विद्यार्थ्यांनी बनविलेली कार“स्टुडन्ट कार्ट डिझाईन चॅलेंजेस” या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अव्वल

हैद्राबाद :- येथील भारतीय तांत्रिक विभागाच्या सोसायटी ऑफ मेकॅनिकल अँण्ड ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स या देशपातळीवरील मानाच्या स्पर्धेत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेली कार दाखल झाली असून, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कार माँडेल बद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी माहिती जाणून घेतली. कार तयार करण्यासाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक कराताना … Read more

पिचड यांना पवार साहेबांनी खूप काही दिले तरी त्यांनी पक्षांतर केले

पारनेर :- पिचड साहेबांनी पक्षप्रवेश केला कारण त्यांच्या पत्नीविरोधात फसवणुकीचे प्रकरण आहे. पिचड यांच्या पत्नी ज्या बिगर आदिवासी आहेत. त्यांनी खोटे आदिवासी सर्टिफिकेट दाखवून आदिवासी शेतकऱ्यांची जमीन लाटली आणि समृद्धी महामार्गाच्या नावावर सरकारकडून १४ कोटी ५० लाख रुपयांचा मोबदला घेतला. त्यामुळे पिचड यांनी भाजपत प्रवेश केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी … Read more

कारवाई होऊनही जुगार सुरूच

शेवगाव – येथील इंदिरानगर भागातील हनुमान मंदिराच्या आडोशाला जुगार खेळणाऱ्याकडून 16 हजार 110 रुपयांची रक्कम, 85 हजार रुपयांच्या तीन दुचाक्‍या व साहित्य असा एकुण एक लाख एक हजार 110 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी रात्री उशिरा केली. याबाबत गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.कॉं. प्रकाश वाघ यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. … Read more

पूरग्रस्त भागातील लोकांना सर्व प्रकारे मदत करणार : रोहित पवार

कर्जत – बारामती ऍग्रोच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील लोकांना मदत केली जाणार आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्‍न जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर मांडणार आहे. नदीकाठच्या गावांसाठी हा अडचणीचा काळ असून, पूर परिस्थितीत नागरिकांनी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन युवा नेते रोहित पवार यांनी केले. कर्जत तालुक्‍यातील पूरग्रस्तांची भेट पवार यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कर्जत तालुक्‍यातील खेड, औटेवाडी, … Read more

मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करणारच

कर्जत – तालुक्‍यातील 21 गावांसाठी संजीवनी देणाऱ्या तुकाई चारी योजनेसाठी 100 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर केले. अनेक पिढ्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने तुकाईचारीचा अनेक वर्षांचा प्रश्‍न मंत्रिपदाच्या माध्यमातून सोडविला. विविध विकासकामांसाठी भरभरून निधी, विविध योजना आणि खात्यांमधून आणण्याचे काम सातत्याने केले. यापुढेही मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करणारच आहे. शेवटी आपल्यातला तो आपलाच अन परका तो परकाच एवढं मात्र … Read more

माजी आमदार अनिल राठोडांच्या वाटेत काटे?

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उपनेते अनिल राठोड यांचे नाव निश्चित मानले जात होते. मात्र अचानक शिवसेनेकडून इच्छुकांची नावे पुढे येऊ लागली. माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या समर्थकांनी सुरुवातीला सोशल मिडियामध्ये कदम यांच्या उमेदवारीची चर्चा घडवून आणली. त्यावेळी शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली. कदम यांच्या समवेत राठोड व त्यांच्या समर्थकांची बैठकही झाली. त्यावेळी समर्थकांनी हा प्रकार … Read more

एमआयएम अहमदनगरची घराणेशाही संपविणार

अहमदनगर :- ज्यावेळी मी पहिल्यांदा अहमदनगरला आलो होते, त्यावेळी एखादी व्यक्तीही एमआयएमची जबाबदारी घेण्यासाठी तयार नव्हती. परंतु आता दिवस बदलले. आज सर्व तरुण पिढी या पक्षासोबत येण्यासाठी उत्सुक आहे. सर्व मुस्लिम, दलित व वंचित समाज ऑल इंडिया मजलिसे ए इत्तेहादुल मुस्लिमिनचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी व वंचित बहुजन आघाडीचे सर्वोसर्वा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाला … Read more

निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज माफी न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार !

अहमदनगर :- दुष्काळामुळे शेतकऱ्याचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडल्याने त्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील ग्रामस्थांनी दिला आहे. बाबुर्डी बेंद येथे शनिवारी झालेल्या ग्रामसभेत तसा ठराव करण्यात आला आहे. या ग्रामसभेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी देण्याबाबतचे … Read more

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कर्जत  – भीमा नदी दुथडी भरून वाहत असून, कर्जत तालुक्‍यातील सिद्धटेक पूल पाण्याखाली गेला आहे. वाहतुकीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असल्याने रविवारी (दि. 4) रात्री सात वाजल्यापासून दौंड पोलिसांनी पुलावरून सुरू असलेली वाहतूक बंद केली आहे. खेड-भिगवणमार्गे वाहतूक करण्याचे प्रशासनाच्यावतीने सूचित करण्यात आले आहे. चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भीमा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. … Read more

निळवंडे ओव्हरफ्लो…अनेक गावांचा संपर्क तुटला, पूल पाण्याखाली

अकोले :- मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला असून सर्वदूरच्या पावसामुळे तालुक्‍यामध्ये जनजीवन गारठले आहे. जनसंपर्क तुटलेला, वाहतूक विस्कळीत झालेली आणि घराच्या बाहेर पडण्यास धजावणारे कमी अशी स्थिती राहिली आहे. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांबरोबरच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याने सर्वच माहोल थंड राहिला. संथ गतीने का होईना, पण राज्य परिवहन महामंडळ बससेवा मात्र विना व्ययत्य सुरू … Read more

हर्षदा काकडे पुन्हा जनशक्‍ती संघटनेकडून निवडणूक रिंगणात

शेवगाव – शेवगावच्या राजकीय पटलावर घुलेंपाठोपाठ काकडे यांचे नाव घेण्यात येते. वर्षानुवर्ष घुलेंच्या विरोधात राजकारण करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानंतरही पक्षाकडून त्यांचा कोणताही विचार होत नसल्याने सध्या त्या कोणता पक्ष तिकिट देणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीची तयारी त्यांनी सुरु केली आहे. पण … Read more

आ. औटींची विधानसभेची उमेदवारी अडचणीत

पारनेर :- तालुक्याचे शिवसेनेचे आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या विरोधात नगर आणि पारनेर तालुक्यातील पदाधिका-यांसह शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर तक्रारीचा पाढा वाचला. त्यानंतर ठाकरे यांनी आ. औटी यांच्यावर नाराजी व्यक्त करत समज दिला. शिवसैनिकांची वाढती नाराजीमुळे आ. औटींची विधानसभेची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसैनिकांची वाढती नाराजीमुळे आ. … Read more

गोळीबारातून डॉक्टर बचावले, धाडसामुळे खंडणीखोर पकडले !

अहमदनगर :- शहरातील साई एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. जगदीश उत्तम चहाळ यांना ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघा जणांना डॉक्टर चहाळ यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून गजांआड केले. खंडणी म्हणून दिलेल्या पैशांच्या बॅगेमध्ये रद्दी कागद आढळल्यानंतर खंडणी मागणाऱ्या एकाने डॉक्टरवर गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली. डॉक्टर चहाळ यांनी प्रसंगावधान दाखवून गोळी हुकवून स्वतःला … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळली

पारनेर ;- राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळली असून, त्याचाच परिपाक म्हणजे बाजार समितीच्या नऊ संचालकांचे सामूहिक राजीनामे होय. हे राजीनामा धक्कातंत्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असल्याने राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेर तालुक्‍यात संघर्ष करावा लागेल. झावरे गटातील बाजार समितीच्या उपसभापतिंसह नऊ संचालकांच्या राजीनाम्यामुळे झावरे हे इतर पर्यायांच्या शोधात असल्याची चर्चा असून, तालुक्‍यात राजकीय भूकंप … Read more

भोजापूर धरण झाले ओव्हर फ्लो

अकोले – अकोले, संगमनेर व सिन्नर या तालुक्‍यांना सिंचनदृष्ट्या महत्त्वाचे असणारे भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले.त्यामुळे या तीनही तालुक्‍यांतील लाभार्थी क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. भंडारदरा 9.5 व निळवंडे सव्वाचार टीएमसी झाले असून, आढळा 70 टक्के भरले आहे. ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान भोजापूर धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी पाटात न सोडता, ते नदीपात्रातून संगमनेर … Read more

पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन आवश्‍यक

शेवगाव- पावसा अभावी परिसरातील पीके जळून चालली आहेत. सध्या पन्नास टक्‍क्‍यांच्यावर भरलेल्या मुळा धरणातून आव्हाणे परिसरातील टेलच्या गावांना किमान पिण्यासाठी एकतरी आवर्तन सुटावे अन्यथा हेच हक्काचे पाणी नंतर मराठवाड्यात निघून जाईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी वेळीच जागे होण्याची गरज आहे, पाण्यासाठी तरी राजकारण व्हायला नको असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले. तालुक्‍यातील आव्हाणे बु. येथे … Read more

स्थापत्य अभियंता लाचेच्या जाळ्यात

पाथर्डी  – जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी पाथर्डी पंचायत समितीचे स्थापत्य अभियंता पंढरीनाथ उत्तम आव्हाड यांनी चाळीस हजार रुपयांची लाच मागीतली होती. त्याची तक्रार केल्यानंतर आव्हाड यांना लाचलुचपत पथकाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. नवीन बसस्थानका शेजारील चहाच्या दुकानात सायंकाळी आव्हाड यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले आहे. याबाबत … Read more

जिल्ह्यातील 91 चारा छावण्यांना दंड

नगर – दुष्काळी भागात पाणी व पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या छावण्यामध्ये जनावरांना नियमित चारा मिळतो का? याची अचानक तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना सादर करून त्यांनी जिल्ह्यातील 91 चारा छावण्यांना 3 लाख 79 हजार 895 रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more