वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

राहुरी :- तालुक्यातील बारागाव नांदूर येथे दोन वर्षांपूर्वी एकाने मुलीचे राहत्या घरातून अपहरण करीत ‘तुझ्यासह तुझ्या वडिलांना जिवे मारून टाकू’, अशी धमकी देत अत्याचार केल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी मुजफ्फर लतिफ पटेल याने सुमारे दोन वर्षांपूर्वी तरुणीला तिच्या वडिलांच्या राहत्या घरातून पळवून आणले. चुलतीच्या … Read more

शेवगाव तालुक्यात झालेल्या अपघातात एक ठार, ९ जखमी

शेवगाव :- राज्यमार्गावर सौंदाळा-नागापूर शिवारात रविवार दि. ३० जून रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या दरम्यान ॲपे रिक्षा व इंडिका कार यांची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात एक ठार, तर नऊ जण जबर जखमी झाले आहेत. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालय, श्वास हॉस्पिटल व नगर येथे हलविण्यात आले आहे. प्रवासी वाहतूक करणारी ॲपे रिक्षा … Read more

वीजवाहक तार अंगावर पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावाअंतर्गत असलेल्या भोईटे मळा येथे प्रवीण लक्ष्मण सुपेकर (वय २७) या तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीजवाहक तार तुटून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याला वाचविण्यासाठी गेलेली त्याची चुलतीही तारेला चिटकली होती, पण तिच्या मुलाने हातावर काठी मारून आपल्या आईला वाचवले आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि. ३०) दुपारी साडेतीन … Read more

खा. सुजय विखेंचा जनता दरबार हाऊसफुल्ल

अहमदनगर : जनतेचे प्रश्न व सर्वसामान्य माणसांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आयोजित केलेला जनता दरबार अक्षरश: हाऊसफुल्ल झाला होता. व्यक्तिगत अडचणींपासून सार्वजनिक प्रश्न घेऊन आलेल्या युवक, महिला व जेष्ठ नागरिकांची गर्दी डॉ. सुजय विखे पाटील यांना भेटण्यासाठी झाली होती. नागरिकांचे प्रश्न आवधानाने ऐकून, समजून घेत डॉ.विखे आपल्या स्वीय सहायकांना त्याबाबतच्या … Read more

रोहित पवार यांनी आ. जगताप पितापुत्रांना टाळले…

अहमदनगर :- रोहित पवार यांनी शनिवारी शहरातील पक्षाचे आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्याकडे कानाडोळा केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची भेट घेत बंद खोलीत गुफ्तगू केले. आ. जगताप पितापुत्रांना त्यांनी का टाळले, यावरून कुजबुज सुरू झाली आहे. गेले दोन दिवस रोहित पवार नगरमध्ये होते मात्र नगर … Read more

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

राहुरी :- तालुक्यातील मोमीन आखाडा येथील शशीकांत दत्तात्रय कोहकडे, वय २७ हा तरुण शेतक-याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान मोमीन आखाडा येथील शशीकांत कोहकडे हा संध्याकाळी २८ आपल्या शेतातील विद्युत मोटार चालु करण्यासाठी गेला असता विजेचा धक्का लागल्याने तो खाली पडला. त्याला नातेवाईकांनी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी … Read more

नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत आदिवासी तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्यास अटक

पारनेर :- लग्नाचे आमिष दाखवून, सोबत काढलेले फोटो आई-वडिलांना दाखवण्याची तसेच नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत आदिवासी तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पोखरी येथील संदीप बन्सी करंजेकर या तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पारनेर पोलिसांनी आरोपी संदीप यास अटक केली आहे. मजुरी करणाऱ्या आदिवासी तरुणीची सन २०१७ मध्ये संदीप करंजेकर याच्याशी ओळख … Read more

सेवानिवृत्त शिक्षकाकडून मुख्याध्यापिकेचा विनयभंग

पारनेर :- तालुक्यातील जामगाव येथील हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेस सेवानिवृत्त शिक्षक हरिभाऊ धोंडिबा मेहेर याने अश्लिल शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना शक्रवारी सकाळी घडली. मुख्याध्यापिकेच्या फिर्यादीवरून मेहेर याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जामगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एम. लंके हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे संस्थेचे सचिव महादू बाबू मेहेर यांनी पीडित मुख्याध्यापिकेची त्या … Read more

पालकमंत्र्याच्या नावाचा गैरवापर करुन ४ लाखाची फसवणूक

नगर :- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मिरजगाव येथे आरोपी अक्षय अविनाश शिंदे याने पालकमंत्री श्री. राम शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करुन श्रीकांत आनंदा मांढरे, धंदा शेती, रा. बेलगाव, ता. कर्जत यांची व त्यांचे मावस माऊ जयवंत रामचंद्र गायकवाड यांना शासकीय नोकरीला लावतो, असे म्हणून दोघांकडून प्रत्येकी २ – २ लाख रुपये रोख रक्कम असे एकूण ४ … Read more

पैशाची मागणी करते म्हणून प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकरास अटक

पारनेर :- वारंवार पैशाची मागणी करणार्या आपल्या प्रेयसीचा खुन करुन पसार झालेल्या प्रियकराला मुंबईहुन अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश मिळाले आहे. पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे काल ता.28 रोजी सायंकाळी ही घटना घडली. मात्र गुन्हा दाखल होताच पारनेर पोलिसांनी आरोपी गोविंद सुरेश ढवण रा .कोहकडी ता. पारनेर यास अवघ्या बारा तासात जेरबंद केले. … Read more

विवाहबाह्य संबंधातून विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या

पारनेर :- तालुक्यातील कोहकडी येथे विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शुक्रवार संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. संध्या सुभाष गव्हाणे (२२) असे या तिचे नाव असून विवाहबाह्य संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. गव्हाणे कुटुंबीय भटक्या समाजातील असून गेल्या काही वर्षांपासून ते कोहकडी येथे मोलमजुरीसाठी स्थायिक झाले आहेत. मृत संध्याचे चार वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या … Read more

बियरबारमध्ये झालेल्या भांडणात मॅनेजरचा मृत्यू

राहुरी :- तालुक्यातील राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात महिन्याभरापूर्वी बियरबार हॉटेलातील प्राणघातक हल्ल्यात गंभिर जखमी झालेले मॅनेजर नरेद्र सदानंद शेटे यांचे उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने पोलिस ठाण्यात आरोपींवर भादवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा वाढीव गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गुन्हेचे गांभिर्य ओळखुन पोलिस निरिक्षक हनुमंतराव गाढे यांनी तत्काळ ३०७, ३२६ चा गुन्हा दाखल केला होता. तर … Read more

महिलेच्या अंगावरील कपडे फाडत जिवे ठार मारण्याची धमकी

संगमनेर  – संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथे राहणा-या ३४ वर्ष वयाच्या महिलेने माझ्या सासूला शिवीगाळ का केली? असा जाब विचारल्याने दोघा आरोपींनी तुम्ही सामाईक रस्ता वापरायचा नाही, असे म्हणत महिलेची गचांडी धरुन धक्का बक्की करुन अंगावरील कपडे फाडून लजा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला. शिवीगाळ करत जिवे ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली. पिडीत … Read more

भररस्त्यात महिलेस शिवीगाळ करत शरीरसुखाची मागणी

अहमदनगर :- भररस्त्यात महिलेस शिवीगाळ करत शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात उघडकीस आली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरात सिव्हील हडको कॉलनी गणेश चौक, तपोवन रोड साईनगर भागात राहणारी एक तरुण महिला मिस्कीन मळा रोडने मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना तेथे येवून आरोपी प्रशांत प्रभाकर सराईवार, रा. सिव्हील हडको कॉलनी, … Read more

तरुणीचा खून करून मृतदेह फेकला

नेवासा – तालुक्यात तरुणीचा खून करून मृतदेह रस्त्यावर टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि महालक्ष्मी हिवरे परिसरात राहणारी तरुणी ज्योती सर्जेराव उर्फ बाळासाहेब गायके (वय २७) हिला अज्ञात आरोपीने कशानेतरी मारहाण करुन जखमी केले, तिला अज्ञात कारणावरुन मारहाण करुन कशाने तरी ज्योती गायके हिचा गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील एकाच गावातून पळून गेलेले सैराट जोडपे ताब्यात

श्रीगोंदा : तालुक्यातील एकाच गावातून पळून गेलेले सैराट ज़ोडपे श्रीगोंदा पोलिसांनी मुंबई येथे ज़ाऊन ताब्यात घेतले असून, या दोघांना श्रीगोंदा पोलिस स्टेशनला आणले आहे. एक दुसऱ्याविषयी असलेल्या आकर्षणातून अल्पवयातच अनेक मुले व मुली घरच्यांचा विचार न करता पळून जात आहेत. याबाबत पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर या सैराट जोड्या पकडण्याचा ताण पोलीस यंत्रणेवर पडत आहे. तालुक्यातून … Read more

प्रेमवेड्या कबीर सिंहने बॉक्स ऑफिसवर कमाविले इतके ‘कोटी’

अहमदनगर :- शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या शहीद कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘कबीर सिंह’च्या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. मोठ्या कालावधीनंतर ‘कबीर सिंह’च्या रुपाने शाहीदने एक सुपरहीट चित्रपट दिला असून हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या वर्षातला सर्वात जलद 100 कोटी रुपये कमावणारा ‘कबीर सिंह’ दुसरा चित्रपट ठरला आहे. अहमदनगर Live ला मिळालेल्या माहितीनुसार कबीर … Read more

गळफास घेत दोघांनी केली आत्महत्या

कोपरगाव :- शहरातील दोघांनी स्वतंत्र घटनांमध्ये आपल्या राहत्या घरी बुधवारी गळफास घेत आत्महत्या केली. गांधीनगर भागात इनडोअर गेम हॉलजवळ राहणाऱ्या नीलेश किसन दरंदले (वय ३७, महादेवनगर) यांनी राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेतला. शहरातील औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या किरण विजय चव्हाण (वय १३) या शाळकरी मुलीने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. दोन्ही घटनांबाबत संतोष … Read more