लग्नासाठी गेलेल्या 9 वीत शिकणाऱ्या मुलीवर 12 मुलांकडून सामुहिक बलात्कार, नराधमांनी बलात्कार करून केली मुलीची हत्या !

झारखंड :- लग्नात आलेल्या 12 तरुणांनी 9 वीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी घडली आहे.  दरम्यान ह्या घटनेनतंर विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलगी कौरैया बाजडीह ह्या शेजारील गावातील रहिवासी होती. ग्रामस्थांनी घटनेची माहिती होताच त्यांनी दोन अल्पवयीनांसह … Read more

तुम्हाला माहित आहे मराठी माणूस मागे का आहे ?

मराठी माणूस आजच्या स्पर्धेच्या युगात मागे का पडतो ? आर्थिकद्रुष्ट्या का कमकुवत होतोय ? मराठी माणसातचं बेकारी व गरिबी का वाढतच चालली आहे ? त्यावर केलेले ‘संशोधन’ व “निरीक्षणाअंती २३ कारणे दिसून आली, जी मराठी माणसांनी “स्वतःला” विचारावीत व त्यावर “स्वतःच” उपाय योजना करावी. ह्या बाबी प्रत्येक मराठी माणूस ‘सकारात्मकतेने’ घेईल हिच अपेक्षा…! (वाद नको.! … Read more

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंसमोरील अडचणीत वाढ होणार

अकोले :- शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उभे असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षशिस्तभंगाची कारवाई म्हणून पक्षातून हकालपट्टी केली. आता त्यांच्या पदरात भाजपकडून दान म्हणून टाकलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदाचा राजीनामा त्यांनी द्यावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे. त्यामुळे वाकचौरेंसमोरील अडचणीत वाढ होणार आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदाचा राजीनामा … Read more

श्रीगोद्यात ट्रकच्या धडकेत एक ठार

श्रीगोंदा :- दोन मालमोटारींची धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजता मढेवडगाव येथे घडली. नगर-दौंड रस्त्यावर बसस्थानकाशेजारी गव्हाचे पोते भरलेली मालमोटार (आरजे ०९ जीडी १६१९) उभी होती. गाडीला रिफ्लेक्टर नसल्याने पाठीमागून आलेल्या बटाटा भरलेल्या मालमोटाराची (आरजे ११ जीए ६१७०) तिला जोरदार धडक बसली. या अपघातात क्लीनर रामलखन प्रीतमसिंह … Read more

देशद्रोही लोकांच्या देणग्या घेणारा खासदार हवाय का?

अहमदनगर :- ज्यांच्या संस्थेला देशद्रोही कारवाया करणाऱ्या व्यक्तीकडून देणगी मिळते, असे लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा की ज्या पक्षाच्या नावातच राष्ट्रवाद आहे, त्या पक्षाच्या विचारांचा हवा. याचा विचार सर्वस्वी तुम्हीच करा, असे आवाहन नगर लेाकसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले. नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते. जगताप म्हणाले, पंढरपूरचा सत्ताधारी आमदार … Read more

आ.संग्राम जगताप यांना पाठ केलेली इंग्रजी वाक्यही नीट बोलता येईनात

अहमदनगर :- शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नावर आपण लोकसभेत आवाज उठवू. संसदेत तसेच केंद्रीय मंत्र्यांबरोबर बोलताना इंग्रजी बोलावे लागेल. विरोधी राष्ट्रवादी उमेदवाराला पाठ केलेले इंग्रजी चार वाक्य नीट बोलता येत नाही. उमेदवांराची शैक्षणिक तुलना करण्याची गरज आहे, अशी टीका भाजपचे नगर लोकसभेचे उमेदवार सुजय विखे यांनी केले. सहकारी साखर कारखाने डबघाईला आणून राष्ट्रवादीने खासगी … Read more

देशाचा पंतप्रधान हा निधड्या छातीचा हवा – आदित्य ठाकरे

कोपरगाव :- देशाचा पंतप्रधान हा निधड्या छातीचा हवा. देशाचे संरक्षण करण्यासाठी सक्षम निर्णय घेणारा हवा. त्यासाठी नरेंद्र मोदी हेच योग्य आहेत. कारण ते कणखर नेतृत्व आहे. पंतप्रधान मोदी व राहुल गांधींची तुलना होऊच शकत नाही. काँग्रेस आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही. ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची आहे, हे लक्षात ठेवा, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य … Read more

झाडाची फांदी डोक्यावर पडून महिलेचा मृत्यू

राहुरी :- वाळलेल्या झाडाची फांदी चालत्या दुचाकीवर पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी धामोरी राहुरी स्टेशन रस्त्यावर ही घटना घडली. शकुंतला धोंडिराम उगले (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या मुलाबरोबर दुचाकीवरून प्रवास करत होत्या. अचानक त्याच्या दुचाकीवर वाळलेल्या झाडाची फांदी पडली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रंगनाथ उगले याच्या … Read more

निवडणूकीसाठी खर्च करण्यात डॉ.सुजय विखे पहिल्या तर संग्राम जगताप दुसऱ्या क्रमांकावर….

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारासाठी सर्वाधिक खर्च केला आहे. त्यांनी आतापर्यंत 45 लाख 34 हजार 515 रुपये खर्च केले असल्याचे निवडणूक आयोगाच्या लेखा टीमने म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी 30 लाख 46 हजार 176 रुपये खर्च केले असल्याचे टीमने नमूद केले. … Read more

…तर सुजय विखे पुढच्या निवडणुकीचा फॉर्मही भरणार नाही

शेवगाव :- उमेदवारी मिळाल्यानंतर विरोधी उमेदवाराने इकडचे दौरे सुरू केले. त्यामुळे त्यांना इथले प्रश्न काय माहीत? असा प्रश्न उपस्थित करून आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले. गुरुवारी सायंकाळी विखे, आमदार मोनिका राजळे यांनी बाजारपेठेतून प्रचारफेरी काढून मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. विरोधी उमेदवारांपेक्षा … Read more

विरोधी पक्षनेते कोठे आहेत ?

संगमनेर :-काँग्रेस पक्ष आज भाजप-सेने विरोधात आरपारची लढाई लढत असताना, पक्षाचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता या लढाईत सर्वस्व झोकून आज पक्षाचे काम करीत आहे. मात्र, अशावेळी विरोधी पक्षनेते कोठे आहेत? आजच्या या संघर्षात त्यांचे योगदान काय? असा सवाल माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. आता विखे यांच्यावरील जनतेचा विश्‍वास संपला आहे. जनतेच्या मनात यांच्या तडजोडीबद्दल तिरस्कार … Read more

भाऊसाहेब वाकचौरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

शिर्डी :- लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष उभे असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली असली, तरी त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. निवडणुकीला भाजप-शिवसेना मित्रपक्षांसमवेत सामोरे जात आहे. शिर्डी मतदारसंघ शिवसेनेकडे असून मित्रपक्ष भाजपचे नेते व माजी खासदार वाकचौरे अपक्ष उभे आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी … Read more

डॉ सुजय विखेंची उमेदवारी जनतेची

पारनेर :- पवार साहेबांचे ऐकणारे पाहिजेत, म्हणून विखे यांना विरोध करायचा, हा राष्ट्रवादीचा एककलमी कार्यक्रम आहे. विखे हे कधीच आपल्या ताटाखालचे मांजर होणार नाहीत, हे पवार साहेबांना माहीत असल्याने त्यांनी या निवडणुकीत आपल्याला विरोध करण्याचे धोरण घेतले. त्यांना बस म्हटले की बस व उठ म्हटले की उठणारा खासदार पाहिजे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे … Read more

पंतप्रधान मोदी यांना शरद पवार यांची भीती

अहमदनगर :- नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. हा देशासाठी त्याग नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे सभा झाली. त्यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, हिंदुस्थानचे राज्य चालवायचे … Read more

सुजय विखे पाटलांसाठी स्मृती इराणी,मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडेंच्या सभा

अहमदनगर : महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ २१ एप्रिलला केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री ना.स्मृती इराणी यांची जामखेड येथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २० एप्रिल रोजी कर्जत येथे तर ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची २० एप्रिल रोजी शेवगांव येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपाचे संयोजक प्रसाद ढोकरीकर यांनी दिली. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची नगर … Read more

प्र‌वरा परिसरात विखे कुटुंबियांची हिटलरशाही

अहमदनगर : बाळासाहेब विखे आणि पवार यांचे वैर नव्हते. अलीकडे राजकारणासाठी त्यांच्यातील वादाचा गवगवा केला जात आहे. प्र‌वरा परिसरात या विखे कुटुंबियांची हिटलरशाही चालते.  त्यांच्या शिफारशीशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यांनी सख्या भावाला एवढा त्रास दिला आहे, तर इतरांची काय व्यथा, अशी टीका डॉ. अशोक विखे यांनी केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरचे … Read more

खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा तिसरा गुन्हा !

संगमनेर :- आदर्श आचारसंहिता लागू असल्याची माहिती असूनदेखील प्रचारफेरीसाठी विनापरवाना वाहन वापरणाऱ्या शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर पुन्हा एक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात भरारीपथक दोनचे प्रमुख कैलास पांडुरंग राऊत यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. लोखंडे शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. लोखंडे यांनी सोमवारी (१५ एप्रिल) संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा, निमगाव … Read more

अच्छे दिन’च्या नावाखाली शेतकरी देशोधडीस

अहमदनगर :- भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त घोषणा करून त्यांची चेष्टा केली. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी कधी शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी दिली. पण अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीस लावले, अशी भावना राष्ट्रवादीत आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरमध्ये … Read more