कर्जत-जामखेडमधून रोहित पवार यांची उमेदवारी निश्चित

जामखेड : साहेब रोहितदादांना उमेदवारी द्या, ते निवडून येतील,’ असे साकडे जामखेडमधील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांना घातले. यावर पवारांनी दिलेली दिलखुलास दाद कार्यकर्त्यांमध्ये योग्य तो संदेश देणारी ठरली. यावेळी गाडीत मागे बसलेल्या रोहितकडे कटाक्ष टाकत ‘तुझी मागणी झाली’ असे पवार म्हणताच कार्यकर्त्यांना कामाला लागा असाच संदेश गेला. पवारांची भेट अन् कार्यकर्त्यांच्या मागणीवर पवारांनी दिलेली … Read more

नगरसेवकाकडून नगरसेविकेचे अपहरण करून पिस्तुलाचा धाक दाखवत,गुंगीचे औषध देऊन बलात्कार

पुणे :- औरंगाबाद महानगरपालिकेतील एमआयएमचा बडतर्फ नगरसेवक मतीन रशीद सय्यद याने औरंगाबाद मनपातील नगरसेविकेचे अपहरण करून पिस्तुलाचा धाक दाखवत तसेच गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच मतीन सय्यद याचा भाऊ माेहसीन रशीद सय्यद व मेहुणा हामेद सिद्दिकी यांनीही आपला विनयभंग केल्याचे नगरसेविकेने म्हटले आहे. याबाबत पीडित नगरसेविकेने चाकण पाेलिस ठाण्यात तक्रार … Read more

आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तरुणास अटक

कोपरगाव :- दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असा व्हिडीओ व्हॉटसअॅप ग्रूपवर अपलोड करणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली. कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असा व्हिडीओ आकाश नानाभाऊ खडांगळे (राहणार १०५ हनुमाननगर) याने ‘आकाशभाऊ खंडागळे युवा मंच’ या व्हॉट्सअप ग्रूपवर टाकला. या प्रकरणी इमरान कालू कच्ची (वय २९) याने कोपरगाव शहर पोलिसांकडे तक्रार दिली. या … Read more

प्रेमीयुगुलाचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह विहिरीत सापडले

शेवगाव :- तालुक्यातील हिंगणगाव येथील प्रेमीयुगुुलाचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह गावातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान त्यांनी आत्महत्या केली की घातपात झाला, याबाबत दोन्ही कुटुंबीयांकडून आरोप-प्रत्यारोप होत असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांना काहीही हालचाल करता आली नाही. शवविच्छेदनही होऊ शकले नाही. हा प्रकार रविवारी रात्री विहीरमालक संपत मिसाळ यांच्या लक्षात आला. सोमवारी पोलिस व ग्रामस्थांनी … Read more

टायर फुटल्याने धावती कार पलटली,प्रा. स्नेहजा प्रेमानंद रुपवते यांचा मृत्यू

अहमदनगर :- लग्नसोहळ्यास उपस्थिती देऊन मुंबई येथे जात असताना कारचे मागील टायर फुटल्याने कार पलटून झालेल्या अपघातात माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या ज्येष्ठ कन्या प्रा. स्नेहजा प्रेमानंद रुपवते (वय ६४) यांचा मृत्यू झाला. गाडीचे टायर फुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक बसून गंभीर जखमी झालेल्या वासुदेव दशरथ माळी (२६) रा.आसोदा यांचा रूग्णालयात मृत्यू झाला. … Read more

Whatsapp च्या माध्यमातून चालणाऱ्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नाशिक :- Whatsapp वरून सुरू असलेल्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. अंबड परिसरातील एका रो-हाऊसमध्ये हा प्रकार सुरू होता. Whatsapp च्या आधारे ग्राहक शोधत असल्याने पोलिसा‌ंचा दोन वेळा सापळा अयशस्वी झाला होता. पोलिस पथकाने जुन्या ग्राहकाच्या संपर्कात असलेल्या एकाकडून दलालाची माहिती मिळवली. त्याने दलालाचा Whatsapp नंबर दिला. त्यावर संपर्क … Read more

‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांची लूट !

संगमनेर :- वरिष्ठांकडून दिलेले पावत्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक-पुणे मार्गावर वाहनचालकांची लूट सुरू आहे. ही लुटमार करणारे कोणी गुंड नव्हेत, तर ज्यांच्यावर या मार्गाची जबाबदारी सोपवली आहे, असे महामार्ग आणि जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस आहेत. हिवरगाव पावसा टोलनाक्यावर दोन्ही दिशेने पोलिसांचे हे वसुलीनाके सुरू असून येथून जाणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालकांना त्यांचा सामना करताना आर्थिक … Read more

ट्रकच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू

संगमनेर :- नाशिक-पुणे मार्गावरील बाह्यवळणावर शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास मालट्रकची धडक बसून मोटारसायकलीवरील बाप-लेकीचा मृत्यू झाला. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. अत्यवस्थ असलेल्या दोन्ही जखमींवर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशोक सोमनाथ वाघ (वय ३५, कळस, ता. अकाेले) आणि त्यांची तीन वर्षांची चिमुरडी शकुंतला यांचा मृतात समावेश आहे. त्यांची पत्नी आशाबाई व दिलीप … Read more

श्रीगोंद्यातील नेत्यांना विधानसभेचे वेध,पाचपुतेंच्या पराभवासाठी जगताप – नागवडे एकत्र

श्रीगोंदा :- तालुक्यातील नेत्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. जि. प. महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी विधानसभा लढवण्याचे संकेत नुकतेच पत्रकार परिषदेत दिले. आमदार राहुल जगताप यांनीही नागवडे आणि आमच्यात कुठलेही मतभेद नसून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार आम्ही एकत्र राहून बबनराव पाचपुते यांचा पुन्हा पराभव करू, असे ‘बोलताना शुक्रवारी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने … Read more

जास्त दिवस जागायचे असेल तर स्मार्टफोनला दूर ठेवा !

न्यूयॉर्क : स्मार्टफोन हळूहळू लोकांच्या आयुष्यात हिस्सा बनत आहे. स्मार्टफोन शिवाय जीवन सुनेसुने वाटते, असे अनेकजण तुम्हाला अवतीभोवती सापडतील. मात्र जवळचा जोडीदार बनलेला स्मार्टफोन तुमच्या जीवनाचा शत्रूही होऊ शकतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एका ताज्या अध्ययनातून असे समोर आले की, स्मार्टफोन अतिवापर जीवावरही बेतू शकतो. दीर्घ व निरोगी आयुष्य जगण्यासाठी फोनचा कमी … Read more

संगमनेर ; बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

संगमनेर | तालुक्यातील पेमगिरी येथे यात्रेनिमित्त आलेली महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना बुधवारी (८ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास पेमगिरी-नांदुरी शिवालगत घडली. सुदेशना रावसाहेब खैरनार (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे. पेमगिरी येथील यात्रोत्सवाला सुदेशना खैरनार या मुलगा सूरजबरोबर दुचाकीवर येत होत्या. पेमगिरी व नांदुरी शिवालगत डाळिंबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या … Read more

Breaking : स्कॉडा कार पलटी होवून अपघातात महिला ठार, चार जखमी

अहमदनगर :- औरंगाबादहून पुण्याकडे जात असलेल्या स्कॉडा गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कॉडा वेगाने पलटी होवून अपघाताची घटना घडली. हा अपघात जेऊर परिसरात लीगाडे वस्तीजवळ झाला. यात एक महिला जागीच ठार झाली तर चार जण जखमी झाले आहेत. लता दत्तात्रय ठाकूर (वय-60), रा. पुणे असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

अहमदनगर ब्रेकिंग : जावयाला मैत्रिणीसोबत पकडल्याने सासू, सासर्याने केली बेदम मारहाण !

अहमदनगर : पतीला मैत्रिणीसोबत पकडल्यानंतर पत्नी, सासू व सासऱ्याने त्याची चांगलीच धुलाई केली आहे. ही घटना भिंगार येथील खळेवाडी परिसरात घडली.  याप्रकरणी संबंधिताने पत्नी, सासू, सासऱ्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी पतीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.याबाबत सविस्तर असे की, या घटनेतील पती पत्नी हे दोघेही भिंगारमध्ये राहतात. संबंधित महिलेचे … Read more

बूट फेकून मारल्याच्या गुन्ह्यात नगरसेवक योगीराज गाडे आरोपी

अहमदनगर :- रस्त्याच्या कामावरून महानगरपालिकेतील शहर अभियंत्याच्या अंगावर बूट फेकल्याच्या गुन्ह्यात आणखी सहा आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. शिवसेनेचे नगरसेवक योगिराज गाडे यांचा गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. आता या गुन्ह्यात 18 आरोपी झाले आहेत. शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारल्याच्या गुन्ह्यात नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह आणखी सहा जणांचा समावेश करण्यात आला. पोलिस … Read more

…तर विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू : अनुराधा नागवडे

श्रीगोंदा :- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने उमेदवारी दिल्यास विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू. शरद पवार जेव्हा सांगतील, त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू, असे जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व काँग्रेसच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी बुधवारी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नागवडे म्हणाल्या, पिण्याच्या पाण्यासाठी कुकडीचे आवर्तन सुटले आहे. मात्र, त्यातून संपूर्ण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्राईम पेट्रोल पाहून तिने प्रियकराचा बदला घेण्यासाठी केला त्याच्यावर ॲसिड हल्ला !

अहमदनगर :- प्रेमदान चौकातील एका हॉटेलमध्ये प्रेमप्रकरणातून युवकावर ॲसिड हल्ल्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती.ह्या घटनेचा उलगडा आज झाला आहे प्रेमदान चौकातील ॲसिड हल्ला प्रकरणात संशयित म्हणून पकडलेल्या युवतीने हल्ला केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान आज सायंकाळी पोलिसांनी तिला अटक केली असून क्राइम पेट्रोल ही टीव्ही सीरिअल पाहून हे कृत्य केल्याचे तिने कबूल केले. अमीर … Read more

डिप्रेशनमधून बाहेर पडायचे असेल तर ह्या दहा गोष्टी तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील !

वेळ नेहमी सारखीच राहत नसते आपल्या या आयुष्यात बर्याच चढ-उतार येतात, म्हणून, आपल्याला जे काही हवे असेल त्यावर विश्वास ठेवायला हवा आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगला पाहिजे.  अनेकदा आपल्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चालू असताना अचानक काही घटना घडतात,आपण अस्वस्थ होतो, थांबतो, काहीच आपल्याला करावस वाटत नाही,खरतर हीच खरी आयुष्याची परीक्षा असते कारण हीच वाईट दिवसांत … Read more

धक्कादायक : पित्याने नव्हे तर नराधम पतीनेच तिला अंगावर पेट्रोल ओतून मारले ? पारनेर तालुक्यातील निघोज प्रकरणाला वेगळेच वळण…

अहमदनगर :- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात घडलेल्या ऑनर किलींग प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणात जखमी झालेला मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे आले आहे.  अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक मनीष कलवानीया, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन … Read more