खा. नीलेश लंके रिक्षातून शरद पवारांच्या भेटीला ! नीलेश लंके यांच्या साधेपणाचे दिल्लीतही आप्रुप

महाराष्ट्र सदनमध्ये खा. लंके यांच्यासाठी एक खोली देण्यात आली असून तिथे शपथविधीसाठी दिल्लीत आलेल्या महिलांची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे लंके हे हॉटेलमध्ये वास्तव्यास असून बुधवारी सकाळी शरद पवार यांच्या भेटीचा निरोप मिळाल्यानंतर वाहन उपलब्ध नसल्याने लंके यांनी अ‍ॅटो रिक्षाने महाराष्ट्र भवनापर्यंत पोहचण्याचा पर्याय स्विकारला. गळयात संसद सदस्याचे ओळखपत्र असलेल्या व्यक्तीने संसद भवनापर्यंत सोडण्याची सुचना … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंकेंनी उद्धव ठाकरेंची भेट का घेतली ? ही आहेत तीन मोठी कारणे…

नगर दक्षिणेचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी शनिवारी थेट मातोश्री गाठली. शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेतले. लोकसभेच्या निकालानंतरही लंके हे मीडियाच्या चर्चेतून बाहेर पडण्याचे नावचं घेईनात… कोणत्या ना कोणत्या कारणाने ते मीडियात बिझीच दिसतात. कधी लंके थेट बाळासाहेब थोरातांची संगमनेरात जाऊन भेट घेतात, तर कधी शरद पवारांना थेट नरगमध्ये घेऊन येतात. शनिवारी लंकेंनी थेट … Read more

MP Nilesh Lanke : थेट इंग्रजीतून शपथ ते रामकृष्ण हरी ! खा.निलेश लंकेंची संसदेसह देशभरात चर्चा

इंग्रजीमध्ये शपथ घेत नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. मी जे इंग्रजी, हिंदी बोललो ते महिनाभर पाठ करा, तुम्ही बोललात तर मी लोकसभा निवडणूकीचा अर्जही भरणार नाही असे आव्हान देणाऱ्या माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रत्युत्तर देत खा. नीलेश लंके यांनी संसदेत मंगळवारी सकाळी इंग्रजीमध्ये शपथ घेतली. लंके यांच्या … Read more

Ahmednagar Politics : मराठा-ओबीसी वादाची धग नगरपर्यंत… साखरसम्राटांच्या जिल्ह्यात ओबीसी फुंकणार रणशिंग?

Ahmednagar Politics : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील वारंवार उपोषण करत आहेत. सरकारवर दबाव टाकत आहेत. आता त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसी नेतेही उपोषणाला बसले आहेत. विरोधातील नेत्यांना धडा शिकवायचाच, असा निर्धार ओबीसी समाजाने घेतलाय. मराठा आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना बसला. आता एकमेकांविरोधातील दोन आंदोलने सुरु आहेत. यो दोन्ही आंदोलनाची धग येत्या विधानसभा निवडणुकांतही … Read more

विखेंना बाराही विधानसभा जडच ! नगरी राजकारणाचा नवा आध्याय थोरात – लंके – गडाख

vikhe

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादा महायुतीत असतील का, हे ठरलेलं नसलं तरी महाविकास आघाडी मात्र एकत्रित लढणार आहे. नगर जिल्ह्याचा विचार करता, येथील सगळं राजकारण हे सोयऱ्या- धायऱ्याच्या जोरावर चालतं, असं म्हणतात. नगरी सोयरे-धायरे वेगवेगळ्या पक्षात असले तरी, आपापले तालुके आणि कार्यकर्ते जपून आहेत. नगर जिल्ह्यात सोयऱ्या-धायऱ्यांचे प्रामुख्याने दोन गटांत राजकारण चालते. पहिला … Read more

घरगुती गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘हे’ काम केले तरचं मिळणार Gas सिलेंडर, अन्यथा कनेक्शन बंद होणार

LPG Gas Connection : घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खरे तर, भारतात गेल्या काही वर्षामध्ये घरगुती गॅस ग्राहकांची संख्या कमालीची वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम उज्वला योजना सुरू केल्यापासून ग्राहक संख्या अधिक वाढली आहे. खेड्यापाड्यात आधी स्वयंपाकासाठी चुलीचा वापर होत असे. मात्र आता खेड्यातही बहुतांशी … Read more

पंजाबरावांचा हवामान अंदाज खरा ठरला, महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात; किती दिवस सुरू राहणार जोरदार पाऊस? वाचा सविस्तर

Panjab Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh Havaman Andaj : दोन-तीन दिवसांपूर्वी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला होता. यामध्ये पंजाबरावांनी महाराष्ट्रात 22 जून पासून पावसाचा जोर वाढणार असे म्हटले होते. विशेष म्हणजे पंजाबरावांचा हा अंदाज आता खरा ठरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी अगदी अवकाळी … Read more

खासदार नीलेश लंके यांनी घडविला इतिहास ! ७४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पारनेरच्या भूमिपुत्राचे संसदेत पाऊल

तब्बल ७४ वर्षांच्या बहुप्रतिक्षेनंतर खासदार नीलेश लंके यांच्या रूपाने पारनेरच्या भूमिपुत्राने सोमवारी, २४ जुन रोजी संसदेत पाहिले पाऊल टाकले. संसदेत पारनेरला कधी प्रतिनिधीत्व मिळणार ? या प्रश्‍नाचे उत्तर खा. नीलेश लंके यांनी इतिहास घडवत दिले असून मंगळवारी संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी लंके यांचा २९८ हा क्रमांक निश्‍चित करण्यात आला आहे. सन १९५१ मध्ये पहिली लोकसभा अस्तित्वात … Read more

Ahmednagar Politics : लंकेंना विखेंचा अभिमान का वाटू लागला ? खा. निलेश लंकेंची बदललेली भूमिका आणि विखेंची न्यायालयात धाव, नेमकं काय चाललंय

lanke vikhe

नगर जिल्ह्यातील राजकारणात गेल्या दोन-तीन वर्षांत विखे- लंके वादाने परिसिमा गाठली होती. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे अगदी कार्यकर्त्यांच्या हमरी-तुमरीपर्यंत प्रकरण आले होते. ठरल्याप्रमाणे लंकेंनी विखेंविरोधात निवडणूक लढवली आणि जिंकलीही. निकालानंतरही १५ दिवस या दोहोंतील विळ्या-भोपळ्याचं नातं कायम राहिलं. पण दोन दिवासांपूर्वी लंकेंचा मूड बदलला आणि त्यांनी अचानक विखेंचे गोडवे गायला सुरुवात केली. मोठ्या विखे साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जायचंय, असंही सांगितलं. लंकेंचा बदललेला मूड मेन स्ट्रिम मीडियाने व सोशल मीडियाने काही मिनिटांत राज्यभर नेला. लंके व विखे या दोन्हींच्या कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली. या धक्क्यानंतर लगोलग दुसरा धक्का बसला, तो म्हणजे विखेंनी ४० केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची न्यायालयाकडे केलेल्या मागणीने… या अगोदर विरोधक ईव्हीएमवर आक्षेप घ्यायचे. मात्र आता भाजपचे उमेदवार विखेंनीच पहिल्यांदा आक्षेप घेतल्याने चर्चा झाली.

आक्रमक समजल्या जाणाऱ्या लंकेंची नरमाईची भूमिका, आणि विखेंची निवडणूक आयोगाकडे धाव, या दोन्ही घटनांचा ताळमेळ लावणं अवघड झालंय. मात्र या प्रकारामुळे 1991 च्या विखे-गडाख निवडणुकीची प्रकर्षाने आठवण होतेय. खरंच व्हिव्हिपॅटमध्ये काही बिघाड असेल का, मशिनमध्ये काही झोल असेल का, विखेंच्या निर्णयाचा धसका घेतल्यामुळेच लंकेंची भाषा बदलली असेल का, हे सगळे प्रश्न यानिमित्ताने पडलेत. या सगळ्या प्रकारानंतर मात्र जुन्या-जाणत्या नगरकरांना आठवली ती 1991 ची निवडणूक. आता विखे-गडाख हे प्रकरण नेमके काय होते, हे आपण पाहू…

नगर मतदारसंघात 1991 साली काँग्रेसचे उमेदवार होते यशवंतराव गडाख तर त्यांच्या विरोधात होते अपक्ष बाळासाहेब विखे पाटील. या निवडणुकीचा १६ जून रोजी निकाल लागला. त्यात गडाख २.७९ लाख मतांनी विजयी झाले. या निकालाला विखेंनी ओरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. गडाख यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याने लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२३(४) अन्वये त्यांची निवड अवैध ठरवून आपल्याला विजयी घोषित करावे, अशी त्यांची याचिका होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावरही विखेंनी चारित्र्यहननाचा आरोप केला होता. विखेंनी याचिकेत या दोघांच्या भाषणाचे पुरावेही जोडले.

विखेंनी न्यायालयात गडाख व पवारांच्या सभांचे ऑडीओ- व्हिडीओ दाखवले. विखे यांच्या निवडणुकीचे बजेट ३ कोटी आहे. जनता दलाला त्यांनी ५० लाख रुपये देऊन, त्यांच्याकडून उमेदवारी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांना माघार घ्यायला लावली. शिवाय बीडमधून निवडणुक लढविण्यासाठी कोळसेंना २० लाख रुपये दिले. विखे पाटलांनी पाच हजार सायकलींचं वाटप केलं. मतदारांना साडी-धोतर व दारूचं वाटप केलं,’ असे आरोप पवार, गडाखांनी केल्याचे विखेंचे म्हणणे होते. यामुळे आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झालाय, असा आक्षेप विखेंच्या केला.

न्या. ए.ए. हळबे यांच्यासमोर ही सुनावणी २ वर्षे चालली. ३० मार्च ११९३ रोजी न्यायमूर्तींनी लोकप्रतिनिधित्व कायदा १२३/ ४ अन्वये गडाख यांना भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी दोषी ठरवून त्यांची निवड अवैध ठरवण्यात आली. शिवाय विखेंना विजयी घोषित करण्यात आले. गडाखांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदीही घालण्यात आली. पवार यांच्यावरही कलम ९९ अन्वये ठपका ठेवण्यात आला. या निकालाविरोधात पवार व गडाख 1993 साली सुप्रीम कोर्टात गेले. तेथे न्या. जे. वर्मा, एन.सिंग, एन.व्यंकटचला यांच्यासमोर सुनावणी झाली. १९ नोव्हेंबर १९९३ रोजी निकाल आला. त्यात गडाख यांची निवड अवैध ठरवण्याचा निर्णय कायम राहिला. मात्र विखेंना विजयी करण्याचा निर्णय रद्द ठरवला. शरद पवारांनाही क्लिनचिट मिळाली.

हे सगळं तुम्हाला आम्हाला जास्त धक्कादायक वाटत नसलं, तरी 33 वर्षांपूर्वी या खटल्याने देशाचं लक्ष वेधलं होतं. आताही लंकेंविरोधात विखे कोर्टात गेलेत. डॉ. विखे पाटील यांनी १० जून रोजीच निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र विखेंच्या कार्यालयाकडून याची माहिती मिळत नव्हती. आता मात्र निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी या प्रकरणाला दुजोरा दिलाय. जिल्हा निवडणूक विभागाने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठवलाय. तेथून हा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे जाईल. ४५ दिवसांच्या आत उमेदवाराने न्यायालयात धाव घेतली, तर न्यायालयाच्या परवानगीने पडताळणीचा निर्णय होईल. कोणी न्यायालयात गेले नसल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही होईल. पण या प्रकरणामुळे लंकेंची धाकधूक वाढली, हे मात्र नक्की…

अजितदादांचं ठरलं ! महायुतीऐवजी स्वबळावर लढणार ? नगर जिल्ह्यात ‘या’ 12 जणांवर लावणार डाव

ajit pawar

विधानसभेचा बिगुल वाजलाय. डॅमेज स्विकारुन महायुती कात टाकणारेय. भाजपने दोन दिवसांपूर्वी आपल्या नेत्यांची बैठक घेतलीय. शिंदे गटानेही विधानसभेबाबत कार्यकर्त्यांना सुचना केल्या. आता अजित दादांची राष्ट्रवादीनेही चाचपणी सुरु केलीय. महायुतीत हे तिन्ही पक्ष एकत्र राहतील का, हा खरा प्रश्न आहे. छगन भुजबळांनी तर थेट ८०-९० जागांची मागणी केलीय. शिवसेनाही तेवढ्याच जागा मागेल. या दोघांच्या अपेक्षा पूर्ण … Read more

विधानसभेच्‍या निवडणूकीत पुन्‍हा एकदा महायुतीचा झेंडा फडकविणारच ! मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदेंचा आत्मविश्वास…

खोट्या नॅरेटीव्‍हने मिळविलेला विजय हा फार काळ टिकणार नाही, उद्याचा दिवस महायुतीचा असणार आहे. आम्‍ही लढणारे कार्यकर्ते आहोत. विधानसभेच्‍या निवडणूकीत पुन्‍हा एकदा महायुतीचा झेंडा फडकविणारच असा आत्‍मविश्‍वास मुख्‍यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी व्‍यक्‍त केला. नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ.किशोर दराडे यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ लोणी येथे शिक्षक मतदार, संस्‍था चालक आणि महायुतीचे पदाधिकारी यांच्‍याशी … Read more

महाविकास आघाडी सर्वाधिक जागा जिंकणार ! खा. नीलेश लंके यांचा विश्‍वास  मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे घेतले आशिर्वाद 

Ahmednagar Politics : येत्या विधानसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी राज्यात सर्वाधिक जागा जिंकणार असल्याचा दावा करतानाच महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणूकीसाठीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याची सुरूवात नगर जिल्हयातून करण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी आपणास सांगितले असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले. लवकरात लवकर तारीख निश्‍चित करून नगरमध्ये महाविकास आघाडीच्या मोठया मेळाव्याचे नियेाजन करण्यात येणार असल्याचेही खासदार लंके म्हणाले. लोकसभा निवडणूकीत … Read more

औरंगाबाद खंडपीठात NET, SET, Ph.D धारकांच्या नियुक्तीसंदर्भात रिट याचिकेवर सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात NET, SET, Ph.D धारकांच्या नियुक्तीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते “नेट सेट पीएचडी धारक समिती” चे सचिव यांनी वतीने अॅड प्रतिक्षा काळे यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) विरुद्ध आपली तक्रार मांडली आहे. सदर याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान अँड प्रतिक्षा काळे यांनी दावा केला … Read more

सुजय विखेंचा यंत्र पडताळणीद्वारे मोठा डाव ! निलेश लंकेंची खासदारकी कोर्टात ? पहा स्पेशल रिपोर्ट

MP Sujay Vikhe

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅटच्या पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज केला आहे. ४० मतदान यंत्रांची पडताळणी होणार आहे. लोकसभेची मतमोजणी ४ जून रोजी झाली. तत्पूर्वी १ जूनला निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नवीन आदेश जारी केला. त्यानुसार क्रमांक २ व क्रमांक … Read more

नकारात्मक प्रचारातून महाविकास आघाडीला मिळालेले यश फार टिकणारे नाही – राधाकृष्ण विखे पाटील

नकारात्मक प्रचारातून महाविकास आघाडीला मिळालेले यश फार टिकणारे नाही.विरोधकांच्या नॅरेटिव्हला उतर देण्यासाठी विधानपरिषद निवडणुक ही संधी आहे.नगर जिल्ह्यातील मत ही निर्णायक ठरणार असल्याने महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या विजयासाठी कटिबध्द व्हा असे आवाहन महसूल तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. विधानपरीषदेचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या निवठणूक प्रचारार्थ आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत … Read more

शेततळ्यांत बुडून होणाऱ्या दुर्घटनांवर जनजागृती करा – आ. सत्यजीत तांबेंचे राज्यातील तीन मंत्र्यांना पत्र

राज्यात काही दिवसांपासून ग्रामीण भागातील मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रकार घडत आहेत. हे शेततळे अनेक बालकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. लहान मुलंच नव्हे तर सराईत पोहणारी मोठी माणसंही शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडत आहेत. या समस्येवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृती करावी अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री … Read more

अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! Tata Nexon वर 1 लाख रुपया पर्यंतचा डिस्काऊंट !

भारतातील आघाडीची ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने लॉन्च केलेल्या नेक्सॉनची 7 वर्षात 7 लाख वाहन विक्रीचा विक्रमी टप्पा गाठला असून, देशातील नंबर एकची एसयूव्ही कारचा बहुमान मिळवला असताना देशभर टाटा मोटर्सच्या शोरुममध्ये उत्सव सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर एमआयडीसी नगर-मनमाड रोड येथील कामू मोटर्स (मॅक्स मोटर्स) टाटा शोरुमध्ये हा उत्सव साजरा करुन ग्राहकांसाठी 1 लाख … Read more

खासदार निलेश लंके स्पष्टच बोलले ! सुजय विखे यांनी ईव्हीएमवर खापर न फोडता पराभव मान्य करावा

MLA Nilesh Lanke

ईव्हीएम मशिन तसेच व्हिव्हिपॅटवर संशय घेत त्याच्या चौकशीची भाजपाचे पराभूत उमेदवार मा. खा. डॉ. सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी चुकीची असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे खासदार नीलेश लंके यांनी विखे यांनी ईव्हीएमवर खापर न फोडता पराभव मान्य करा असा सल्ला त्यांना दिला आहे. मा. खा. डॉ. सुजय विखे यांनी ईव्हीएम मशिन तसेच व्हिव्हिपॅटवर संशय … Read more