सलाम आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रवीण चौगुले या तरुणाला आदरांजली … Read more

खंबीरपणे उभे राहत असाल तर विधानसभा निवडणूक लढवू

शेवगाव : पक्ष कोणता असेल ते आपण नंतर पाहू, परंतू जर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असाल तर विधानसभा निवडणुकीमध्ये सौ. हर्षदा काकडे उभ्या राहतील. निवडणूक लढवायची की नाही, हे तुम्ही तालुक्यातील घराघरांत जाऊन विचारा.सर्वसामान्य जनतेच्या जीवावरच यापूर्वी आम्ही निवडून आलो आहोत, व यापुढेही जनतेच्या जीवावरच निवडणूक करू, असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष … Read more

शेतीच्या वादातून महिलेस मारहाण

अहमदनगर : नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे शेतीच्या वादातून महिलेस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चंद्रकला भाऊसाहेब मोरे (वय 33, रा. बाबुर्डी घुमट) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अर्जुन सुखदेव मोरे व मंदा अर्जुन मोरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी चंद्रकला मोरे या त्यांच्या घरासमोर उभ्या होत्या. या … Read more

विमानातून येऊन चोऱ्या करणाऱ्या श्रीमंत चोरास अटक

पिंपरी : उत्तर प्रदेशातून विमानाने येऊन तसेच आलिशान हॉटेलमध्ये राहून उच्चभ्रू फ्लॅटची रेकी करीत त्यातील लाखोंचा ऐवज लांबवणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे वाकड पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्याच्याकडून २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण ८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनिल मिश्री राजमर (३६, रा. … Read more

होमगार्डचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस हवालदारावर गुन्हा

राहाता : येथील पोलीस ठाण्यात बंदोबस्तकामी गेलेल्या महिला होमगार्डचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस हवालदार निजाम शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता शेख याने पोलीस ठाण्यात बंदोबस्तकामी तैनात असलेल्या महिला होमगार्डशी अश्लिल भाषेत संवाद साधला. तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे … Read more

झोप येत नसेल तर व्हा सावध, तुम्हाला आहे हृदयविकाराचा धोका !

न्यूयॉर्क : सध्याच्या प्रचंड ताणतणावाच्या व धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांचे झोपेचे गणित कोलमडते व त्यांना वेळेवर झोप येत नाही. अशा अनिद्रेच्या समस्येला तोंड देत असलेल्या लोकांमध्ये ह्रदयाच्या आजारांचाही धोका वाढतो. हल्लीच झालेल्या एका अध्ययनानुसार, अशा लोकांमध्ये ह्रदयाचे ठोके थांबण्याची आणि पक्षघाताचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. जगभरात सुमारे ३० टक्के लोक अनिद्रेच्या समस्येने ग्रस्त आहेत. शास्त्रज्ञांच्या … Read more

साखर सोडायची असेल तर हे नक्की वाचा

अनेकांना साखर सोडायची इच्छा असते. पण प्रयत्न करूनही गोड पदार्थांचा मोह काही सुटत नाही. आहारातल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा साखर हद्दपार करण्यासाठी काय करता येईल याबाबतचे हे मार्गदर्शन. आरोग्यदायी आणि अनारोग्यदायी पदार्थांमध्ये फरक करायला शिका. कधी काय खायचं हे ठरवा. गोड खाण्याऐवजी आरोग्यदायी पदार्थाची निवड करा. जास्त काळ उपाशी राहणं टाळा. उकडलेल्या भाज्यांना प्राधान्य द्या. … Read more

तुम्हाला सारखा राग येतो? तर हे नक्की वाचा…

राग किंवा क्रोध आपल्याला मारक ठरतो. रागावर नियंत्रण मिळवलं नाही तर बरेच विकार जडू शकतात. हृदयविकार, उच्च रक्तदाबासारखे विकार रागामुळे बळावू शकतात. क्रोधामुळे बायपोलर डिसऑर्डरसारखा गंभीर विकार जडू शकतो. रागावर नियंत्रण न मिळवल्याने वैयक्तिक नातेसंबंधांवर विपरित परिणाम होतो. अशा असंख्य दुष्परिणामांमुळे रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं होऊन बसतं. यासाठी काही उपाय करता येतील. राग ही एक … Read more

हात कधी धुवावे ?

सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर आपण हात धुतो. पण घरातल्या स्वच्छतागृहाचा किंवा बाथरूमचा वापर केल्यानंतर प्रत्येक वेळी हात धुतले जातातच असं नाही. स्वच्छतागृहात कुठेच स्पर्श न झाल्यामुळे हातांना जंतूसंसर्ग होणार नाही, असा काहींचा समज असतो. प्रत्यक्षात स्वच्छतागृह, बाथरूममध्ये असंख्य जंतूंचा वास असतो. लक्षवेधी बाब म्हणजे फक्त ३१ टक्के पुरुष आणि ६५ टक्के महिला सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर … Read more

कोरफड खाण्याचे हे आहेत आरोग्यासाठी फायदे !

कोरफड औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. विविध प्रकारच्या जखमा, भाजणं, कापणं यावर कोरफडीचा गर प्रभावी ठरतो. कोरफडीमुळे शरीराचा दाह कमी होतो. त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासोबतच इतर त्वचाविकारही कोरफडीच्या वापरामुळे दूर होऊ शकतात. त्वचा, केसांसोबत विविध विकारांमध्येही कोरफड वापरली जाते. अल्सरेटिव्ह कोलायटिस, जुनाट बद्धकोष्ठता, अपचन, पचनसंस्थेशी संबंधित इतर विकार यावरही कोरफड प्रभावी ठरू शकते. कोरफडीचा गर मिश्रीत … Read more

एमआयडीसीसाठी आ.विजय औटींनी काय केले

नगर :- एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद होत आहेत. आजूबाजूच्या गावांतील तरुणांच्या हाताला काम नाही. लोकप्रतिनिधी आणि विधानसभा उपाध्यक्ष म्हणून आमदार विजय औटी यांनी या भागातील पाणीप्रश्न सोडवून उद्योगधंदे येण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नीलेश लंके यांनी केली. नगर तालुक्यातील पारनेर मतदारसंघातील खारेकर्जुने, इसळक, निंबळक, नवनागापूर, वडगाव गुप्ता येथे राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेनिमित्त चौकसभेचे … Read more

प्रताप ढाकणे तुम्ही कोणत्याही पक्षात जा, तुमचा पराभव अटळ आहे.

पाथर्डी :- वंजारींना संधी देऊन राजळे कुटुंबाने समाजाचा सन्मान केला. आमदार मोनिका राजळेंभोवती जेवढ्या संख्येने वंजारी कार्यकर्ते आहेत, तेवढे तुमच्याभोवती किती मराठा कार्यकर्ते आहेत हे दाखवा. विक्रमराव आंधळे यांच्या पराभवासाठी पळणाऱ्यांना त्यावेळी जात का दिसली नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते सोमनाथ खेडकर यांनी प्रताप ढाकणेंवर निशाणा साधला. येळी येथे आमदार राजळे यांच्या हस्ते भाटेवाडी रस्त्याच्या … Read more

टेम्पोची धडक बसून एकजण जागीच ठार

कोपरगाव | आयशर टेम्पोची मोटारसायकलीला धडक बसून देविदास सुखदेव पवार (वय ५०, चाळीस खोल्या, येसगाव) यांचा मृत्यू झाला. मनीषा देविदास पवार ही जबर जखमी झाली. तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी जावेद अजगर सय्यद (मिल्लतनगर, येवले, जि. नाशिक) याचा शोध पोलिस घेत आहेत. वाहन बेजाबदारपणे चालवल्याचा ठपका पोलिसांनी टेम्पोचालकावर ठेवला आहे. या … Read more

राहुरीच्या विकासासाठी विखे-कर्डिले ही जोडी कायम राहील !

राहुरी :- देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मागील ५० वर्षांत महाराष्ट्राला लाभला नाही, असे सांगत निळवंडे कालव्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने ही जनादेश यात्रा असली, तरी जनतेने आभार यात्रा म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी बुधवारी केले. मी आमदार कर्डिंलेचे नाव कायम घेत असताना माझे नाव घेण्याची आठवण त्यांना … Read more

विवाहितेचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

कोपरगाव :- विवाहितेचा मोटारसायकलीवरून पाठलाग करून तिच्या साडीचा पदर ओढून अश्लील हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्यावर कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ‘तू माझ्या गाडीवर बसली नाही, तर वाईट परिणाम होतील,’ अशी धमकीही या तरूणाने दिली. या प्रकरणी अविनाश ज्ञानदेव आहेर (वय ३२, श्रीकृष्ण मंदिर गल्ली, मुखेड, हल्ली मुक्काम अन्नपूर्णानगर,कोपरगाव) याच्यावर गुन्हा दाखल … Read more

वाळूमाफियांना अटक करण्यास पोलीस प्रशासना कडून टाळाटाळ; गुरुवारी उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळूमाफिया विरोधात पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करुन देखील आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ टायगर फोर्स प्रणित एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  दि.17 जुलै रोजी वाळूमाफीयांच्या टेम्पोने चुकीच्या दिशेने येऊन मडकी (ता. नेवासा) येथे बैलगाडीला उडवून पळ काढला. सदर टेम्पोचालक महेश (काळ्या) आढागळे … Read more

… तर नेवासे तालुक्याचा बिहार झाला असता!

नेवासे तालुक्याच्या विकासासाठी वीज, रस्ते व पाणी योजनांना प्राधान्य दिल्याने येत्या निवडणुकीतही भाजपचाच आमदार निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. नेवासे ते नारायणवाडी या सुमारे साडेपाच कोटी खर्चाच्या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामाचा मुरकुटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.विरोधी आमदार निवडून दिला असता, तर बिहारच्या वाटेवर नेवासे तालुका गेला … Read more