भाजप कार्यकर्त्यांचा ‘मोनिका राजळे हटाव’चा नारा

शेवगाव : विधानसभा निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांना सोडून इतर कोणालाही उमेदवारी द्या, त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणू असे म्हणत, बोधेगाव येथे झालेल्या मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी ‘राजळे हटाव’चा नारा दिला.  या वेळी कार्यकर्त्यांनी कडवट भाषेत राजळेंवर टीका केली. पंकजा मुंडे यांना भेटून उमेदवार बदलण्याची मागणी करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला आहे. मेळाव्यामुळे शेवगाव तालुक्यातील … Read more

मुख्यमंत्र्याचा अहमदनगर जिल्हा दौरा पुन्हा बदलला!

अकोले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोल्याच्या महाजनादेश यात्रेचे ग्रहण सुटायचे नाव घेत नाही. महाजनादेश यात्रा आधी १८ ऑगस्टला येणार होती, जलप्रलयामुळे मुख्यमंत्र्यांनी दौरा तातडीने रद्द केला होता. आता पुन्हा फडणवीस महाजनादेश यात्रेला निघाले आहेत.  अकोल्यातील हा दौरा बुधवारी (२१ ऑगस्ट) व नंतर त्यातही बदल करून शनिवारी (२४ ऑगस्ट) ठेवण्यात आला होता. पण आता हा … Read more

प्रताप ढाकणे यांना भाजप प्रवेश मिळाला तरी उमेदवारी नाही !

पाथर्डी :- पक्षात कोणाला यायचे तर या, पण उमेदवारी मात्र मोनिका राजळेंनाच असेल. काही जण शेजारी जातात (बीड जिल्हा), पण काही उपयोग नाही. खासदार या नात्याने मुख्यमंत्र्यांना मी अहवाल दिला आहे, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी नामोल्लेख टाळत केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे उघडे असले, तरी उमेदवारी मिळणार नसल्याचे … Read more

राखी बांधून घेतांना कैदी बांधवांचे डोळे पाणावले

अ.नगर – येथील जिल्हा कारागृह मध्ये रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने राखी पौर्णिमेचा सण कैदी बांधवांना राखीबांधून साजरा करण्यात आला व इतर प्रसंगी नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांनी राखीचे महत्व सांगून नेत्रदाना विषयी माहितीसांगितली. सदर  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेलर एन जी सावंत हे होते, अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष महावीर मेहेर यांनी दिली. कारागृहाच्यावतीने  श्यामकांत शेंडगे यांनी स्वागत केले. सुधार व पुर्नवसन या हेतुने कैदी बांधवाना येथे योग्य ते मार्गदर्शनकेले जाते. आजचा हा कार्यक्रम  त्याचाच एक भाग आहे असे ते म्हणाले. रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया, सौ पल्लवी मेहेर, सौ छाया करंजुले, सौ सुनिता कर्नावट यांनी कैदी बांधवांनातिलक, औक्षण करून राखी बांधली त्यावेळेस घरापासून दूर असणार्या कैदी बांधवांच्या डोळयात पाणी आले. त्यांच्या भावना अनावरझाल्या सदर प्रसंगी रोटरीच्या वतीने पुस्तकांचा सेट कारागृहातील लायब्ररीसाठी भेट देण्यात आला.  श्री एन जी सावंत, श्री श्यामकांत शेंडगे यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ अ.नगर व साई सूर्य नेत्रसेवा यांनी तयार केलेली‘नेत्रदानश्रेष्ठदान’ या माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी रोटरीचे माजी अध्यक्ष  कौशिक कोठारी,  दिलीप कर्नावट हेउपस्थित होते.  सदर माहिती पत्रिका वाचून कैदी बांधवानी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व त्यांनी नेत्रदानाचा संकल्प करण्याविषयीउत्सुकता दाखविली. नेत्रदानाचे फॉर्म आवर्जुन मागुन घेतले. कैदी बांधवांसाठी नेत्रदानाविषयीचा असा उपक्रम घेणारे रोटरी क्लब वसाई सूर्य नेत्रेसेवा हे देशातील पहिले संघटन होय असे प्रतिपादन रोटरीचे सचिव दादासाहेब करंजुले यांनी केले.   अध्यक्षीय भाषणात जेलर सावंत म्हणाले की राखीचा धागा छोटा असतो पण तो थेट हृदयापर्यंत पोहचतो. हृदय परिवर्तनही करूशकतो त्याचीच प्रचिती आज आली आहे. कैदी बांधवांनी मरणोत्तर नेत्रदानाविषयी दाखविलेली उत्सुकता हे माणुसकीचे लक्षण आहे.

केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवा : कर्डिले

अहमदनगर : राज्यातील व देशातील भाजप सरकारने भरीव विकासकामे करून राज्यात व देशात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत पारदर्शक कारभार केला, राज्य सरकारच्या माध्यमातून राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघात केलेली विकासकामे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा, असे प्रतिपादन युवानेते अक्षय कर्डिले यांनी केले. आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली बुऱ्हाणनगर येथे आयोज़ित नगर- पाथर्डी- राहुरी मतदारसंघातील तरुणांच्या … Read more

भावावर चाकूहल्ला; तरूणावर गुन्हा दाखल

अहमदनगर : रस्त्यात दुचाकी लावल्याच्या कारणावरून राग येऊन एका तरूणीच्या घरात घुसून तिला शिवीगाळ, दमदाटी करीत तिला लज्जा उत्पन्न होईल. असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरूणीच्या भावावर चाकू हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना केडगाव परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, केडगाव परिसरात राहणारी एक तरूणी … Read more

विवाहितेचे फोटो एडीट करून ते फेसबुकवर टाकून पैशांची मागणी

श्रीरामपूर :- विवाहितेचे फोटो एडीट करून ते फेसबुकवर टाकून तीच्या पतीस पाठविले, तसेच पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून तालुक्यातील घुमनदेव येथील एकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबत तालुका पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की घुमनदेव येथील राहुल यननाथ गायकवाड (वय २९) या तरुणाने दि. १७ ऑगस्ट रोजी एका विवाहित महिलेचे फोटो एडीट करून … Read more

जिल्ह्यातील सर्व १२ जागा भाजप जिंकणार हे नक्की

नगर : जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्याची पायाभरणी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून होणार आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २४ व २५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी शहर भाजपाच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. विखे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो … Read more

चोरट्यांनी चक्क सीसीटीव्ही कॅमेरेच चोरले !

नगर : नगरमधील प्रगत कला महाविद्यालयाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले चार सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रविवारी रात्रीच्या वेळी महाविद्यालयातील चार कॅमेरे चोरीला गेल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. या डीव्हीआरमधील फुटेज महाविद्यालयाच्या प्रशासनाने तपासले. त्यात तिघे जण महाविद्यालयाची भिंत चढून महाविद्यालयात येत असल्याचे दिसून येत … Read more

मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करून पतीवर हल्ला

नगर : मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या महिलेला तरुणाने रस्त्यात अडवून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. महिलेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीवर आरोपीने वस्तऱ्याने हल्ला करून त्याला जखमी केले. बालिकाश्रम रोड येथे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून नीलेश तुळशीराम गायकवाड याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशनला … Read more

कांद्याच्या बाजारभावात पन्नास रुपायांनी वाढ

राहुरी: राहुरी शहर रविवारच्या तुलनेत सोमवारी कांद्याच्या बाजारभावात ५० रूपये वाढ झाली. वांबोरी उपबाजार समितीत एक नंबर कांद्याला १८०० ते २१०० रुपये क्विंटल भाव मिळाला. आवक कमी झाल्याने बाजारभावात किरकोळ वाढ झाली. वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर ६९४० गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १८०० ते २१०० रूपये क्विंटल भाव मिळाला. दोन नंबर कांदा १३०० ते … Read more

कार्यसम्राट म्हणणार्यांनी १४ वर्षात तालुका भकास केला – नीलेश लंके

पारनेर : स्वतःला कार्यसम्राट म्हणणार्यांनी १४ वर्षात तालुका भकास केला. नुसते सभामंडप बांधून विकास होत नसतो तर लोकांच्या मूलभूत गरजा ओळखायला पाहिजे. तालुक्यात रस्त्यांची कामे चालू आहेत. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून तयार केलेले रस्ते तीनच महिन्यात उखडतात. हाच तो कार्यसम्राटांचा विकास आहे काय? असे सांगत कडूस ते वाळवणे रस्त्याची अवस्था आज काय … Read more

धरण पाहण्यास आलेल्या महिलेचा मोबाइल चोरला

राहुरी : मुळा धरण पाहण्यासाठी आलेल्या मुंबईतील महिलेचा ६० हजार किमतीचा अ‍ॅपल आयफोन भामट्याने लांबवला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ते पाहण्यासाठी पूजा राजेश पेटकर (गोरेगाव, मुंबई) या कुटुंबासमवेत आल्या होत्या. पेटकर यांच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशात ठेवलेला अ‍ॅपल कंपनीचा मोबाइल भामट्याने हातोहात लांबवला. मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात येताच पेटकर यांनी शोध घेतला. … Read more

जामखेडमध्ये कृषी विज्ञान मार्गदर्शन केंद्र व्हावे

जामखेड : जामखेड दुष्काळातून बाहेर निघण्यासाठी आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. त्यासाठी बारामतीच्या धर्तीवर कृषी विज्ञान मार्गदर्शन केंद्र जामखेडमध्ये व्हावे. जामखेडकरांनी या केंद्रासाठी शंभर एकर जमीन द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. रयत शिक्षण संस्थेच्या येथील नागेश विद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. आमदार दिलीप वळसे, माजी आमदार दादा … Read more

बसमधील महिलेच्या गंठणाची चोरी

कोपरगाव: शिर्डीहून येवले येथे निघालेल्या तेजस्विनी जयसिंग राजपूत (वय २९) या महिलेच्या दोन तोळ्यांच्या सोन्याच्या गंठणाची परळी वैजनाथ-नांदगाव या एसटी बसमध्ये (एमएच १४ बीटी ४७१३) सोमवारी चोरी झाली. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ही एसटी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आली. चोरटा बसमध्ये आहे, सगळ्यांची झडती घ्या, अशी मागणी राजपूर यांनी केल्याने सर्व प्रवाशांची झडती घेण्यात … Read more

गटबाजी टाळून प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहर काँग्रेस कार्यरत

नगर –  गटबाजी टाळून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहर काँग्रेस कार्यरत आहे, असे शहरब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी नवीन कार्यालयाच्या निमित्ताने स्पष्ट केले. शहर काँग्रेसने यापूर्वी आणिआजही कोणताही विशिष्ट गट मानला नाही. तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसनेकार्य सुरु केले होते. ते स्वत: आज कार्यरत नाही, पण त्यांनी जी पक्षाची … Read more

व्यंकटेश पतसंस्थेच्या संचालकांवर कारवाईसाठी २२ ला उपोषण

शनिशिंगणापूर : शनिशिंगणापूर दोन कोटींच्या अपहारप्रकरणी जामीन फेटाळला, तरी व्यंकटेश पतसंस्थेच्या संचालकांवर कारवाई करण्यास आर्थिक गुन्हे शाखा आठ महिन्यांपासून टाळाटाळ करत असल्याने २२ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे. नेवासे तालुक्यातील सोनई येथील या पतसंस्थेतील संचालक व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून अपहार केला. अध्यक्ष व संचालकांवर गुन्हे दाखल झाले. अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला, … Read more

या प्रशासनाचे करायचे काय? खाली डाेके वर पाय…

नगर : माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शिवसेना सोमवारी रस्त्यावर उतरली. पोलिस प्रशासनाचा धिक्कार असो, या प्रशासनाचे करायचे काय? खाली डाेके वर पाय अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी कोतवाली पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली. खोटा गुन्हा तत्काळ मागे घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी, तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी … Read more