अहमदनगर महाविद्यालयात जर्मन भाषेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रमाणपत्र वाटप

 नगर – अहमदनगर महाविद्यालयात प्राचार्य  आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते जर्मन भाषेच्या  आंतरराष्ट्रीय परिक्षेत यशस्वीझालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र  देवुन सत्कार करण्यात आला.  काळाची गरज ओळखुन विद्यार्थ्यांना परदेशी भाषा कमीतकमीमुल्यामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी अहमदनगर महाविद्यालयात जर्मन भाषा वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या जर्मन भाषावर्गामध्ये  अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होवुन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.  यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस म्हणाले कि, … Read more

मनसेच्या वतीने आयुक्तांना स्मरणपत्र सावेडीतील खड्डेमय रस्ते दुरुस्तीची मागणी

अहमदनगर – खड्डेमय रस्त्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत असताना सावेडी उपनगरातील रस्त्याची दुरुस्तीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली होती. अनेक दिवस उलटून देखील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले नसल्याने मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना स्मरणपत्र देण्यात आले. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, उपशहराध्यक्ष तुषार हिरवे, परेश पुरोहित, अविनाश क्षेत्रे, सुनील धीवर, निलेश खांडरे आदि … Read more

जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने मुलींची छेड काढणार्‍या रोडरोमिओवर कारवाईची मागणी

अहमदनगर – शहरात मुलींची छेड काढणार्‍या रोडरोमिओवर कारवाई करण्याची मागणी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधिक्षकांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, जहीर मुलानी, बाबासाहेब करांडे, महेंद्र बेरड, श्रीपाद वाघमारे, अमोल भंडारे, हसन शेख, गोविंदा शिंदे, गणेश मकासरे, महेश घोगरे, हरीश वाकचौरे, प्रशांत … Read more

शहरातील आधार केंद्रांवर छापे, बनावट बोटांचे ठसे आढळले

नगर –नगर शहरातील आधार केंद्र चालकांवर तहसीलच्या पथकाने छापे टाकले. बनावट बोटांचे ठसे असलेल्या प्रिंट जप्त करण्यात आले असून संबंधित केंद्रचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील आधार केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आलेल्या तक्रारींनुसार आधार केंद्रांवर कारवाई झाली. आधार केंद्रांची झडती घेऊन फिंगरप्रिंट जप्त करण्यात आल्या. … Read more

कोपरगावात डेंग्यूसदृश तापाचे हजारावर रुग्ण आढळले, नागरिकांत घबराट

कोपरगाव –  महापुरानंतर आजारांमध्ये वाढ झाली. डेंग्यूसदृश आजाराचे रूग्ण घरोघर आढळत आहेत. साचलेली डबकी, दलदल यामुळे डास वाढले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक ताप, थंडी, मलेरिया, तसेच सर्दी-पडशाने त्रस्त आहेत.  ग्रामीण रुग्णालयासह सर्वच रूग्णालये भरली आहेत. डेंग्यूसदृश तापाचे हजारावर रूग्ण आढळल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. त्यामानाने वै़द्यकिय सोयी-सुविधा त्रोटक आहेत.  ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. … Read more

दैनिकाच्या संपादकावर आत्महत्येस प्रवूत्त करत असल्याचा महिलेकडून आरोप

अहमदनगर :- वेळ होती शुक्रवारी ४.३० ची परंतु पत्रकार परिषद घेणारे ५ वाजले तरी, दिसेना, पत्रकार ही वाट पाहून निघणार तोच रुद्र अवतार धारण केलेली ती महिला थेट हाँटेलच्या प्रेस काँफरन्स हाँलमध्ये आली. पाहातर काय शुक्रवाराची सांयकाळ वेगळीच झाली. चक्क त्या महिलेने एका मोठ्या दैनिकाच्या संपादकावरच दबाव आणून आत्महत्यास प्रवत्त करीत असल्याचा पत्रकार परिषदेत आरोप … Read more

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांकडून तब्बल पाच महिने लैंगिक अत्याचार

अहमदनगर –  श्रीगोंदे – गरीब कुटुंबातील १४ वर्षांच्या मुलीवर पाच महिने वेळोवेळी अत्याचार केले. ही मुलगी गर्भवती राहिल्याचे आईच्या निदर्शनास येताच बेलवंडी पोलिस ठाण्यात तिने शुक्रवारी फिर्याद दिली. भानुदास गंगाराम भिसे (३०) व नामदेव अंबू आडागळे (६५, दोघेही चिंभळे, धारकरवाडी) ही या  नराधमांची नावे आहे.  पोलिसांनी या नराधमांविरूध्द गुन्हा दाखल करत आडागळे याला अटक केली आहे.  तू मला … Read more

जिवे ठार मारण्याची धमकी देत दीराकडून तरुणीवर बलात्कार

श्रीरामपूर :- शहरातील गोंधवणी रोड वार्ड नं. १ परिसरात राहणाऱ्या एका २० वर्ष वयाच्या तरुणीला मागेरी शिवगाव येथे सोडण्याचा बहाणा करुन दुचाकीवर बसवून श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी परिसरातील दुर्गानगर भागात एका पत्र्याच्या खोलीत नेवून तेथे तिला जिवे ठार मारण्याची धमकी देवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला. दि. ५ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान गोंधवणी वार्ड नं. … Read more

VIDEO NEWS : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

अहमदनगर :- मोबाइलमध्ये असलेले मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नगरमध्ये घडला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून प्रवीण दिलीप जाधव याच्या विरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित मुलगी व आरोपी हे शेजारी-शेजारी रहायला आहेत. ते एकमेंकाचे ओळखीचे असल्याने मुलीबरोबर आरोपीने फोटो काढले होते. याच फोटोंचा … Read more

VIDEO NEWS : नगर जिल्ह्याच्या पाण्याची चिंता मिटली !

अहमदनगर :- नाशिक व नगरमधील धरणांतून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणी विसर्गामुळे जायकवाडी ६५.४१ टक्के भरले आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगरमधून आता जायकवाडीस पाणी सोडण्याची गरज नसून, दोन्ही जिल्ह्यांची चिंता मिटली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिकमधून ७५ टीएमसीवर पाणी विसर्ग जायकवाडीसाठी केला आहे. गंगापूर धरणात ९०.७१ टक्के साठा कायम असून, त्यातून … Read more

VIDEO NEWS : राम शिंदेंच्या फ्लेक्‍सबाजीवर सोशल मीडियातून टीका

कर्जत – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघातील कर्जत-जामखेड तालुक्‍यातील गावागावात विकास कामांचा हिशोब देणारे फ्लेक्‍स लावले आहेत.  यामध्ये गेल्या दोन टर्ममध्ये केलेल्या सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामांचा लेखाजोखा मांडलेला आहे. मात्र अपूर्ण कामे, कामांचा निकृष्ट दर्जा आदी मुद्दे घेत या फ्लेक्‍सबाजीवर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. ना. शिंदे यांनी गावागावातील विविध कामांवर कोट्यवधी रुपयांच्या … Read more

काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : आमदार तांबे

श्रीरामपूर | सध्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून जागतिक पातळीवर पाचव्या स्थानावरून सातव्या स्थानावर गेली आहे. याला नोटाबंदी हे एक कारण आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत. नवीन उद्योग सुरू नाहीत उलट अनेक कारखाने बंद पडले असून उत्पादन थांबले आहे. काँग्रेस पक्षाच्या काळात ही परिस्थिती नव्हती, असेही त्यांनी सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रेष्ठी ठरवतील … Read more

तरुणाचे कुऱ्हाडीने डोके फोडले

राहुरी – राहरी तालुक्यातील डिग्रस येथील राहणारा तरुण शेतकरी अभिजीत दिलीप कोकाटे, वय २१ याला त्याच्या दूध डेअरीसमोर ९ च्या सुमारास काही एक कारण नसताना ६ जणांनी वाईट वाईट शब्दात शिवीगाळ केली. तेव्हा अभिजीत कोकाटे हा समजावुन सांगत असताना त्याला लाथाबुक्क्याने लाकडी काठीने हातापायावर बेदम मारहाण करण्यात आली. कुऱ्हाडीने डोके फोडण्यात आले. दगडे मारुन तलवारीने मारुन … Read more

शरीरसुखाची मागणी केल्याने महिलेने घेतले पेटवून

कोपरगाव : तालुक्यातील मंजुर परिसरात राहणारी विवाहित महिला सौ. शोभा मधुकर पायमोडे, वय ३५ हिच्याकडे आरोपी शंकर पांडुरंग पायमोडे, वय ४० रा. मंजूर हा नेहमी वाईट नजरेने पाहत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याच्या त्रासाला कंटाळून शोभा मधुकर पायमोडे या महिलेने स्वत:ला पेटवून घेतले. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत शोभा यांचे पती मधुकर रामनाथ पायमोडे … Read more

व्याजाच्या पैशासाठी लाथाबुक्क्याने मारहाण करून, पळवून नेवून धमकी

नगर  – नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जवळा येथे राहणारे शेतकरी प्रशांत मारुती शिंदे, वय ३४ यांनी आरोपी जगदाळे यांच्याकडून घेतलेल्या पैशावरील व्याजाच्या पैशाच्या कारणावरुन आरोपींनी प्रशांत शिंदे या शेतकऱ्यास बोलावून घेतले. शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण करून धमकी देवून दुचाकीवर बसवून पळवून नेले. शेतकऱ्याच्या खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले व जिवे ठार मारण्याची धमकी … Read more

गल्लीत राहणाऱ्याकडून घरात घुसून बलात्कार

नगर  – नगर शहरात काटवन भागात एका गल्लीत राहणाऱ्या १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर ती घरी एकटी असताना गल्लीतच राहणारा आरोपी प्रविण दिलीप जाधव हा घरात आला व शरीरसंबंधाची मागणी केली. त्यावेळी अल्पवयीन तरुणीने विरोध करत आरडाओरडा केला. मात्र आरोपी प्रविण जाधव याने मोबाईलमध्ये असलेले दोघांचे फोटो मी व्हायलर करील, अशी धमकी देवून बळजबरीने अल्पवयीन … Read more

मुलाकडून आईचा खून

राहुरी – राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल ६८ वर्षीय वृद्ध मातेची पोटच्याच मुलाने दारुच्या नशेत डोक्यात टणक वस्तुने प्रहार करुन हत्या केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्यातील तांभेरे येथिल जगताप कंन्ट्रकशन्स या भागात ईदुबाई गोविंद लांडे, वय वर्ष ६८ व त्यांचा मुलगा राजेद्र गोविंद लांडे, वय वर्ष ४२ असे दोघे मायलेक राहत होते. राजेद्रचे लग्न … Read more

भुजबळ पती-पत्नीसह संबंधीत अधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग केंद्रात नेमणुकीस असलेले भुजबळ पती-पत्नी विरोधात सरकारची फसवणुक करुन अपहार केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना मोकळीक देणार्‍या संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या दक्षिण जिल्हा संघटक स्मिता आष्टेकर यांनी केली. या मागणीचे निवेदन जि.प. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांना देण्यात आले असून, याची प्रत सार्वजनिक आरोग्य विभागाचे … Read more