१ हजार मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे; कोर्टाकडून तुरूंगवासाची शिक्षा

नगर :- शहरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी दारुड्या वाहनचालकांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील सात महिन्यांत तब्बल एक हजार मद्यधुंद वाहनचालकांना पकडून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापैकी अनेकांना दंडात्मक, तर काहींना थेट तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.  दारू पिऊन … Read more

नेप्तीत बिबट्याच्या संचाराने दहशत;विद्यार्थी व महिलांमध्ये घबराहट

अहमदनगर – नगर तालुक्यातील नेप्ती मध्ये बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने गावासह परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. नेप्तीत गडाख वस्ती, होळकर वस्ती, रानमळा, खळगा वस्ती येथे बिबट्या दिसून आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे तर शेतीकाम करणार्‍या महिलांनी शेतात जायचे बंद केले आहे. या दहशतीपोटी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असल्याची माहिती रामदास … Read more

स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबीराने गाठला विक्रमी आकडा

अहमदनगर – राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगर प्रेस क्लब, हॉटेल बार व असोसिएशन, लिकर असोसिएशन, भारतभारती संघटना व सिध्दकला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त महारक्तदान शिबीर घेण्यात आले. या महारक्तदान शिबीरात 631 रक्त पिशव्या संकलीत करुन रक्तदानाची विक्रमी संख्या गाठण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हुतात्मे व सिमेवर देश रक्षणाचे कार्य करणार्‍या जवानांना सलाम करीत … Read more

नेप्तीत रॉबिन हूड आर्मीने केले गरजूंना अन्न-धान्याचे वाटप

अहमदनगर – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नेप्ती (ता. नगर) येथे रॉबिन हूड आर्मीच्या वतीने दुर्बल घटक व वंचित घटकातील गरजू नागरिकांना अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य अरुण होळकर, मा.सरपंच विठ्ठलराव जपकर, सरपंच सुधाकर कदम, उपसरपंच शिवाजी पाटील होळकर, सुभाष जपकर, जालिंदर शिंदे, रामदास फुले, राजेंद्र होळकर, बबन कांडेकर, बाळासाहेब होळकर, गोरक्ष फुले, … Read more

खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून क्रीडा मंत्र्यांशी बोलणार -पालकमंत्री राम शिंदे

अहमदनगर – शालेय क्रीडा स्पर्धेवर क्रीडा शिक्षक व क्रीडा संघटनांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या मनमानी कारभाराला व हुकूमशाहीला विरोध करून टाकलेल्या बहिष्काराच्या संदर्भात योग्य ती कार्यवाही व्हावी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राम शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पालकंत्री शिंदे यांनी कुठल्याही खेळाडूचे नुकसान होऊ देणार नाही. यासंदर्भात आजच तातडीने शिक्षण मंत्र्यांशी बोलून … Read more

पिंपळा लोणी सय्यदमीर ग्रामस्थांच्या वतीने स्वातंत्र्य दिनी तहसिल कार्यालया समोर जनावरे बांधून रास्तारोको करण्याचा इशारा

बीड (प्रतिनिधी)- पिंपळा लोणी सय्यदमीर (ता. आष्टी, जि. बीड) येथील छावणी चालकांना सरकारी अनुदान मिळत नसल्याने चाराअभावी छावणी बंद करण्याची वेळ आली असता, गावातील शेतकर्‍यांनी छावणी पुर्ववत सुरु होण्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनी तहसिल कार्यालया समोर जनावरे बांधून रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे.  पिंपळा लोणी सय्यदमीर येथे दुष्काळात जनावरांची सोय होण्यासाठी पिंपळेश्‍वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने … Read more

हर्षदा काकडे शेवगाव – पाथर्डीतून विधानसभेच्या रिंगणात !

शेवगाव :- लोकसभा निवडणुकीमध्ये मी आमदार संग्रामभैया जगताप यांचा प्रचार केला म्हणजे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला असे नाही. मी तालुक्यामध्ये जनशक्ती विकास आघाडी या संघटनेमार्फत गोरगरिबांची सेवा करते. मी अद्याप कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. चालू विधानसभेसाठी मी माझी योग्य भूमिका दिनांक १८ ऑगस्ट २०१९ च्या शेवगाव येथील मेळाव्यात जाहीर करील असे प्रतिपादन जनशक्तीच्या जि.प.सदस्या … Read more

वॉटर कप स्पर्धेत सोनेवाडी प्रथम

नगर : पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यावर्षी नगर तालुक्यातील सोनेवाडी (चास), जांब व सारोळा कासार या गावांनी बाजी मारली. सोनेवाडीला तालुक्यात प्रथम (१० लाख रुपये), जांब द्वितीय (६ लाख रुपये) तर सारोळा कासारला तृतीय (४ लाख रुपये) क्रमांकाचे बक्षीस मिळाले.  यावर्षी ८ एप्रिल ते २७ मे अशी ५० दिवस ही स्पर्धा … Read more

राज्यातील पूर परिस्थिती बाबत रोहित पवारांची भावनिक पोस्ट

अहमदनगर :- राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पूर परिस्थिती बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी एक भावनिक पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये रोहित पवार यांनी लिहिलेय कि ”जेव्हा जेव्हा मी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात येतो तेव्हा इथे असणाऱ्या नद्या आणि या परिसरात असणाऱ्या नैसर्गिक संपन्नतेच कौतुक वाटतं. पण कालपासून या … Read more

उसण्या पैशावरुन पती – पत्नीस बेदम मारहाण

राहुरी – राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात खिळे वस्ती भागात राहणारे कासीम मैदबुद्दीन पठाण यांनी उसणे दिलेले ३२ हजार रुपये मागितले. त्यावरून त्यांना व त्यांची पत्नी रुबिना पठाण यांना लाथाबुक्क्याने व लाकडी बॅटने बेदम मारहाण करून शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. कासीम मैनुद्दीन पठाण यांच्या फिर्यादीवरुन आरोपी बादशाह मैनुद्दीन पठाण, जावेद बादशाह पठाण, मालन … Read more

विजेचा शॉक लागून मृत्यू

बेलापूर – श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव परिसरातील रहिवाशी पोपट चांगदेव काळे, वय ७० वर्ष यांना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. पोपट काळे या वृद्धाला विजेचा शॉक लागल्यानंतर श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तपासले असता काळे हे वृद्ध मयत झालेले होते. डॉक्टरांच्या खबरीवरुन शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून … Read more

महिला सरपंचाला अश्लील शिवीगाळ करत पतीस लाथाबुक्क्याने मारहाण

श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागातील एका गावातील विवाहित तरुण महिला सरपंच यांच्या घरासमोर जावून आरोपी बाळासाहेब आबाराव घोगरे यांनी मागील तीन महिन्यापूर्वीच्या जलसंधारण कामाच्या वादावरुन झालेल्या भांडणाच्या कारणावरून अश्लिल शिवीगाळ केली.  तेव्हा सरपंच महिलेचे पती आरोपी बाळासाहेब घोगरे याला म्हणाले की, तू घाण – घाण शिवीगाळ करु नको. असे समजावण्याचा प्रयत्न केला तरीही आरोपीने  … Read more

सत्ता गेल्याने द्वेषापोटी अनुराधाताई आदिक टार्गेट

श्रीरामपूर – श्रीरामपूर शहरात अनिधिकत बांधकामे, सत्तेचा दुरुपयोग करता येत नसल्याने उपनगराध्यक्ष विरोधी नगरसेवकांचा तिळपापड होत आहे. सध्या आपल्या कार्यकाळात केलेल्या चुकीच्या कामांमुळे सगळीकडून गर्तेत आलेल्या विरोधकांनी सत्तेच्या काळात शहराचे लचके तोडलेले आहेत याची अनेक उदाहरणे येत्या अडीच वर्षात श्रीरामपूरच्या जनतेपुढे आलेली आहेत. कोणी पार्किंग गायब केल्यात तर कोणी मुतारी पाडून गाळे बांधलेले आहेत तर … Read more

पूरग्रस्तांना मदतीचा हात देवू या…. एक पणती आपणही पेटवू या..

राष्ट्र सेवा दल, अहमदनगर शहर तर्फे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन नगर – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमधून व शहरातून पुराने थैमान घातले आहे.अनेक लोकांच्याघरात पाणी शिरल्यामुळे खाण्याच्या वस्तु, कपडे,अंथरूण, पांघरूण वापरण्याजोगे राहिले नाहीत. राष्ट्र सेवा दलाचे मिरज,सांगली, इचलकरंजी आणि कोल्हापूर येथील कार्यकर्तेगेले काही दिवस पूरग्रस्तांना मदत करण्याच्या कामात सक्रीय आहेत. याठिकाणी राष्ट्र सेवा दलाने छावण्या … Read more

आ.संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने पुरग्रस्तांसाठी मदत जमा करण्याचे शहरात अभियान सुरु

अहमदनगर – आ.संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने सांगली, कोल्हापूर मधील पुरग्रस्तांच्या मदत जमा करण्याचे अभियान सुरु करण्यात आले. शहरातील प्रत्येक भागात जाऊन मदत जमा करणार्‍या वाहनात जीवनावश्यक वस्तूची मदत देत या उपक्रमाची सुरुवात आ.संग्राज जगताप यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, नगरसेवक सुनील त्रिंबके, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, राष्ट्रवादी … Read more

जर पिचडांचं “सांम्राज्य” उखडुन फेकायचं असेल तर या ‘त्रिकुटांना’ एकत्र यावचं लागेल !

“अकोले” तालुक्‍याला डाव्या चळवळीचा इतिहास आहे. मात्र, २०१४ ला राज्यात व केंद्रात सत्तापालट झाला आणि डाव्या विचारांची धार आता बोथट होऊ लागली असल्याने आणि उजवा विचार रुजू लागल्याचे चित्र आता पुढे येऊ लागले आहे. याचा अपरिहार्यपणे परिणाम माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या साम्राज्यावर होईल असं वाटत होतं परंतु स्वतः पिचड पिता-पुत्र भाजप मध्ये प्रवेश करुन … Read more

निलक्रांती चौकच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांनी अधिकार्‍यांना धरले धारेवर

अहमदनगर – दिल्लीगेट परिसरातील निलक्रांती चौक येथे रखडलेल्या गटारीच्या कामामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी दि.9 ऑगस्ट रोजी ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरत जाब विचारला. अडचणी दूर करुन कामाला तात्काळ गती न दिल्यास रास्तारोको आंदोलन सुरू करण्याचा इशारा माजी नगरसेवक अ‍ॅड.धनंजय जाधव व उपस्थित नागरिकांनी दिल्यानंतर रखडलेले काम वेगाने सुरू करण्यात आले. यावेळी जाधव … Read more

आर्ट ऑफ लिविंग प्राण व्यसनमुक्ती शिबिर नगर मध्ये

नगर : अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आर्ट ऑफ लिविंग या संस्थेच्यामाध्यमातून समाजसेवेसाठी ‘प्राण’ या व्यसनामुक्ती शिबिराची निर्मिती करण्यात आली आहे, ज्याचे नगर जिल्ह्यातील केंद्रातलवकरच प्रारंभ होणार आहे. या शिबिराच्या माहिती फलकाच्या अनावरण नुकतेच नगर मधील संस्थेच्या, ज्ञान क्षेत्रातीलसामाजिक कार्यकर्ते अजित कुलकर्णी (सचिव अनामप्रेम नगर) यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी … Read more