Ahmednagar Vidhansabha : संग्रामभैय्याला तिकीट मिळेल का..? संग्राम भैय्या दुसऱ्या पक्षात जाणार का..?

अत्यंत तरुण वयात राजकारणात आलेले आमदार संग्राम जगताप यांचा यशाचा आलेख चढता राहिला.  दोनदा महापौर आणि दोनदा आमदार असलेले संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा विधानसभेसाठी जाण्यास इच्छुक आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी संग्राम जगताप हे थेट मंत्री होतील, असे म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच ऊर्जा भरली होती. मात्र तटकरेंच्या या विधानाला … Read more

कर्जापोटी लाडक्या बहिण योजनेचे अनुदान वळवले ! ‘ह्या’ तालुक्यातील घटना…

Ahmednagar News : महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे शेवगाव येथील फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक येथे आधार शेडिंग असल्याने जमा झाले आहेत. परंतू बँक प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे बँकेत वारंवार चकरा मारून देखील योजनेचे पैसे देण्यास बँक प्रशासनाने नकार दिला आहे.यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी तहसीलदार प्रशांत सागडे यांना निवेदन देत लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळावे, … Read more

कोण होणार श्रीरामपूरचा आमदार ? इच्छुकांची गर्दी ! लहू कानडेंना यंदाची निवडणूक सोप्पी नाहीच…

Ahmednagar News

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गेल्यावर्षी आली होती तशीच रंगत यावर्षीही येथे दिसत आहे. काँग्रेसचे लहू कानडे हे येथून आमदार असले तरी, यावेळी त्यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातील इतरांचे आव्हान आहे. दुसरीकडे महायुतीकडून ही जागा परंपरागत शिवसेनेला मिळत असली तरी यंदा येथे भाजपनेही दावा केलाय. त्यामुळे कधी नव्हे एवढी रंगत या मतदारसंघात पहायला मिळत आहे. … Read more

विखे पाटलांना विधानसभा निवडणुक सोप्पी नाहीच ! विखे पिता-पुत्र यावेळी ताकही फुंकून पिण्याच्या मनस्थितीत…

vikhe

महायुतीकडून मंत्री राधाकृष्ण विखे हेच शिर्डी विधानसभेचे उमेदवार असतील, अशी शक्यता आहे. तिकीट वाटप होण्यास वेळ असला तरी, विखेंनाच महायुतीचं तिकीट मिळणार आहे.  लोकसभेत पराभूत झाल्यानंतर सुजय विखेंनी, आता आपला मोर्चा शिर्डी विधानसभेकडे वळवला. आपण कायमचं शिर्डी येणार असल्याचं वक्तव्य, सुजय विखेंनी मार्च महिन्यातच केलं होतं. राहाता शहरात महिला बचत गटाला साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात विखेंनी … Read more

सीना धरण भरण्याच्या मार्गावर ! पण लाभक्षेत्रातद्यापही दमदार पाऊस नसल्याने पाणीटंचाई

Ahmednagar News : जुलै महिन्यापासून भोसा खिंडीतून सीना धरणात कुकडीचे पाणी सुरू आहे. तसेच पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने सीना धरण ८७.०४ टक्के भरले आहे. येत्या काही दिवसांतच धरण भरेल. भोसा खिंडीतून अद्यापही कुकडीच्या पाण्याची आवक चालूच आहे. सीना धरण पाणलोट क्षेत्र व नदीच्या उगमस्थानात आणि नगर शहर परिसरात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात दमदार … Read more

अहमदनगरकर इकडे लक्ष द्या या , भंडारदरा धरणाचे नाव बदलले ! शासनाचा अध्यादेश जारी

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील ब्रिटिशकालीन धरण म्हणून समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या जलाशयाचे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय, असे नामकरण करण्यात आले असून शासनाकडून नुकताच अध्यादेश जारी करण्यात आला आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजे ब्रिटिशकालीन धरण समजले जाते. १९२६ साली भंडारदरा धरण बांधून पूर्ण झाले. त्या वेळचे मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली विल्सन यांच्या … Read more

श्रीगोंदेकरांचं ठरलं..! पाचपुते, नागवडे, शेलारांवर पुन्हा मात? ‘त्या’ युवा नेत्यावर नजरा ‘तो’ ठरणार श्रीगोंद्यातला सायलेंट विनर

Ahmednagar Politics News : आमदार असतानाही शाही थाटात लग्न न करता सामुदायिक विवाह सोहळ्यात शुभमंगल केल्यानंतर राहुल जगताप राज्यात चर्चेत आले होते. सात वर्षांपूर्वी त्यांनी आपल्यासोबत नऊ जोडप्यांचा विवाह लावत त्यांच्या लग्नाचा खर्च उचलला होता. शिवाय कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या व पेशाने डाँक्टर असणाऱ्या डाँ. प्रणोती राजेंद्र चव्हाण यांच्यासोबत विवाह करुन त्यांनी एक नवा आदर्श … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! संपूर्ण कुटुंब संपलं, एकाच घरातील तिघांनी संपविले जीवन ! सापडल्या दोन चिठ्ठ्या …

संगमनेर शहरातील वाडेकर गल्ली येथे राहणाऱ्या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.०३) दुपारी ४ नंतर समोर आली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. या दाम्पत्याच्या मोठ्या मुलाने साधारण सात दिवसांपूर्वी पुण्यात, तर लहान मुलाने यापूर्वी वाडेकर गल्ली येथील घरात आत्महत्या केली होती. गणेश मच्छिंद्र वाडेकर (वय ५२), गौरी गणेश … Read more

रोहितदादा कर्जत-जामखेडमधून परत निवडून या, मगच मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…

rohit pawar

Ahmednagar Politics : राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार आक्रमक झालेले दिसत आहेत. बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबियातून आणखी एकजण भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आले आहेत. दहीहंडी कार्यक्रमात जामखेडमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार रोहित पवार यांचे बॅनर झळकले तर याचकार्यक्रमात मै हु … Read more

दोन तरुण शेतकऱ्यांनी दोन एकर मध्ये घेतले 36 टन सेंद्रिय काशीफळाचे उत्पादन! मिळाले 3 लाख 80 हजाराचे भरघोस उत्पन्न

Ahmednagar Farmer Success Story

परंपरागत शेती पद्धती आणि परंपरागत पिके आता काळाच्या मागे पडले असून ती जागा आता तंत्रज्ञानाने आणि आधुनिक पिक पद्धतीने घेतली आहे. शेती क्षेत्रामध्ये जर सध्या आपण बघितले तर प्रामुख्याने तरुण शेतकऱ्यांनी खूप मोठी मजल मारली असून जास्तीत जास्त प्रमाणात आधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग पिके आणि इतर भाजीपाला पिकांच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेतच … Read more

उद्योजक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ योजनेतून मिळेल 5 लाखापर्यंत 4 टक्के व्याजाने कर्ज, वाचा माहिती

business loan

समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारची पावले उचलली जातात. यामध्ये बहुसंख्य योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येऊन अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी अशा घटकांना मदत केली जाते. तसेच बेरोजगारांना उद्योग- व्यवसाय उभारता यावा याकरिता देखील अनेक योजना महत्त्वाच्या आहेत. देशापुढे बेरोजगारीची ज्वलंत समस्या असल्याकारणाने उद्योग व्यवसायांना चालना … Read more

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत होणार १८४६ रिक्त पदांसाठी भरती! 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी, वाचा माहिती

BMC Bharti 2024

BMC Recruitment 2024:- सुशिक्षित बेरोजगार आणि उपलब्ध नोकऱ्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस खूप गंभीर स्वरूप धारण करत आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या काही उपलब्ध झालेल्या नोकरांच्या जाहिराती निघतात त्यामध्ये लाखोच्या संख्येत अर्ज दाखल केले जातात. सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर असे कित्येक विद्यार्थी विद्यार्थिनी हे अनेक विभागाच्या परीक्षांची तयारी करत असतात. यामध्ये … Read more

‘हा’ शेतकरी आहे लाल कांद्याचा मास्टर ! वापर करतो सेंद्रिय खतांचा आणि घेतो एकरी 150 क्विंटल लाल कांद्याचे उत्पादन

शेती व्यवसाया पुढील उभे असलेले नैसर्गिक आपत्तीचे संकट आणि हवामान बदल या दोन कारणांनी शेती व्यवसायाला गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्टिकोनातून कचाट्यात सापडल्याचे चित्र आहे. तसेच दुसरे म्हणजे बऱ्याचदा घसरलेले शेतीमालाचे बाजार भाव यामुळे देखील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या सगळ्या परिस्थितीतून शेतकरी अनेक पर्यायांचा अवलंब करून … Read more

नितेश राणे आणि दिगंबर गेंट्याल यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Ahmednagar News : मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रक्षोभक तसेच धमकावणारे वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपचे आ. नितेश राणे तसेच मोर्चाचे आयोजक दिगंबर गेंट्याल यांच्यावर नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर मध्ये रविवारी (दि.१) महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आलेल्या मोर्चाच्या समारोप सभेत आ.राणे यांनी हे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. याबाबत … Read more

अहमदनगरचे अहिल्यानगर होणारच ! रेल्‍वे मंत्रालयाच्या ह्या निर्णयामुळे जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर

ahilyanagar

Ahmednagar Name Change : जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला असून, हे नाव देण्‍यास विभागाची कोणतीही हरकत नसल्‍याचे पत्र दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचे महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले. जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर राज्‍यातील महायुती सरकारने अहिल्‍यानगर असे नाव देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतला. … Read more

भाग्यलक्ष्मी’ मध्ये अडकली मेहनतीची ‘लक्ष्मी’ ! खातेदार संतप्त; पदाधिकारी, कर्मचारी फरार

Ahmednagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथे मोठ्या थाटामाटात भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते. खातेदारांना आकर्षक व्याजदर तसेच विविध योजनांच्या अमिष दाखवत मोठ्या ठेवी गोळा करण्यात यशस्वी ठरलेल्या भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कष्टाची लक्ष्मी अडकून पडली आहे. परिसरातील खातेदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन अडकलेले पैसे परत … Read more

श्रीरामपुरात नवा भिडू मैदानात ! विकासासाठी रोड मॅप गरजेचा…

Shrirampur News

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही रस्ते, वीज, पाणी, शिक्षण व आरोग्य या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न औद्योगिकीकरण वाढल्याने दिवसेंदिवस अवघड होत चालला आहे. वाढत्या नागरिकरणामुळे शहरं चकचकीत होण्यापेक्षा बकाल अन् गावांचं गावपण संपत चाललं आहे. अशा परिस्थितीत गाव असो किंवा शहर दोन्ही ठिकाणी शाश्वत विकास करायचा असेल, तर विकासाचा रोडमॅप गरजेचा … Read more

Maharashtra ST Bus : लालपरीची दैना कोणीच लक्ष देईना ! हाल फक्त कर्मचारी आणि प्रवाशांचे…

अनेक वर्षांपासून खिळखिळ्या झालेल्या बॉडीतून निघणारा खडखड आवाज… गळके छत… कुठे गज नाही तर कुठे आहेत; परंतु तुटलेल्या, खिळखिळ्या झालेल्या खिडक्या… फाटके सीट… गिअर टाकताना खरं खरं असा निघणारा आवाज… अशी बिकट परिस्थिती झालेल्या लालपरीची दैना अजूनही जायला तयार नाही. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीत प्रवाशांना धक्क्यावर धक्के बसतात. असाच प्रकार बसच्या बाबतीत झाला. … Read more