पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनी नगरकरांचा अभूतपूर्व उत्साह जिल्ह्यातही विविध ठिकाणी योगदिन उत्साहाने साजरा

अहमदनगर :- पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिन देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नगरकरांनी आणि संपूर्ण जिल्हावासीयांनी यात सहभाग नोंदवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. जिल्हा क्रीडा संकुलातील  मुख्य कार्यक्रमाबरोबरच तालुकास्तरावरील योगदिनाचे कार्यक्रम आणि प्रत्येक शाळांमध्ये झालेल्या कार्यक्रमात 14 लाखांहून अधिक विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. राज्याचे पणन व वस्त्रोद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे … Read more

शाळेमध्ये जाणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा दोघांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न

राहुरी : – बारागाव नांदूर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा दोघांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. राहुरी पोलिसात राजमोहम्मद उमर शेख वय वर्ष ५० धंदा नोकरी उर्दू शाळा शिक्षक यांच्या फिर्यादीवरुन आज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गुरूवारी रोजी मुस्कान, वय (१३) ही इयत्ता ८ वी मध्ये … Read more

विवाहितेस विष पाजून खुनाचा प्रयत्न

राहुरी :- पैशांच्या कारणातून विवाहित तरुणीस विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरातील भुजाड़ी इस्टेट मल्हारवारी रोड मुथा कुटुंबीय वास्तव्यास आहे, विवाहित तरुणी सौ. संजना श्रीपाल मुथा, वय २९ हिला तिचा नवरा श्रीपाल चंदनमल मुथा याला बँकेची हप्ते भरण्याचे पैसे मागितले असता तो म्हणाला की, पैसे … Read more

रेशन दुकान चालक महिलेची छेडछाड

नगर :- शहरातील एका पतसंस्थेच्या रेशन दुकानात एक ४५ वर्षाची महिला काम करत असताना तेथे येवून आरोपी राहुल रतन त्रिभुवन, रा. दिल्ली गेट, सातभाई गल्ली, नगर याने दुकानच्या काऊंटरवर रेशन कार्ड आपटून जोरजोराने आरडाओरड करत माझ्या रेशनकार्डवर शिक्का दाखवा. तुम्ही माझे जाणून बुजून रॉकेल बंद केले, असे म्हणून शिवीगाळ करु लागला. दुकान चालक महिलेशी हुज्जत … Read more

हुंड्याचे पैसे न पोहचल्याने पिस्तुल लावून मारहाण

नगर :- तालुक्यातील घोडकवाडी, घोसपुरी भागात राहणारा तरुण शिवदास रामदास भोलसे, वय २५ याला व त्याचे वडील रामदास भोसले या दोघांना हुंड्याचे पैसे देणे बाकी असल्याने ते पैसे शिवदास भोसले याचा मेव्हणा आरोपी क्र. १ याच्याकडे दिल्याने ते पैसे सासरे यांच्याकडे पोहोच न झाल्याने वाद झाला. दोघा आरोपींनी शिवदास भोसले व त्याचे वडील रामदास भोसले … Read more

विखे परिवार भाजपवासी झाल्याने जि.प अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा

संगमनेर :- विखे परिवार भाजपवासी झाल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केली. विखे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या असल्याने जिल्हा परिषद सदस्यत्व आणि अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. नगर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेस श्रेष्ठींच्या आदेशाने अध्यक्षपदाची माळ भाजपचे नवे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांची … Read more

अल्पवयीन मुलाचा वापर करून स्टेट बँकेतून भरदिवसा अडीच लाख पळवले

नेवासा :- शहरातील स्टेट बँकेतून भर दिवसा अडीच लाखाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी दि.20 दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. ग्राहकाने जमा केलेली रक्कम कॅशीअरने भारतीय स्टेट बँक शाखेच्या काउंटरवरच ठेवल्याने दोन अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत या रकमेवर डल्ला मारला. अल्पवयीन मुलाचा वापर करून स्टेट बँकेच्या नेवासे शाखेतून अडीच लाख रुपये पळवण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये … Read more

अल्पवयीन युवतीचे अपहरण करणाऱ्या तरुणास अटक

राहुरी :- अल्पवयीन युवतीचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी बुधवारी रात्री आडगाव (नाशिक) येथे ताब्यात घेतले. महाविद्यालयात जात असताना १७ रोजी या युवतीचे अपहरण करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय जाधव हे तपास करत होते. निरीक्षक गाडे यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तपासाची चक्रे फिरवण्यात आली. सहायक फौजदार जाधव, काॅन्स्टेबल महेंद्र गुंजाळ … Read more

पैशाच्या वादातून खून करत आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

अहमदनगर :- व्याजासह मुद्दल देऊनही पैशासाठी तगादा सुरू असल्याने वैतागलेल्या कर्जदाराने दुकानदाराच्या डोक्यात वार करत खून केला. गुरुवारी रात्री दहा वाजता नगर-मनमाड रस्त्यावरील पाईपलाईन रोडकडे जाणाऱ्या चौकात ही घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. योगेश बाळासाहेब इथापे हे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यानंतर आरोपी कृष्णा रघुनाथ गायकवाड हा स्वतःहून तोफखानाा पोलिस ठाण्यात हजर … Read more

वासन टोयोटा शोरुममध्ये पहिल्या टोयोटा ग्लॅन्झा कारचे वितरण

अहमदनगर :- कार उत्पादन क्षेत्रात नावाजलेल्या टोयोटा आणि सुझुकी कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने निर्माण करण्यात आलेल्या नवीन टोयोटा ग्लॅन्झाचे नगर-पुणे महामार्ग, केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये वासन उद्योग समुहाचे चेअरमन विजय वासन, शोरुमचे जनक आहुजा, टोयोटा कंपनीचे एरिया मॅनेजर (महाराष्ट्र व गोवा) सुजीत नायर व वासन टोयोटाचे सीईओ सुरेंद्र पुजारी यांच्या हस्ते पहिल्या गाडीचे वितरण सौ.रचना … Read more

शेतजमीन व दुचाकी, चारचाकी असलेल्यांना आता रेशनचे धान्य मिळणार नाही !

अहमदनगर :- अपात्र शिधापत्रिकांची शोधमोहीम शासनाने सुरू केली आहे. दुचाकी, तसेच चारचाकी वाहन नावावर असलेल्या शिधापत्रिकाधारकांना आता धान्याचा लाभ मिळणार नाही. शेतजमीन नावावर असलेल्यांनाही रेशनच्या धान्यास मुकावे लागण्याची शक्यता आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, केंद्र शासनाकडून आलेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत. … Read more

आईला मुलगा व सुनेकडून मारहाण

श्रीरामपूर – जन्मदात्या आईलाच मुलगा व सुनेकडून मारहाण झाल्याची संतापजनक घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील भामाठाण येथे राहणारी वृद्ध महिला सुंदराबाई जयराम तांदळे, वय ६५ यांना आरोपी बाळासाहेब जयराम तांदळे याने घरगुती कारणातून बेदम मारहाण करुन डोके फोडले तर त्याची पत्नी सौ. निर्मला बाळासाहेब तांदळे हिने विळी फेकून मारुन जखमी केले. मुलगा व सुनेने … Read more

बायकोने नकार दिल्याने नवऱ्याने फोडले डोके !

नेवासा :- बायकोने नकार दिल्याने नवर्याने रागाच्या भरात तिचे डोके फोडल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. याबाबत सविस्तर असे कि,सलाबतपूर भागात राहणारी विवाहित महिला सौ. सुनिता शंकर गवळी, वय ३३ ही तरवडी, ता. नेवासा येथे असताना तेथे पती शंकर भाऊराव गवळी, रा. सलाबतपूर, ता. नेवासा हा आला व तू माझ्यासोबत चल, असे बोलला. तेव्हा पत्नी … Read more

कानिफनाथांच्या दर्शनासाठी नवर्‍याबरोबर आलेल्या नववधूचे प्रियकराबरोबर पलायन…

पाथर्डी – नवे लग्न झाल्यानंतर देव दर्शनासाठी नवर्‍याबरोबर आलेल्या नववधूने प्रियकराबरोबर पलायन केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,तीन दिवसांपूर्वी विवाहाबद्ध झालेली वधुवराची जोडी मढी येथे चैतन्य कानिफनाथांच्या दर्शनासाठी आली. दरम्यान मोटरसायकलवरून देवदर्शनासाठी आलेल्या या नवदांपत्याच्या पाठीमागेच या नववधूचा प्रियकर सुद्धा मढी येथे येऊन पोहोचला. नियोजनाप्रमाणे नवरीने नवर्‍याला मोटरसायकल … Read more

पालकमंत्री प्रा.राम शिंदे अहमदनगर जिल्ह्यासाठी कुचकामी

अहमदनगर :- निष्क्रीय मंत्रींना डच्चू दिलेल्या भाजपच्या निर्णयाचे मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने स्वागत करण्यात आले असून, प्रा.राम शिंदे यांना पालकमंत्री पदापासून हटवून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली. महाराष्ट्राचे मागील गृहनिर्माण मंत्री प्रकाश … Read more

…तर खा.सुजय विखे आणि खा. सदाशिव लोखंडेंची खासदारकी जाणार

अहमदनगर :- दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह मतदारसंघातील 19 उमेदवार व शिर्डी लोकसभा मतदार संघातील खासदार सदाशिव लोखंडे व 20 उमेदवारांनी 22 जूनपर्यंत आपला निवडणूक खर्च आयोगाकडे सादर करावा, असा अल्टिमेटम निवडणूक खर्च निरीक्षक अजित मिश्रा यांनी या उमेदवारांना दिला आहे. 22 पर्यंत खर्च सादर केला नाही तर निवड अपात्र ठरविण्यात … Read more

आमदार राहुल जगताप यांना योग्य अभ्यास करण्याची आवश्‍यकता

श्रीगोंदा – घोड कुकडी प्रश्नी राजकीय हस्तक्षेप नको म्हणणाऱ्या आमदार राहुल जगताप यांना योग्य अभ्यास व माहिती घेण्याची आवश्‍यकता असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते गणपतराव काकडे, पोपटराव खेतमाळीस व युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मंत्र्यांनी कुकडी प्रश्नी हस्तक्षेप केला नसता तर मागील आवर्तन मिळाले असते का? … Read more

प्रेयसीच्या जाचास कंटाळून प्रियकराची आत्महत्या !

राहुरी :- प्रेयसीच्या जाचास कंटाळून प्रियकराने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या प्रेयसीला अटक केली आहे. तालुक्यातील मानोरी येथे १५ जून रोजी दुपारी ही घटना घडली़ शरद सर्जेराव चव्हाण (वय ३१ रा़ बºहाणपूर ता़ नेवासा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे़. या घटनेनंतर मयताचा भाऊ संतोष … Read more