नगर शहरातून किरण काळे यांनी दिली मुलाखत,उमेदवारीवर ठोस दावा

अहमदनगर: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज पक्ष श्रेष्ठींसमोर नगर शहरातून आक्रमकपणे उमेदवारी मागितली. पक्षाचे प्रभारी आ. दिलीप वळसे पाटील, निरीक्षक अंकुश काकडे, माजी खा. देविदास पिंगळे यांच्या समोर काळे यांनी नगर शहरातील पक्षाच्या सद्यस्थितीचा पाढाच वाचला. विद्यमान आ. संग्राम जगताप यांनी आजच्या मुलाखती कडे पाठ फिरवली. त्यांच्या उमेदवारीची मागणी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने … Read more

आता मिळणार सात दिवसांआड पाणी

कोपरगाव | नगरपालिकेच्या येसगाव येथील चार साठवण तलावांत सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने दहा दिवसांऐवजी सात दिवसांआड पाणी पुरवले जाणार आहे. तालुक्यात एक जोरदार पाऊस पडल्यानंतर अद्याप म्हणावा असा पाऊस झालेला नाही. डाव्या आणि उजव्या कालव्याला सध्या पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहराला किमान पाच दिवसांआड, तरी पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील … Read more

त्यांच्या अभद्र युतीने शेतकऱ्यांची फसवणूक – मा.आमदार शंकरराव गडाख

नेवासे :- मागच्या वर्षी शासनाने गंभीर दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नेवासे घेतला. खरीप व रब्बी हंगामात दुष्काळाचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीला आला. पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी खरिपासाठी कर्ज काढले. मात्र, पिकं सुकून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालं. मशागतीचा खर्च वसूल झालाच नाही, कर्जाचा बोजा मात्र झाला. विम्याची भरपाई मिळेल एवढीच आशा असताना कंपनीने अंगठा दाखवल्याने शेतकरी हतबल होण्याची … Read more

झाडाला गळफास घेत चुलता-पुतणीची आत्महत्या

अकोले :- तालुक्यातील कोल्हार-घोटी राज्यमार्गालगत असलेल्या नागमोडी वळणाच्या विठे घाटात एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत स्त्री व पुरुषाचा मृतदेह बुधवारी दुपारी परिसरातील काही मेंढपाळांना दिसले. याबाबत खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हे मृतदेह चुलता व पुतणीचे असल्याचे समजते. याप्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, बुधवारी दुपारी साडेतीनच्या … Read more

ह्या दिवशी होणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आ.वैभव पिचड यांचा भाजप प्रवेश

अकोले :- राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. पक्षाने गुरूवारी घेतलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीलाही त्यांनी दांडी मारली. दरम्यान कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर लवकरच आ. पिचड यांच्याकडून याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 30 जुलैला मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. काल गुरुवारी आ. पिचड यांनी … Read more

आदित्य ठाकरेंनी लावलेले ‘ते’ झाड काही तासात गायब !

पारनेर – राज्यभरात नेतेमंडळी, सेलिब्रिटी वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होत नागरिकांचा जोश वाढवत आहेत. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे जनआशिर्वाद यात्रेनिमित्त पारनेर तालुक्यात आले होते. दौऱ्या दरम्यान ठाकरे यांच्या हस्ते काळेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. परंतु त्यांचा ताफा टाकळी ढोकेश्वरकडे रवाना होताच झाडच गुडब् झाले !. ठाकरेंनी लावलेले ते झाड गेले कुठे ? कोणी गायब केले … Read more

घरात झोपलेल्या तरुणीचा विनयभंग करुन पतीस मारहाण

संगमनेर :- तालुक्यातील पाचखिळवाडी कौठे मलकापूर परिसरात राहणारी एक २४ वर्षाची विवाहित तरुणी तिच्या घरात झोपलेली असताना याच भागात राहणारा आरोपी अनिल गावडे रा. पाचखळवाडी हा दरवाजा लोटून घरात घुसला. त्याने तरुणीचा हात धरला तेव्हा घाबरुन तरुणी उठली. अनिल गावडे याने तरुणीला धरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले व विनयभंग केला. पिडीत तरुणीने चुलत … Read more

मुलगा माझा नाही म्हणत पत्नीस मारहाण करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपूर :- शहरालगत असलेल्या दत्तनगर भागातील आंबेडकर वसाहत येथे राहणारे विवाहित तरुणी आरजू सलमान पठाण, वय २६ हिला तिचा पती सलमान मुख्तार पठाण, वय २७ याने पत्नी आरजू हिच्यावर शंका घेवून २ वर्षाचा मुलगा अफान हा माझा मुलगा नाही, असे म्हणत पत्नी आरजू व मुलगा अफान यांना मारहाण केली. यात मुलगा अफान सलमान पठाण हाही … Read more

‘त्या’ ५ महिलांना पकडले जाणून घ्या कारण…

अहमदनगर शहरात काल वेश्या व्यवसाय करणार्यांना काल छापा टाकून महिला व गिऱ्हाईकांना पकडले ते प्रकरण ताजे असतांना आज पुन्हा पोलिसांनी नगर शहरात बस स्टॅन्ड व माळीवाडा परिसरात पुरूषांकडे पाहून खानाखुनी करून अश्लिल हावभाव करणा- या ५ महिलांना पकडले. यामुळे अश्लिल कृत्य करणा-या महिलांना आपले तोंड रूमालाने बांधून पोलिस गाडीत बसण्याची वेळ आली. यावेळी महिला पोलिस … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतीला आ. जगताप – पिचड यांची गैरहजेरी !

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष निरीक्षक दिलीप वळसे व अंकुश काकडे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी भवन येथे गुरुवारी दि. २५ जुलै रोजी घेण्यात आल्या. कर्जत – जामखेड मतदार संघासाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मुलाखत दिली. तर या मुलाखतीला आ. संग्राम जगताप व आ. वैभव पिचड … Read more

आ.राहुल जगताप भाजपच्या वाटेवर ?

श्रीगोंदा :- राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे. गत काही दिवसांपासून मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात आ. जगताप यांच्या पक्षांतराचे वारे वाहत आहेत. भाजपच्या श्रेष्ठींकडूनही आ . जगताप हे गळाला लागण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल जगताप यांना … Read more

आमदार वैभव पिचड यांचा भाजप प्रवेशाची संबंध नाही !

अहमदनगर :- आमदार वैभव पिचड हे भाजप च्या वाटेवर असल्याच्या वृत्ताचे राष्ट्रवादीकडून खंडन करण्यात आले आहे. आ.पिचड यांच्या समर्थकांनी आमदार पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाहीत, मात्र काही राजकीय कामांच्या व्यतिरिक्त वैयक्तिक कामांसाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क म्हणजे भाजप प्रवेश असा प्रचार म्हणजे राजकीय अफवा आहे. आमदार पिचड यांच्या मुलीचा सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश यादीत नाव … Read more

लग्नाचे अमिष दाखवत औरंगाबादच्या विवाहितेवर अत्याचार, श्रीगोंद्यातील तरुणावर गुन्हा दाखल

अहमदनगर :- लग्नाचे आमिष दाखवत विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव येथील योगेश शिंदे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित महिला ही सध्या औरंगाबादच्या वाळुंज एमआयडीसी परीसरातील बजाजनगर सिडको येथे वास्तव्यास आहे. योगेश सिद्धेश्वर शिंदे (रा. घारगाव,ता.श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 2017 ते दि. 20 … Read more

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आणलीय…

श्रीगोंदे :- पंधरा दिवसांच्या आत एफआरपी देण्याचा नियम असताना मुख्यमंत्र्यांनी अभय दिल्यामुळे साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांचे पेमेंट थकवले. कायदा पाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी झटकल्यामुळे शेतकऱ्यांना हक्काच्या पैशांची भीक मागण्याची वेळ आली, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी मंगळवारी श्रीगोंदे येथे केला. गेल्या तीन दिवसांपासून संभाजी ब्रिगेडसह ऊस उत्पादकांचे कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल … Read more

अहमदनगर मध्ये रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक

अहमदनगर :- शहरातील गांधी मैदानाजवळील भगतगल्लीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला. रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली असून तीन बळी महिलांची सुटका करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहराच्या विविध भागात सेक्स रॅकेट सुरू आहेत. गांधी मैदानाजवळील भगतगल्लीत सेक्स … Read more

आमदार वैभव पिचड राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजप – सेनेच्या वाटेवर…

अकोला :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पूत्र आमदार वैभव पिचड भाजपमध्ये जाणार, अशी अफवा मागील काही दिवसांपासून होती. आज अखेर तीच अफवा खरी ठरू पाहत आहे. अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड भाजपचा गळाला लागले असून, आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दिवसभर खलबते सुरू असल्याचे … Read more

लग्न केले नाहीतर जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

श्रीगोंदा :- तालुक्यातील सांगवी दुमाला परिसरात राहणाऱ्या २३ वर्ष वयाच्या तरुणीशी गोड बोलून प्रेमसबंध केले. तू माझ्याशी लग्न केले नाहीतर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करुन घेवून तुझ्या कुटुंबाचे नावे चिठ्ठीत लिहून ठेवील, असे धमकावून आरोपी लखनकुमार काकडे, रा. सांगवी दुमाला याने इच्छेविरुद्ध वेळोवेळी जबरदस्तीचे शरीरसंबंध करुन बलात्कार केला. इतर आरोपींनी त्याला मदत केली.आरोपींनी संगनमत करुन … Read more

गाडी लावण्याच्या कारणावरून एकास कोयत्याने मारहाण

पारनेर : गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून एकास दोघजणांनी कोयत्याने मारहाण केल्याची घटना पारनेर तालुक्यातील कोहकडी शिवारात घडली आहे. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, कोहकडी येथे सोन्याबापू वसंत घावटे वय ३२ वर्षे रा.घावटे मळा,जा.शिरूर यांच्यात व ज्यातिराम कारखिले,नवनाथ कारखिले रा.राळेगण थेरपाळ, ता.पारनेर यांच्यात गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाले. … Read more