राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरातून सहा लाखांचा गुटखा जप्त

जामखेड :- नान्नज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या घरातून सहा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. अमजद निजाम पठाण याच्या घरात गोवा – १००० गुटख्याचा साठा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषणने जप्त केला. या गुटख्याची किंमत सहा लाख दहा हजार रुपये आहे. कारवाईची चाहूल लागल्याने आरोपी अमजद पठाण फरार झाला. पठाण हा राष्ट्रवादी … Read more

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

संगमनेर | मालट्रकची धडक बसून दुचाकीस्वाराचा संगमनेर खुर्द येथे मृत्यू झाला. हारुन शेखलाल बागवान (वय ३७, संगमनेर खुर्द) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. रमजान ईदच्या आदल्या दिवशी झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  पुण्याकडून संगमनेरकडे भरधाव येत असलेली महिंद्रा लॉजिस्टीक कंपनीच्या मालट्रकची (एनएल ०१ एल १७३५) समाेरून … Read more

खा.सुजय विखेंसमोरच कॉंग्रेस – भाजप पदाधिकार्यांचा राडा !

अहमदनगर :- पाथर्डी तालुक्यात आयोजित एका कार्यक्रमात खा.. सुजय विखे यांच्यासमोरच काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकार्यांच राडा झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आज माजी आमदार स्व. दगडू पाटील बडे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमात तु काँग्रेसचा आहे भाजपचे खासदार यांच्या पुढे पुढे का करतो असे म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या कानाखाली लावली, खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासमोरच … Read more

वृद्ध जोडप्यास हातपाय बांधून, तोंडात बोळे कोंबून, चाकूचा धाक दाखवून लुटले

पारनेर :- तालुक्यातील डोंगरवाडी काटकवेड येथे राहणारे जनार्दन डोंगरे व त्यांच्या पत्नी सो, सीताबाई जनार्दन डोंगरे या वृद्ध दाम्पत्याकडे काल दुपारी ३. १५ च्या सुमारास भरदिवसा चार अनोळखी चोरटे घरी आले व त्यांनी पाणी पिण्याचा बहाणा करुन पाणी मागत घरात घुसले. चौघा आरोपींनी वृद्ध सीताबाई  जनार्दन डोंगरे, वय ७० व त्यांचे  पती जनार्दन डोंगरे या दोघांचे … Read more

ब्रेकिंग : झाड तोडल्याने शेतक -याचा खून !

अकोले :- बांधावरील झाड तोडल्याने थेट एका शेतक-याचा खून करण्याचा प्रकार घडल्याने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे. बांध हा विषयी सर्वत्र किती वादग्रस्त आहे या प्रकारातून पुन्हा एकदा समोर आले आहे. अकोले तालुक्यातील रुम्हणवाडी येथील शेतकरी निवृत्ती तुकाराम सूर्यवंशी, वय ४८. यांचा लाकडी दांड्याने मारुन खून करण्याचा खळबळजनक प्रकार काल १०: ३० रोजी घडला आहे. … Read more

बेकायदेशीर दारु विक्री पोलिसांनी पकडल्याने महिलेने केले ‘हे’ कृत्य…

शिर्डी – शिडींतील गुंडगिरी व अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई सुरु केली आहे. शिर्डी परिसरात बेकायदेशीर दारु विक्री होत असल्याची गुप्त खबर मिळाल्यावरुन काल रात्री 8:05 च्या सुमारास सौंदडी बाबा मंदिराजवळ कालिकानगर भागात छापा टाकला. या ठिकाणी पोलिसांनी भिंगरी दारुच्या बाटल्या, किंगफिशर दारुच्या बाटल्या, फ्रिजमध्ये असल्याच्या स्थितीत पकडल्या. पोलीस छापा टाकून कारवाई करत … Read more

अल्पवयीन मुलीला भरदिवसा अमिष दाखवून फुस लावून पळवले.

संगमनेर :- तालुक्यातील बिरेवाडी परिसरात राहणा-या एका कुटुंबातील १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला भरदिवसा दुपारी १ ते २ च्या सुमारास काहीतरी अमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी घारगाव पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. प्रविण आनंदा डोंगरे असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुरनं. १४३ दाखल … Read more

विरोधीपक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला !

मुंबई :- राज्याचे विरोधीपक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे . विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विधीमंडळात जाऊन विखे – पाटील यांनी राजीनामा दिला. दरम्यान विखे पाटलांच्या राजीनाम्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आघाडीचा प्रचार करणं देखील टाळलं होतं. त्यानंतर त्यांचा … Read more

विधानसभेला ईव्हीएम असेल तर विरोधकांनी न लढलेलचं बरं !

अहमदनगर :- विधानसभेला ईव्हीएम असेल तर विरोधकांनी न लढलेलचं बरं अशा आशयाची शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. वाचा संजीव भोर यांची पोस्ट – सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम मॅनेज करून पकड मजबूत केली आहे. खरे तर या वेळेसच लोकसभेचे इलेक्शन्स बॅलेट पेपरवर व्हायला हवे होते. मात्र विरोधकांच्या अनेक वर्षांच्या सत्तेतील … Read more

आ. जगतापांच्या वाईनशॉपमध्ये राडा

अहमदनगर – आमदार राहुल जगताप यांच्या फॅमिली मालकीच्या सावेडीतील प्रकाश  वाईनशॉपमध्ये हल्लेखोरी अंगलट आल्याने त्याला जेलवारी करावी लागली. ही घटना काल रविवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आशीष रघुवीर गायकवाड या हरामखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्याचे दोन जोडीदार मात्र पसार झाले. वाईनशॉपीचे मॅनेजर किशोर अशोक घेगडे (वय ३१, रा. शिरूर, पुणे) … Read more

गळफास घेवून तरुणाची आत्महत्या

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील समनापूर थील अशोक ममाजी खरेदे (वय ४५)  घराच्या पत्राशेडच्या लोखंडी अँगलला हिटरच्या वायरीच्या राहाय्याने गळफारा घेवून आत्महत्या  केल्याची घटना रविवार २  जून सकाळी अकरा वाजेच्या पूर्वी घडली आहे गावाबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहितो अशी की, अशोक मामाजी सरोदे हे अपल्या कुटुंबाबबत समनापूर ठिकाणी राहत होते. रविवारी सकाळी अकरा वाजेच्या पूर्वी घरात … Read more

पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय ?

अहमदनगर :- राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ तारखेला सुरु होणार आहे. मात्र हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते कार्यालयातील सामानाची आवराआवर सुरू केली आहे. आता विखे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही विधिमंडळातील विरोधी पक्षनेते कार्यालयाच्या कामाच्या जबाबदारीतून रिक्त होण्याच्या दिल्या सूचना दिल्या आहेत.  पुत्र सुजय विखे … Read more

आ. थोरात यांना उत्कृष्ट विधायक पुरस्कार जाहीर

संगमनेर : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण वारसदार म्हणून संपूर्ण राज्यात परिचित असलेले राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना मानाचा उत्कृष्ट विधायक पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे येथील ब्रम्हकेसरी सांस्कृतिक पत्रिकेच्या वतीने दिल्या जाणा-या या पुरस्कारासाठी यावर्षी आ. थोरात यांची निवड या संस्थेने केली आहे. राज्याच्या सामाजिक शैक्षणिक, क्रीडा, समाजकारण राजकारण, कृषी, सहकार … Read more

पंचायत समितीच्या गाडीखाली चेंगरून चिमुकलीचा मृत्यू

जामखेड :- पंचायत समितीच्या हातपंप दुरुस्ती करणाऱ्या गाडीखाली चेंगरून पाच वर्षांच्या अनुजा गणेश कोल्हे (राजुरी) या चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेने राजुरी परिसरात शोककळा पसरली. राजुरी हे गाव शिर्डी-हैदराबाद महामार्गावर जामखेडपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. अनुजा ही रविवारी दुपारी चार वाजता कोल्हेवस्तीवर रस्ता ओलांडत असताना तालुका पंचायत समितीची हातपंप दुरुस्तीची गाडी जामखेडकडे येत असताना … Read more

प्रेम प्रकरणातून जन्माला आलेल्या मुलीस साईमंदिरात सोडून गेलेली माता सापडली

शिर्डी :- साईमंदिर परिसरात ३१ मे रोजी सहा महिन्यांच्या चिमुकलीस सोडून देणारी माता अखेर सापडली आहे. प्रेमप्रकरणातून या मुलीस जन्म दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील कडुली गावातील ही माता आहे.  ३१ मे रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास साईमंदिरालगत असलेल्या गुरुस्थानजवळ सहा महिन्यांची मुलगी रडताना भाविकांना दिसली होती. सुरक्षा विभागाने या मुलीस संस्थानच्या … Read more

येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा भाजपमय – डॉ.सुजय विखे

कोपरगाव : देशात आणि राज्यात भाजप महायुतीची लाट असून त्याचा प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाच भाजपमय करून सर्वच्या सर्व जागा भाजपा – सेना महायुतीच्या निवडून आणून बारा विरुद्ध शून्य असा इतिहास घडविण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी … Read more

एसटीच्या वर्धापनदिनालाच पारनेर एसटी आगारात मारामाऱ्या !

पारनेर :- एसटीच्या वर्धापनदिनीच आगारातील एका सुरक्षा रक्षकाने आगारात मोटारसायकल नेण्यासाठी मज्जाव केल्यानंतर दोन्ही बाजूंनी वाद होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार शनिवारी दुपारी पारनेर आगारात घडला.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर एसटी आगारात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास वीज मीटरचे रिडींग घेण्यासाठी नवनाथ व्यवहारे हा चालला असताना सुरक्षारक्षक रामचंद्र तराळ यांनी त्यास मोटारसायकल आत नेण्यास विरोध केला.  … Read more

किडन्या काढून घेण्याची धमकी दिल्याने तरुणाची घरात गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर- पैसे न दिल्यास तुझ्या दोन्ही किडन्या काढून घेऊ अशी धमकी दिल्याने अहमदनगर येथील एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी गोकुळ कालिदास सरोदे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अंकुश कालिदास सरोदे (वय 30) याने अमित चोरडिया यांच्याकडून 50 हजार रुपये व्याजाने घेतले … Read more