प्रियकरासाठी सासर सोडून आली माहेरी,पण लग्न करण्यास प्रियकराने दिला नकार अखेर प्रेयसीने केली आत्महत्या !

जामखेड – प्रियकरासाठी सासर सोडून माहेरी आलेल्या विवाहित महिलेसोबत लग्न करण्यास प्रियकराने नकार दिल्याने अखेर संबंधित विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सागर सुरेश डोके याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिणी बळीराम सदाफुले (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. … Read more

‘हे’ काम घेवून सुजित झावरे अजित पवारांच्या भेटीला

पारनेर -पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना सभापती पदावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादीच्या संचालक मंडळांनी सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांची भेट घेतली. सभापती प्रशांत गायकवाड यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या राष्ट्रवादीच्या संचालकांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेेते अजित पवार यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त करत बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर प्रशांत गायकवाड यांना एक … Read more

चोरीचा मोबाईल खरेदी करणाऱ्याला अटक !

अहमदनगर :- रात्रीच्या वेळी वांबोरी घाटात अडूवन मारहाण करत लूटमार करणारे प्रमुख आरोपी अद्याप फरारच आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या आरोपींकडून चोरीचा मोबाईल खरेदी करणाऱ्याला मात्र अटक केली आहे. पाच दिवसांपूर्वी नगरहून वांबोरीला चाललेल्या एका व्यावसायिकाला या आरोपींनी बेदम मारहाण केली होती. लूटमार करणाऱ्या प्रमुख आरोपींची नावे पोलिसांना समजली असली तरी आरोपी अद्याप … Read more

जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

श्रीरामपूर | गोंडेगाव येथील नवनाथ बन्सी म्हसे यांचा जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बन्सी म्हसे हे आपल्या कुटुंबासह झोपले असताना दरवाजा उघडून लाकडी दांड्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांचा मुलगा नवनाथलाही जबर मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा भावबंधाशी शेतीच्या वाद असून तो सध्या न्यायालयात आहे. याप्रकरणी … Read more

नापिकी मुळे वृद्ध शेतकऱ्याची नैराश्यातून आत्महत्या

शिर्डी :- लोणीपासून चार किलोमीटर अंतरावर गोगलगाव (ता. राहाता) येथील ७४ वर्षांच्या शेतकऱ्याने नापिकी आणि यावर्षी पेरलेले मका बियाणे उगवले नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली. बाबा महादू मगर असे त्याचे नाव आहे. संगमनेर रस्त्यावर गायकर लवणात त्यांची दोन एकर जमीन आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांनी हायटेक (सोना) ५१०१ कंपनीचे हायब्रिड मका बी पेरले होते. हे … Read more

अकोल्याची जागा भाजपला मिळाल्यास नक्की जिंकणार

अकोले :- अकोले विधानसभा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून ही जागा शिवसेना लढवते. मागील निवडणुकीत युती नसताना भाजप तीन नंबरवर राहिला. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत यश भाजपला मिळाले. लोकसभेत जरी तालुक्यातून पीछेहाट झाली असली, तरी खासदार सदाशिव लोखंडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी घेतलेली भूमिका आदिवासी जनतेला मान्य झाली नाही. अकोल्याची जागा … Read more

फोनवर किती बोलतेस?’ असे विचारल्याचा राग आल्याने आईचा मुलावर चाकूहल्ला !

नेवासे :- नेवासे तालुक्यातील गिडेगाव येथे ‘फोनवर किती बोलतेस?’ असे विचारल्याचा राग येऊन आईने मुलाचे तोंड दाबून त्याच्यावर चाकूने वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. जखमी विशाल दीपक साळुंखे (१८) याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची आई शोभा दीपक साळुंखे हिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी शाेभाला अटकही केली. सोमवारी … Read more

आ. भाऊसाहेब कांबळे कुटुंबात काम करणाऱ्या तरुणाच्या खून प्रकरणी एका आरोपीस अटक

श्रीरामपूर :- शहरातील आ. भाऊसाहेव कांबळे यांचे चिरंजीव संदीप कांबळे यांच्या भारत गॅस कंपनीत कामास असलेला कामगार सुरेश बळवंत वाघमारे, वय ३८ याचा दगडाने ठेचून खून झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा राबवून खुनातील एक आरोपी हेमंत उर्फ दत्ता किशोर शेळके, वय ३२, रा. संगमनेर रोड, शंकरभुवन, वॉर्ड नं. ३, श्रीरामपूर याला पोलिसांनी अटक … Read more

मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू !

अहमदनगर :- महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. आज महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये सभापती मुदस्सर शेख यांनी कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगा विषयावरील ठराव वाचून दाखवला; त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या ठरावाला एकमताने मंजुरी दिल्याने तो मंजूर करण्यात आला. सातवा वेतन आयोग लागू … Read more

राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह अंडा गँगच्या प्रमुखावर एमपीडीए अंतर्गत कारवाई

अहमदनगर : पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील वाळूतस्कर अवैध व्यावसायिकांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरसेवक समद वाहब खान (वय ४७ वर्षे रा.मुकुंदनगर) व शेहबाज उर्फ बाबा उर्फ बाबा अंडा जाफर खान (वय ३२ वर्षे रा.सदर) यांना ताब्यात घेवून नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे. याबाबत सविस्तर असे … Read more

नगर जिल्ह्यात अद्यापही पाणी टंचाई समस्या कायम

अहमदनगर – जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात पावसाने हजेरी लावली.परंतु  दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. जिल्ह्यातील 13 लाख 57 हजार 295 जनता पाणी टँकरवर अवलंबून आहे.  जिल्ह्यातील 487 गावे अणि 2 हजार 847 वाड्या वस्त्यांवर अजूनही 687 पिण्याच्या टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे.  जिल्ह्यातील 5 नगरपंचायातींच्या हद्दीत अद्याप पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. … Read more

भाजपला टोल नाक्याचे कर्मचारी घाबरतात !

सांगली :- भाजपचे ओळखपत्र असलेले कार्यकर्ते व नेत्यांना राज्यात टोल आकारला जात नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. या वेळी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे आणि प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे उपस्थित होते. भाजपच्या ओळखपत्रावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश सरचिटणीस यांची छायाचित्रे असल्याने टोल नाक्यावरील कर्मचारी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून … Read more

मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी पक्षात किती आमदार राहतील याची दक्षता घ्या !

शिर्डी :- आघाडीचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आपल्या पक्षात किती आमदार राहतील याची आधी दक्षता घ्यावी, असा प्रतिटोला गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार चांगले काम करत आहे. जनतेचा विश्वास सरकारवर आहे. राज्यात लोकसभेला मिळालेला जनाधार विधानसभा निवडणुकीतही … Read more

आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवाशाला चांगले दिवस आणले !

नेवासे :- ‘जय हरी’ असलेल्या आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बऱ्याच वर्षांनी नेवाशाला चांगले दिवस आणले आहेत. आता आमचे ठरले आहे. भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असे जाहीर आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना दिले. नागरी सत्काराला उत्तर देताना विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संगीता बर्डे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून अण्णा … Read more

आमदार पुत्राकडे काम करणाऱ्या तरुणाचा दगडाने ठेचून खून

श्रीरामपुर :- श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर परिसरात सोमवारी सकाळी डोक्यात दगड टाकून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे चिरंजीव संदीप कांबळे यांच्या भारत गॅस कंपनीत कामास असलेल्या सुरेश वाघमारे या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकारामुळे श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती … Read more

महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार !

अहमदनगर :- महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार असून राज्यातील विस्तारक, बूथप्रमुख, शक्तीकेंद्र व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर बहुमताचा आकडा सहज पार होणे शक्य होणार आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर, तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभारामुळे जगात एक नंबर असलेला पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताने सत्तेत येऊन मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे राज्याच्या प्रभारी खासदार … Read more

टँकरची धडक बसून श्रीरामपुरात एक ठार

श्रीरामपूर | शहरातील शिवाजी चौकातील वळणावर टँकरची (एमएच १७ एजी ९९८३) धडक बसून मोटारसायकलस्वार सुनील एकनाथ आदमाने (वय ५०) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. आदमाने (झिरंगेवस्ती, वॉर्ड नंबर १) हे नेवासे रोडकडे जात असताना त्यांना टँकरची जोराची धडक बसली. डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

विधानसभेला जिल्ह्यात १२-० असाच निकाल लागेल : राधाकृष्ण विखे

नेवासे :- पश्चिम वाहिनीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा माजी खासदार बाळासाहेब विखे यांचा प्रस्ताव केवळ श्रेय मिळू नये म्हणून मागील सरकारने बासनात गुंडाळला. पण फडणवीस यांनी या प्रस्तावाला प्रतिसाद दिला. निळवंड्याचा प्रश्न त्यांनी एक तासात मंजूर केला. विदर्भातून आलेल्या नेत्याला जे समजले, ते सत्ता गेली तरी आमच्या जुन्या नेत्यांना समजले नाही, असा टोला गृहनिर्माण मंत्री … Read more