आकाश अंबानी यांच्या विवाह समारंभात अहमदनगरचे जितेंद्र रोकडे यांचे बासरीवादन.

अहमदनगर :- उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि श्‍लोका मेहता यांचा विवाह 8 व 9 मार्च 2019 रोजी होणार आहे. या लग्नाचे सर्व विधी मुंबई स्थित अंबानी निवास एंटिलिया हाऊसमध्ये होणार आहे. या भव्य विवाह समांरभात अहमदनगरचे प्रसिद्ध बासरीवादक व संगीत दिग्दर्शक जितेंद्र रोकडे बासरीवादन करणार आहेत. ते दिल्लीमधील सुभाष ठाकूर यांची ‘पूनम फ्ल्युट’ … Read more

खोट्या सह्यांद्वारे धनादेशाचा गैरवापर करुन खातेधारकाच्या खात्यातून 12 लाख गायब.

अहमदनगर :- खोट्या सह्यांद्वारे धनादेशाचा गैरवापर करुन शहर सहकारी बँकेच्या माळीवाडा शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून खात्यातून बारा लाख रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची तक्रार खातेधारक असलेले कुणाल अ‍ॅण्ड सन्सचे संचालक महेश कचरे यांनी शनिवार दि.2 मार्च रोजी कोतवाली पोलीस स्टेशनला केली. शहर बँकेने डॉ.निलेश शेळके यांना दिलेले 17 कोटी रुपयाचे बोगस कर्जप्रकरण … Read more

नागरिकांवर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद.

संगमनेर :- तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे नागरिकांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये शनिवारी रात्री एक बिबट्या अडकला. बिबट्यांची संख्या लक्षात घेता नागरिकांवर हल्ला करणारा हाच आहे का याबाबत मात्र संभ्रम आहे. गेल्या आठवड्यात बिबट्याने दुचाकीवरील चार जणांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले. एकाच रात्री झालेल्या बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यांतून सपना बाळासाहेब वाघमारे, वेणूनाथ सुखदेव … Read more

शाळेत जातो असे सांगून बाहेर पडल्या, त्या घरी परतल्याच नाहीत…

कोपरगाव :- शहरातील सुभाषनगर व दत्तनगर भागातील तीन अल्पवयीन मुली शाळेत जातो, असे सांगून बाहेर पडल्या, त्या घरी परत आल्याच नाहीत. १ व २ मार्चला या घटना घडल्या आहेत. एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली पळून गेल्याचे समजते. सुभाषनगर येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीत तिच्या १७ वर्षांच्या मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले आहे. हेड … Read more

अंधश्रद्धेतून पुतण्यानेच केली ‘त्या’ पुजाऱ्याची हत्या !

जामखेड :- तालुक्यातील खर्डा येथील शिकारेवस्तीवरील दत्त मंदिरातील कुशाबा तुळशीराम शिकारे ( वय ५० ) या पुजाऱ्याची धारदार शस्त्राने हत्या त्यांच्याच चुलत पुतण्याने केल्याचे निष्पन्न झाले. मृताची पत्नी रेखा शिकारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंकर सोपान शिकारे विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्या-मुंबईहून येणाऱ्या भाविकांचा आजार महाराज बरा करतात, परंतु आपला आजार वाढत चालला आहे, … Read more

खा. गांधींचे ते कृत्य म्हणजे निर्लज्जपणचा कळस !

अहमदनगर :- नगर अर्बन बँकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात टक्केवारी साठी अनेक नियमबाह्य कर्ज प्रकरणे मंजूर केल्यामुळे बँकेचा ढोबळ एनपीए तब्बल १६३ कोटीचा झाला. वाढलेल्या एनपीए मुळे रिजर्व बँकेने लाभांश वाटपास मनाई केली त्यामुळे सभासदांचे तब्बल ३ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे सभासदांची फसवणूक बँकेने केली आहे. असा आरोप माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी … Read more

राहुरी मतदारसंघ असेपर्यंत मीच आमदार – आ.कर्डिले.

राहुरी :- सत्तेत असताना ज्यांना विकासाचे प्रश्न सोडवता आले नाहीत, असे पुढारी मी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. प्रिंपी अवघड येथील २५ लाखांच्या विविध कामांचे भूमिपूजन करताना कर्डिले म्हणाले, मी दुष्काळी भागातील असल्याने पाण्याचे महत्त्व मला ठाऊक आहे. सोनई प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून प्रिंपी अवघड गावाला … Read more

धारधार शस्त्राने मंदिरातच पुजार्‍याची हत्या !

जामखेड :- तालुक्यातील खर्डा येथील दत्त देवस्थानचे प्रमुख कुशाबा तुळशीराम शिकारे (वय 50) यांचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने निर्घृण खून केला. शनिवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजता शिकारी वस्तीवर ही घटना घडली दत्त मंदिरात नेहमी प्रमाणे भजनाची तयारी करण्यासाठी गेलेल्या मंदिरातील पुजारी यांचा अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. मात्र हत्या कशामुळे झाली हे अद्याप … Read more

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना रोखण्यासाठी आता बारामतीची पॉवर !

अहमदनगर :- पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना रोखण्यासाठी आता बारामतीकर पवार घराण्यातील व्यक्तीने उमेदवारी घ्यावी, अशी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मागणी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने जोरदार नियोजन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांना कर्जत-जामखेड मतदार संघाचे पक्षनिरीक्षक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड.अमरसिंह मारकड यांना नगर जिल्हा राष्ट्रवादी … Read more

डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीवर संभ्रम कायम.

अहमदनगर :- नगर लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, नगर दक्षिणेची जागा ही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्याने या जागेचा तिढा सुटण्याऐवजी आणखी वाढला आहे. नगर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने या मतदारसंघातून राजीव राजळे यांना उमेदवारी दिली होती. या जागेवर राष्ट्रवादी … Read more

भाजपकडून लोकसभेसाठी माजीमंत्री बबनराव पाचपुते ?

अहमदनगर :- आगामी लोकसभा निवडणुकीत खा.दिलीप गांधी यांच्यावरील नाराजीचा फटका भाजपाला बसू नये यासाठी भाजप सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याबाबत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनाविचारणा झाल्याची माहिती समजली असून माजी मात्री पाचपुते यांनी लोकसभा निवडणुकीत स्वारस्य नसल्याने सांगितले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खा.दिलीप गांधी यांच्यावरील नाराजीचा फटका भाजपाला बसू नये यासाठी भाजप सक्षम … Read more

स्वाती नगरकर यांची नोटरी म्हणून नियुक्ती.

अहमदनगर :- ऍड.स्वाती शाम नगरकर यांची भारत सरकारकडून नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सदरची नियुक्ती आजपासून (गुरवार) देण्यात आली आहे. त्यांनी विविध ठिकाणी वकील म्हणून काम पहिले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दाखल घेत त्यांना हि नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल विविध मान्यवर क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक,व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सुजय विखेंसाठी शरद पवारांनी नगरची जागा सोडली !

अहमदनगर :- सुजय विखे यांच्या मिशन लोकसभेतील जागा वाटपाचा घोळ आज मिटला आहे.नगर दक्षिण ह्या जागेवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपला हक्क सोडला असून ही लोकसभेची जागा काॅंग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतल्याने सुजय विखेंचा मार्ग सुकर झाला आहे. सुजय विखे यांच्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस नगरची जागा सोडणार !राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर लोकसभेची जागा काॅंग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे … Read more

अपघातात पोलिस निरीक्षकासह पत्नीचा मृत्यू.

श्रीगोंदे :- पुण्यात राहणाऱ्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेले धारूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार जाधव आणि त्यांच्या पत्नी सुजाता (वय ४०) यांचा नगर-पुणे रोडवर गव्हाणवाडी येथे झालेल्या कारच्या अपघातात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. अनिलकुमार जाधव हे सध्या धारूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांची ऐश्वर्या नावाची मुलगी … Read more

शाळेची बस उलटून मुलांसह ११ जण जखमी.

संगमनेर :- तालुक्यातील एका इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसचालकाकडून बेदरकारपणे वाहन चालवल्याने बसचा अपघात होऊन नऊ शाळकरी मुलांसह दोन जण जखमी झाल्याची घटना येथील रणखांब शिवारातील रस्त्यावर घडली. तालुक्यातील गुंजाळवाडी पठार भागातील वृंदावन इंग्लिश मीडिअम शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी असलेली बस (एम एच १७ बीडी २०६६) घेऊन चालक गोरक्ष कैलास साळुंखे (वय २६ … Read more

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या.

कर्जत :- तालुक्यातील रजपूतवाडी येथील शेतकरी लक्ष्मणसिंग विठ्ठलसिंग परदेशी (वय ४८ वर्षे) या शेतकऱ्याने दुष्काळामुळे बँकेचे कर्ज थकले असून शेत नापीक राहिले. तसेच कामाचा आतिरिक्त ताण आल्यामुळे अखेर त्यांनी राहत्या घरामध्ये फाशी घेतली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे कोरेगाव व रजपूतवाडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. … Read more

अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलीस कोठडी.

कोपरगाव :- लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या आरोपी आकाश रमेश रानशूर (कोपरगाव) याला पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपी आकाश रानशूर याला पाच दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. शहरालगत असलेल्या सोनार वस्ती येथे राहणाऱ्या आकाश रमेश रमेश रानशूर याने आपल्या घरी धुणे-भांड्याचे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन … Read more

संगमनेर बसस्थानकाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा !

संगमनेर :- नव्याने उभ्या रहात असलेल्या बसस्थानकामुळे शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली बसस्थानकाच्या ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावरील बांधकामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. ठेकेदाराने शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवत वाळूतस्करांकडील वाळू या कामासाठी वापरल्याचा आरोप सामाजिक युवा कार्यकर्ते अमोल खताळ यांनी केला. खताळ यांनी पत्रकारांना यासंदर्भात दिलेल्या माहितीत म्हटले आहे … Read more