हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस – यशवंतराव गडाख

नगर : पन्नास वर्षे मी राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत होतो. या काळात असंख्य आव्हाने व निवडणुकांचा सामना मी केला. जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करण्यासाठी कधीच मागेपुढे पाहिले नाही. अनेक वेळा पोलिस कारवायांचा सामना करावा लागला, पण परवा पोलिसांना ज्या पध्दतीने कारवाई करायला लावली ते अत्यंत क्लेशदायक होते. हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असल्याची … Read more

अटक करून घेण्यासाठी शंकरराव गडाख एसपी कार्यालयात

नगर : कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शनिवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस यशवंतनगर परिसरातील माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या बंगल्यात गेले होते. दोन तास थांबूनही गडाख तेथे मिळाले नाही.  त्यामुळे पोलिसांनी अटक वॉरंटचा अहवाल कोर्टाला पाठवला. तर रविवारी दुपारी बाराच्या सुमारास शंकरराव गडाख स्वत:हून पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. आपल्याला अटक करा, असा आग्रह त्यांनी … Read more

लोकपाल नियुक्तीमुळे देशात अण्णा हजारे यांच्या जनआंदोलनाला ऐतिहासिक विजय

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. सी. घोष हे बनले पहिले लोकपाल पारनेर : देशातील पहिल्या लोकपाल पदावर सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. सी. घोष यांच्या केलेल्या निवडीचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वागत करतानाच ४८ वर्षांनंतर जनआंदोलनाला ऐतिहासिक विजय मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या नियुक्तीमुळे देशात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त … Read more

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार

कोपरगाव : विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या आरोपी महादेव मनोहर जरीत (.आदमपूरवाडी ता. तेलारा, जि. अकोला) याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महादेव जरीत फरार असून याचा तपास पोलिस घेत आहेत.  कोपरगाव शहरालगत असलेल्या रेल्वेस्टेशन जवळ राहणाऱ्या एका विवाहित महिलेला आरोपी महादेव मनोहर जरीत याने लग्नाचे … Read more

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

पणजी : देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते शनिवारी सकाळच्यापेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती सुधारली पण स्थिती चिंताजनक होती. गेल्या, कित्येक दिवसांपासून या नेत्याची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली. दरम्यान, पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. साधं राहणीमान असलेले … Read more

नगर दक्षिणेतील उमेदवारांचा तिढा संपेना

नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा घोळ अजूनही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून सात दिवस उलटले असले, तरी या मतदारसंघातून कुठल्याच पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर न झाल्याने संभ्रम वाढला आहे. दरम्यान भाजपची पहिली यादी रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पहिल्या यादीकडे जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे.  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली … Read more

खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

नगर : मोक्का व खून प्रकणातील फरार आरोपी कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून गजाआड केला. लोकेश परशुराम माने (२७, रा. कैकाडी गल्ली, ता. बारामती, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये ११ गुन्हे दाखल आहेत.  बारामती शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती, तेव्हापासून आरोपी लोकेश फरार होता.  पुणे … Read more

खा. गांधींसह त्या ६४ जणांचे शस्त्र परवाने रद्द

नगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खासदार दिलीप गांधी यांच्यासह ६४ जणांचे शस्त्र जमा करून त्यांची परवाने रद्द केले आहेत.  जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच नेत्यांसह अनेकांचे शस्त्र जमा करून घेण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये त्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तब्बल जिल्ह्यातील ६४ जणांचे शस्त्र परवाने … Read more

अटक वॉरंट असलेले गडाख पोलिसाना आढळले नाहीतच

नेवासे: शेतक-यांच्या प्रश्नांवर आंदोलनाप्रकरणी दाखल गुन्ह्यात नेवासा न्यायालयाने क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख व माजी आमदार शंकरराव गडाख यांना पकड वॉरंट काढून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश सोनई पोलिसांना दिले होते.  त्यानुसार आज ( शनिवार ) पोलिसांनी गडाख यांच्या नगर व सोनईमधील घरांची झडती घेतली. मात्र शंकरराव गडाख दोन्ही ठिकाणी मिळून आले नाहीत. दरम्यान शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनला नगर … Read more

गडाख कुटुंबियांविरुद्ध सूडाचे राजकारण : प्रशांत गडाख

नेवासे : आम्ही सगळे कुटुंबीय झोपेत असताना एलसीबीचे पोलिस घरात आले. त्यांनी घरात महिला लहान मुले असताना प्रत्येक रुमची झडती घेतली. हे सर्व बघून आम्ही सर्वजण गोंधळलो. आम्ही पोलिसांशी चर्चा केली. ते शंकरराव गडाखांना अटक करायला आले होते. आम्ही त्यांना सांगितले की, काही कामानिमित्ताने ते पुण्याला गेले आहेत. परंतु चर्चेने हा प्रश्न सोडवू शकत होते. … Read more

वडील प्रचाराला येणार नाहीत याचे दु:ख – सुजय विखे पाटील.

मुंबई – भाजप प्रवेशानंतर वडिलांशी फोनवर बोलणे झाल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट करतानाच, जे काही करशील ते सांभाळून कर असा वडील म्हणून त्यांनी मला सल्ला दिला. ते माझ्या प्रचाराला येणार नाहीत याचे दु:ख असल्याचेही सुजय विखे म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना नगरमधून खासदारकीचे आश्वासनही दिले … Read more

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी उफाळली.

अहमदनगर :- मनपा निवडणुकीपासून चर्चेत असलेली शहर काँग्रेसमधील गटबाजी आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उफाळली आहे. काँग्रेसमधील विखे-थोरात गटाच्या फुटीचा परिणाम म्हणून या गटबाजीकडे पाहिले जात असले तरी या गटबाजीने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. शहर काँग्रेसमधील विखे-थोरात गटांपैकी आता केवळ थोरात गटाचेच समर्थक राहिल्याचे सांगितले जाते. विखे समर्थकांनी सुजय यांच्यासमवेत राहणे पसंत केल्याचेही … Read more

माजी आ.शंकरराव गडाखांविरोधात पकड वॉरंट.

नेवासे :- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या चक्का जाम आंदोलनप्रकरणी नेवासे न्यायालयाने क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख, शंकरराव गडाख यांच्याविरोधात पकड वॉरंट काढले आहे. त्यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश सोनई पोलिस ठाण्याला बजावले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलने आणि शंकरराव गडाख हे तालुक्यात जणू समीकरणच बनले आहे. पाटपाणी, कर्जमाफी, हमीभाव, कांदा, कापूस, दूध दर, बॅकवॉटर, वीज, पिण्याच्या पाण्याचा … Read more

मुलाने हट्ट केला, तर त्याला समजावण्याची जबाबदारी वडिलांची…

अहमदनगर :- राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते आहेत. ते राज्याच्या पातळीवरील आमच्या पक्षाचे प्रमुख नेते असल्याने मुलगा भाजपमध्ये जात असताना त्यांनी त्याला रोखायला हवे होते.  दुर्दैवाने तसे घडले नाही. मुलाच्या प्रवेशानंतर आपण विरोधी पक्षनेतेपदावर राहणार आणि पक्ष सांगेल ते करणार, असे ते म्हणत असतील, तर त्यांना ते सिद्ध करावे लागेल. त्यांना पक्षाने खूप काही दिले आहे. … Read more

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या प्राचार्यांचा मृत्यू.

अहमदनगर :- कांद्याने भरलेल्या टेम्पोने जोराची धडक बसून दुचाकीवरून जाणाऱ्या प्राचार्यांचा जागीच मृत्यू झाला. नगर-कल्याण रस्त्यावरील जखणगाव शिवारात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता हा अपघात झाला. शिवाजीराव अभिनव (पाइपलाइन रस्ता, नगर) असे मृत प्राचार्यांचे नाव आहे. ते अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या टाकळी ढोकेश्वर येथील श्रीढोकेश्वर विद्यालयात प्राचार्य होते. गुरुवार सकाळी प्राचार्य शिवाजीराव अभिनव हे दुचाकीवरून नगर … Read more

शिवसेना नगरसेवकांचे सेल्फी विथ ‘सुजय’ !

अहमदनगर :- डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी मुंबईहून नगरला आल्यानंतर आधी शिवसेनेचे शहराचे माजी आमदार अनिल राठोड यांची भेट घेतली. राठोड यांचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला असल्याने त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो, असे विखेंकडून स्पष्ट करण्यात आले व त्याला राठोडांनीही दुजोरा दिला.  राठोडांच्या घरी गेल्यानंतर डॉ. विखेंना घेऊन राठोड गांधी मैदानाजवळील लक्ष्मीबाई चौकात … Read more

फेक फेसबूक अकाउंट बनवून मुलीचे लग्न मोडले !

अहमदनगर :- लग्न जमलेल्या तरुणीचे फेसबूकवर बनावट अकाउंट तयार करून लग्न जमलेल्या तरुणाशी संवाद साधून लग्न मोडल्याचा प्रकार घडला आहे.  याप्रकरणी बीड जिल्ह्यातील निमगावदेवी येथील तरुण वैभव गहिनीनाथ फाळकेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार नगरच्या सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी भिंगारमधील तरुणीने फिर्याद नोंदविली आहे. २१ वर्षीय तरुणीचे भिंगारमधील एका तरुणाशी लग्न जमले होते. परंतु, … Read more

….तर सुजय विखे VS संग्राम जगताप फाईट होणार !

अहमदनगर :- काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नगरचं राजकारणच पालटलं आहे.  सुजय विखे पाटील यांना दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर होताच, सुजय विखेंविरोधात निवडणूक कोण लढवणार याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान विद्यमान विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप आणि त्यांचे सुपुत्र संग्राम जगताप. या दोघांपैकी … Read more