Ahilyanagar News : पाणी योजनेच्या खर्चातील तूट भरून काढण्यासाठी घरगुती वापराच्या पाणीपट्टीत वाढ !

AMC

अहिल्यानगर – शहराच्या पाणी पुरवठा योजना व वितरण व्यवस्थेवर होणाऱ्या खर्चात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दुसरीकडे गेल्या एकवीस वर्षांपासून पाणीपट्टी वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न व पाणी योजना व वितरण व्यवस्थेवर होणार खर्च यातील तफावत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, पाणी योजनेची वीज बिले देण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहराची … Read more

विकासात संगमनेर तालुका राज्यात पहिल्या तीन मध्ये ! राजेश टोपे, डॉ रावसाहेब कसबे व वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रेरणा दिनानिमित्त गौरव

संगमनेर – छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचा विचार घेऊन या परिसरामध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात व डॉ अण्णासाहेब शिंदे यांनी कार्य केले आहे. सहकार व शेती क्षेत्रातील त्यांनी केलेले कार्य हे महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोठे योगदान देणारे असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी काढले आहे. तर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासामध्ये संगमनेर … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील महापुरुष, राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची नियमित स्वच्छता करावी

अहिल्यानगर – शहरात विविध महापुरुष व राष्ट्रपुरुषांचे सुमारे २५ पुतळे आहेत. या पुतळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजाला मिळते. या पुतळ्यांच्या परिसरात व पुतळ्यांची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे. उद्यान विभागाने याबाबत गांभीर्याने उपाययोजना करून सर्व पुतळ्यांची नियमित स्वच्छता करावी, परिसरातही दैनंदिन साफसफाई होईल, याची दक्षता घ्यावी, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे … Read more

लोकसहभागाशिवाय गावाला गावपण येत नाही –ना. जयकुमार गोरे

मा.ना.जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास व पंचायतराज महाराष्ट्र राज्य यांनी हिवरे बाजारला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार राहुल कुल, आमदार काशिनाथ दाते सर, राहुल पाटील शिंदे, प्रशांतकुमार येळाई साहेब कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, दादाभाऊ गुंजाळ उप मु.का.अ.जिल्हा परिषद , शरद मगर गटविकास अधिकारी, बाबुराव जाधव गटशिक्षण अधिकारी तसेच इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी … Read more

भंडारदरा धरणातून चार आवर्तने सोडण्यात येणार ! जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

शिर्डी, दि.१० – भंडारदारा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निळवंडे कालव्यांना १५ जानेवारी पासून पाणी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. भंडारदारा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक लोणी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात … Read more

जयंती महोत्सव कार्यक्रमाची यशोधन मैदानावर जय्यत तयारी ! माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली पाहणी

थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरीत क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12.30 वा होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी यशोधन जवळील मैदानावर सुरू असून या तयारीची पाहणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. यशोधन जनसंपर्क कार्यालय जवळील मैदानावर प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या जयंती महोत्सव … Read more

गृहमंत्री अमित शहा यांची भेट: शिर्डी विमानतळाच्या नाईट लँडिंगला गती

दिल्ली येथे आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी भेट घेतली. या भेटीत राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल गृहमंत्र्यांचे आभार मानण्यात आले. या भेटीच्या वेळी शिर्डी विमानतळाच्या विकासासंदर्भात महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला. सध्या शिर्डी विमानतळावर रात्रीच्या लँडिंगला परवानगी नसल्याचे लक्षात … Read more

नगरमध्ये शनिवारी रंगणार अमृतमहोत्सवी ‘मैत्री कट्टा’ द्वितीय वर्धापनदिनानिमित्त होणार मैत्रीपूर्ण संवाद

मैत्री ही कुणाशीही होऊ शकते. त्याला कोणतेही बंधन नाही. हाच धागा पकडून गेल्या दोन वर्षांपासून नगरमध्ये होत असलेल्या ‘मैत्री कट्टा’ या उपक्रमाचा द्वितीय वर्धापनदिन शनिवारी (11 जानेवारी) माऊली सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता होत आहे. या वेळी ‘खास रे’फेम संजय कांबळे, लेखक व हौशी छायाचित्रकार नंदकुमार देशपांडे, चित्रकार के. नमिता प्रशांत व साहित्यिक अभिरूची ज्ञाते उपस्थित … Read more

Buldhana Hair Loss : महाराष्ट्रात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ ! 3 दिवसात टक्कल… आजार पाहून आरोग्य विभागही हैराण

महाराष्ट्रातील बुलढाणा येथे एक विचित्र आजार पसरला आहे ह्या जिल्ह्यातील काही गावात लोकांना 3 दिवसात टक्कल पडत आहे. लोकांना ना या आजाराचे कारण माहित आहे ना त्यावर उपाय दिसत आहे. डॉक्टरांनाही त्यावर उपाय सापडत नसून आरोग्य विभागही हैराण झाला आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे डोक्यावरचे केस. … Read more

Ahilyanagar News : युवा दिनानिमित्त जिजाऊ महोत्सवाचे आयोजन

Ahilyanagar News : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनानिमित्ताने रविवारी (दि. १२) केडगाव येथे जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी दिली. जिजाऊ महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम व्यावसायिक किसन सातपुते ह्यांची निवड करण्यात आली आहे. १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभर साजरा … Read more

सिंचन व्यवस्था बळकटीकरीता अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा अभ्यास करावा ! जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी राज्यातील सिंचन व्यवस्था व अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करावा. याचा राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्यास मदत होईल. या अनुषंगाने जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री श्री. विखे पाटील यांनी आज सह्याद्री अतिथी गृह … Read more

पारंपारिक पत्रकारिता डिजिटल युगात बदलत आहे -संतोष धायबर

डिजिटल मीडियामुळे पत्रकारितेमध्ये झपाट्याने बदल होत आहे. पत्रकारांना डिजिटल मीडियाचे ज्ञान आत्मसात करुन प्रवाहात टिकता येणार आहे व शिकून पुढे जाता येणार आहे. एआय मेटा पत्रकारितेपुढे मोठे आव्हान आहे. मात्र तो ग्राउंड लेव्हलची बातमी देऊ शकणार नाही. पारंपारिक पत्रकारिता डिजिटल युगात बदलत असताना मोबाईलवर वाचकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार तथा डिजिटल माध्यम … Read more

मनपा अकॅशन मोडवर ! एचएमपीव्ही विषाणू चिंतेचे कारण नाही, नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी

अहिल्यानगर – चीनमध्ये मानवी मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. चीनमधून आलेल्या या नवीन विषाणुमुळे चिंतेचे कारण नसले तरी, नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी. या प्रकरणी भितीचे वातावरण निर्माण करू नये, महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन आयुक्त तथा … Read more

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

अहिल्यानगर  – कुकडी प्रकल्पातून सध्या सुरू असलेले रब्बी आवर्तन क्र. १ गृहीत धरून एकूण चार तसेच घोड प्रकल्पातून सध्या सुरू असलेले आवर्तन क्र.१ धरून एकूण चार आवर्तन देण्याचा निर्णय राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी आणि घोड संयुक्त प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत घेण्यात आला. … Read more

महानगरपालिकेचे स्वच्छता अभियान सुरू; स्टेट बँक चौक ते कोठी चौकात स्वच्छता ! नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, कापडी पिशव्या वापराव्यात

अहिल्यानगर – महानगरपालिकेचे शहर स्वच्छता अभियान शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. शनिवारी स्टेट बँक चौक ते कोठी चौक दरम्यान स्वच्छता अभियान पार पडले. यात कचऱ्यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचलून साफसफाई करण्यात आली. नव्या वर्षात शहर स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने संकल्प केला आहे. अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखले जावे, यासाठी नागरीक, सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून, सहभागातून हे अभियान … Read more

ऑनलाईन फायली दहा दिवसात निकाली काढण्यासाठी महानगरपालिकेचे नियोजन !

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्या, मंजुरीला विलंब होत असल्याने यात सुसूत्रता आणून कामकाजात गतिमानता आणण्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. ऑनलाईन फाईल सबमिट करण्यापूर्वी त्या फायलींची ऑफलाईन पडताळणी केली जाईल. सर्व त्रुटी दूर करूनच ऑनलाईन फाईल सबमिट केली जाईल. यामध्यामातून ऑनलाईन फायली दहा दिवसात निकाली काढता येतील व नागरिकांना वेळेत व जलद गतीने … Read more

Ahilyanagar News : शनिवारपासून अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्वच्छता अभियान सुरू

Ahilyanagar News : अहिल्यानगर महानगरपालिकेचे शहर स्वच्छता अभियान येत्या शनिवारपासून सुरू होत आहे. दर शनिवारी शहराच्या एकेका भागात अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत. शहरातील नागरिक, सामाजिक संघटनांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. नव्या वर्षात शहर स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने संकल्प केला आहे. अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखले … Read more

काँग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीवरून प्रलंबित योजनांचे पाच कोटी 96 लाख 65 हजार रुपये बँकेत वर्ग ! 18274 पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार

Sangamner News : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून विविध गावांमधील वाडीवस्त्यावरील योग्य व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे .मात्र अनेक दिवसांपासून हे अनुदान रखडवले गेले होते. याबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी 23 डिसेंबर रोजी प्रशासनाकडे तातडीने प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याची विनंती केल्यानंतर आज शासनाने 18 हजार … Read more