अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल !

नगर अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपाचे समन्वयक महेंद्र भैय्या गंधे, सचिन जाधव, किशोर डागवाले, अविनाश घुले, प्राध्यापक माणिकराव विधाते, संजय चोपडा, रवींद्र बारस्कर, अमोल गाडे, प्रा. अरविंद … Read more

संगमनेर तालुक्‍यात परिवर्तन करण्याची हीच संधी ! डॉ.सुजय विखे पाटलांचा आ.बाळासाहेब थोरातांच्या कार्यपध्‍दतीवर निशाणा

या तालुक्‍याची संस्‍कृती ही फक्त दडपशाही आणि गुंडगिरीमध्‍ये अडकलेली आहे. येथील विकास हा फक्‍त ठराविक कुटूंबासाठी आणि ठेकेदार पोसण्‍यासाठी सुरु आहे. युवा संवाद यात्रा काढता पण तुमच्‍या सोबत युवा राहीला आहे का? असा थेट सवाल डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. हिवरगाव पावसा येथे आयोजित केलेल्‍या युवा संकल्‍प मेळाव्‍यात बोलताना डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुन्‍हा … Read more

राणी लंके गुरुवारी अर्ज दाखल करणार !सुप्रिया सुळे उपस्थित राहणार, ५० हजार महिलांची उपस्थिती अपेक्षित 

महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई नीलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २४ ऑक्टोबर रोजी गुरूपुष्यांमृताचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून अर्ज  दाखल करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित राहणार आहेत. ५० हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये पारनेरच्या तहसिल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूकीची चाहूल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत … Read more

अहो ताई, तालुक्याचा बाप कोण हे जनता ठरवेल ! संगमनेरमध्ये सुजय विखे पाटलांचा घणाघात… बापाबद्दल नव्हे निष्क्रीय आमदाराबद्दल बोललो…

तालुक्यातील जनतेन तुमचा चाळीस वर्षाचा कारभार पाहायला त्यामुळे तालुक्याच्या आमदारांच्या निष्क्रीयतेवर बोललो तर राग यायचे कारण काय ॽ अहो ताई,लोकाशाही प्रक्रीयेत मायबाप जनता बाप असते.तालुक्याचा बाप कोण हे येत्या निवडणुकीत जनता दाखवून देईल असे सडोतोड उतर डाॅ सुजय विखे पाटील यांनी दिले. साकूर येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा संकल्प मेळाव्यात डाॅ सुजय विखे यांनी पुन्हा … Read more

मुख्यमंत्री काय यंदा आमदार सुध्दा होणार नाहीत ! विखे पाटलांकडून थोरातांच्या दहशतीचा समाचार…

आजची सभा हा फक्त ट्रेलर आहे.या तालुक्यात परीवर्तन करण्यासाठी महीलांचा वाटा खूप मोठा असणार आहे. युवकांनी सुध्दा मागे न राहाता तालुक्यातील दहशत झुगारून परीवर्तनासाठी पुढे आले पाहीजे.तालुक्यातील ठेकेदारी संस्कृती तुमचा विकास करू शकणार नाही आशा शब्दात डाॅ सुजय विखे पाटील यांनी आ.बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला.मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहाणारे आमदार सुध्दा यंदा होवू शकणार नसल्याचा … Read more

दिनमान काळा होणार , बाया न्हात्यान, धुत्यान व पालखीत मिरत्याल… अस्थिरता निर्माण होणार असल्याचे भाकित !

निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे गुरुवारी (दि.17 ऑक्टोबर) झालेल्या होईकात (भविष्यवाणी) दहा खंडात चळवळ होऊन दिनमान काळा होणार असल्याचे म्हणजेच सर्वच क्षेत्रात चळवळी होऊन अस्थिरता निर्माण होणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले. तर खंडात रक्ताचा पूर वाहणार म्हणजेच युध्दजन्य परिस्थिती राहणार व जेठुडी साधली जाईल म्हणजेच चांगला पाऊस होऊन मृगराळ्याची पेर होईल … Read more

नागपूर बोल्हेगाव उपनगराला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लागणार – आमदार संग्राम जगताप

नागापूर बोल्हेगाव हे शहराचे मोठे उपनगर असून या ठिकाणी एमआयडीसी कंपनीतील कामगार वर्ग मोठ्या संख्येने राहत असून त्यांच्या दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी मनपाचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी पाठपुरावा करत मोठा निधी उपलब्ध करून घेतला आहे, त्यामुळे कॉलनी अंतर्गत देखील रस्ता कॉंक्रिटीकरणाचे कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागली आहे, नागापूर गांधीनगर रस्ता मार्गी लागावा … Read more

विविध विकास कामांसाठी साडेपाच कोटींचा निधी ! खा. नीलेश लंके यांची माहिती 

lanke

अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध गावांमधील विकास कामांसाठी ५ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात  आल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. विविध विकास कामांसाठी मंजुर करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे : बुऱ्हानगर, तपोवन सावेडी येथे यशवंत चौक ते आरंभ अपार्टमेंट काँक्रीट रस्ता २५ लाख, एच डी स्पोर्टस ते सिध्दीविनायकनगर रस्ता २५ लाख, सिध्दीविनायकनगर ते जयनगर … Read more

डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या विचाराला संगमनेर तालुक्‍याने नेहमीच साथ दिली – पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या विचाराला संगमनेर तालुक्‍याने नेहमीच साथ दिली. त्‍यांच्‍या आठवणींना उजाळा देण्‍यासाठी पिंपळगाव कोंझीरा गावाने त्‍यांच्‍या नावाने उभारलेले सभागृह हे सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल असे भावनीक उद्गार महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काढले. पिंपळगाव कोंझीरा येथे उभारण्‍यात आलेल्‍या सभागृहास लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील असे नाव देण्‍यात आले असून, सभागृहातील … Read more

Tukda Bandi Kayada : घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण ! खरेदीच्या नोंदीही नियमित…तुकडे बंदी कायद्यातील सुधारण्याला मंत्री मंडळाची मान्यता

vikhe

Tukda Bandi Kayada : तुकडे बंदी कायद्यातील सुधारण्याला मंत्री मंडळाने मान्यता दिल्यामुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करुन झालेले व्यवहार नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत नागरीकांना ५ टक्के शूल्क भरुन तुकड्यांचे व्यवहार नियमित करता येणार असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यासंदर्भात माहिती देताना मंत्री विखे पाटील म्हणाले … Read more

शेवटच्‍या गावाला पाणी मिळवून देण्‍यासाठी कालव्‍यांची आणि वितरीकांची कामे सुरु – ना.विखे पाटील

radhakrushn vikhe

निळवंडे कालव्‍यांच्‍या कामावर यापुर्वी फक्‍त भाषणबाजी करण्‍यात काहींनी धन्‍यता मानली. मात्र राज्‍यात महायुतीचे सरकार आल्‍यानंतर पाणी मिळवून देण्‍याचा दिलेला शब्‍द आज पुर्णत्‍वास जात आहे. शेवटच्‍या  गावाला पाणी मिळवून देण्‍यासाठी कालव्‍यांची आणि वितरीकांची कामे सुरु झाली असून, या कामांना निधीही कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्‍वाही महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्‍यातील वडझरी … Read more

आता तुमच्या लेकीला विधानसभेत पाठवा…नगरच्या मोहटादेवी यात्रोत्सवात फुलांची उधळण ! तिच गर्दी, आणि तोच उत्साह

खासदार नीलेश लंके व जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या मोहटादेवी यात्रोत्सवामध्ये तिच गर्दी आणि तोच उत्साह पहावयास मिळाला. पारनेर तालुक्याप्रमाणेच नगर तालुक्यातील महिला मोठया उत्साहाने या यात्रोत्सवात सहभागी झाल्या होत्या. फुलांची उधळण करीत खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांचे … Read more

हरिणाया तर जिंकलेच आता महाराष्‍ट्रातही महायुतीचा मोठा विजय आपल्‍याला मिळवायचा आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

विकासाचे उदिष्‍ठ साध्‍य करताना समाजातील प्रत्‍येक घटकांचे कल्‍याण हाच आमचा अजेंडा आहे. हरियाणाच्‍या जनतेने विकासाला साथ देवून समाज तोडणा-या कॉग्रेसी प्रवृत्‍तीला धडा शिकविला आहे. महाविकास आघाडी राज्‍याला कमजोर करीत असून, महायुती महाराष्‍ट्राला मजबुत करण्‍याचा संकल्‍प करुन पुढे जात आहे. हरिणाया तर आपण जिंकलेच आता महाराष्‍ट्रातही महायुतीचा मोठा विजय आपल्‍याला मिळवायचा आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र … Read more

निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने महिलांसाठी “यात्रोत्सव 2024” अंतर्गत मोफत मोहटादेवी दर्शन

अहमदनगर: निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने आयोजित “यात्रोत्सव 2024” अंतर्गत महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शनाची अनोखी सोय करण्यात आली आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या यात्रेसाठी शहरातील प्रत्येक प्रभागातून बसेसचे नियोजन केले गेले आहे, ज्यामुळे महिलांना दर्शनासाठी सोईस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. प्रभागातून बसेसचे नियोजन: प्रत्येक प्रभागातून बसेस सोडण्यात येत असून, महिलांना … Read more

महायुती सरकारने केली अहिल्यानगर नामांतराची वचनपुर्ती : ना. राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या मागणीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित आज शिक्कामोर्तब झाले. नामंतराच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यानंतर आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे. नामांतराच्या या निर्णयाचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीदिनास तिनशे वर्ष पूर्ण होत असतानाच हा निर्णय … Read more

आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक : – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chief Minister Shinde

आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत … Read more

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. मराठी भाषेस अभिजात … Read more

मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच – राधाकृष्ण विखे पाटील

vikhe

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयाचे महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत मराठी भाषा समृध्द करण्यासाठी योगदान देणार्या प्रत्येकासाठी आजचा निर्णय अभिमानाचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली केंद्रीय मंत्री मंडळाच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानून हा सन्मान म्हणजे मराठी … Read more