अहिल्यानगर जिल्ह्यात १५ व १६ ते १८ मे रोजी वादळी वारा आणि पाऊस…

Ahilyanagar Rain : अहिल्यानगर जिल्‍ह्याच्या काही भागात १५ मे रोजी वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व गारपीट होण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच १६ ते १८ मे २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्‍याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्‍ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) … Read more

संगमनेर : 50 लाख रुपये निधी खर्चून अद्यावत उभारलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद का ?

Sangamner News : लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे वैभवशाली व सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संगमनेर शहरांमध्ये 50 लाख रुपये निधीतून अद्यावत अशी सीसीटीव्ही यंत्रणा व कंट्रोल रूम उभारण्यात आली. ही सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस प्रशासनाकडे हस्तांतरित असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही सीसीटीव्ही यंत्रणा बंद का असा परखड सवाल … Read more

Explained : विखे-थोरात पुन्हा समोरासमोर ? ZP निवडणुकीत लागणार खऱ्या ताकदीचा कस

सहकाराचा जिल्हा असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या महिनाभरात या निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. शिवाय त्यानंतर लगेचच महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नगर जिल्ह्यातील वातावरण गरम होणार आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे-थोरात संघर्ष दिसणार आहे. थोरात … Read more

बाळासाहेब विखे पाटलांचा थक्क करणारा प्रवास ! ‘देह वेचावा कारणी’ या आत्‍मचरित्राच्‍या दुस-या आवृत्‍तीच्‍या निमित्‍ताने….

माझे वडील लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) १९६२ पासून अखेरपर्यंत सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष या पदावर नऊ वर्षे राहिल्यानंतर १९७१ ते २००९ या संपूर्ण काळात ते संसदीय राजकारणातच सक्रिय होते. त्यांचे राजकारण-समाजकारणाचे प्रमुख कार्यक्षेत्रही तेच राहिले. माझे आजोबा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे जीवन आणि कार्य; तर दुसऱ्या बाजूला संसदेत होणाऱ्या … Read more

RAW ने टार्गेट ठरवलं, भारतीय वायुदलाने उडवलं ! ‘मरकज सुभान अल्लाह’चं सत्य काय आहे?

Operation Sindoor : पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याने भारत हादरला. या हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ (RAW) ने कठोर पावले उचलली. रॉ ने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांची अचूक माहिती गोळा करून त्यांना लक्ष्य केले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने एकत्रितपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत ७ मे २०२५ च्या मध्यरात्री या तळांवर … Read more

जैश-लश्कर मुख्यालयासह 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त ! 75 दहशतवादी ठार आणि 55 जखमी

Operation Sindoor : 7 मे 2025 रोजी पहाटे 1:30 वाजता भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले. या संयुक्त कारवाईत भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलाने एकत्रितपणे 24 क्षेपणास्त्रे डागून जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवादी तळांना उद्धवस्त केले. ही कारवाई 22 एप्रिल … Read more

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला ! क्रूझ मिसाइल्सचा वापर करून पाकिस्तानातील तब्बल ९ दहशतवादी अड्डे उध्वस्त

Operation Sindoor : 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकासह 26 जणांचा मृत्यू झाला होता. या क्रूर हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे 2025 रोजी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर … Read more

महाराष्ट्रातून जाणारा ‘हा’ Expressway आहे देशातील सर्वांत लांब एक्सप्रेसवे ! फायदा काय ?

Longest Expressway in India : भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस-वे कोणता ? या प्रश्नाचं उत्तर अनेकांना माहीत नसेल. मात्र आम्ही आज या प्रश्नाचं उत्तर देतोय. दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्सप्रेस-वे हा देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे. त्याची लांबी 1350 किलोमिटर आहे. पंतप्रधान मोदींनी या एक्सप्रेस-वेच्या वडोदरा-मुंबई ट्रेंचचे नुकतेच उद्घाटन केले असून हा एक्सप्रेस-वे येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. … Read more

महाराष्ट्रात सिंगापूरसारख शिक्षण मिळणार ; शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केली मोठी घोषणा

Education Minister Dadaji Bhuse : सिंगापूर शहर शिक्षणक्षेत्रात अग्रेसर आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना सिंगापूरच्या धर्तीवर गुणवत्तापुर्ण, दर्जेदार व अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शिक्षण देण्याबरोबर त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वांना सहभागी करुन घेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. शिर्डी येथे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक चर्चासत्र, सिंगापूर … Read more

विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील जनतेकडून चूक – अभिनेत्री राजश्री लांडगे

संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संपूर्ण संगमनेर तालुका हा आपला परिवार मानला. एकही दिवस विश्रांती न करता सातत्याने काम केले. सर्व समाजाला बरोबर घेतले. शांत संयम आणि सेवाभाव असे नेतृत्व तालुक्याला आणि जिल्ह्याला लाभले. मात्र अशी कोणती हवा होती की ज्यामुळे विधानसभेत हा अपघात झाला. नक्कीच विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील जनतेकडून चूक झाली असल्याचे … Read more

बाळासाहेब नाहाटांवर पुण्यात गुन्हा ! सरकारी योजनेच्या नावाने कोट्यवधींची फसवणूक…अजित पवार नाहाटा यांच्यावर इतके मेहेरबान का?

Ahilyanagar News : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे पदाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीणकुमार नाहाटा आणि गजनिया शेल्टर्स कंपनीचे संचालक अजय चौधरी यांच्यावर एका सॉफ्टवेअर अभियंत्याची २ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत ११ जणांना फसवल्याचे समोर आले असून, एकूण फसवणुकीची रक्कम ९ कोटी … Read more

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार ! ह्या वेबसाईट्स आताच सेव्ह करून ठेवा

Maharashtra HSC Result 2025 : बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12वी) परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बारावीचा निकाल उद्या, ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. बोर्डाच्या पत्रकार परिषदेत अधिकृतपणे निकालाची घोषणा … Read more

संगमनेर तालुक्याच्या संरक्षणाचे आमदारकीचे कवच जनतेने घालविले : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर : एकही दिवस विश्रांती न घेता सातत्याने चाळीस वर्ष काम केले. दुष्काळग्रस्तांसाठी धरण व कालवे पूर्ण केले. आपला तालुका, विविध सहकारी संस्था यांना आमदारकीचे संरक्षणाचे कवच होते. जाती धर्माच्या नावाखाली खोट्या भुलथापांमुळे हे कवच जनतेने घालवले असून तालुक्याचे हक्काचे पाणी मिळवण्याबरोबर तालुका जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी … Read more

अरुण काका जगताप : नगरच्या राजकारणाचा आधारवड कोसळला ! जाणून घ्या अरुणकाका जगताप यांचा प्रेरणादायी प्रवास !

Arun Kaka Jagtap passes away : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व, विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे आज, शुक्रवारी, दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने अहमदनगरच्या राजकारणातील एक पर्व संपले आहे. राजकारण, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा – या साऱ्या क्षेत्रांत आपल्या … Read more

अरुणकाका जगताप यांना काय झालं होत ? तब्बल एक महिना दिली होती मृत्यूशी झुंज…

Arun Kaka Jagtap passes away : अहिल्यानगर शहराचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप (वय ६७) यांचे आज, २ मे रोजी पहाटे पुण्यात निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने केवळ नगर जिल्हाच नव्हे, तर राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात … Read more

Arun Kaka Jagtap passes away : माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन; नगर जिल्ह्यात शोककळा

Arun Kaka Jagtap passes away : अहिल्यानगरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ नेते अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज, २ मे २०२५ रोजी दुःखद निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. नगर शहरात आणि परिसरात लोकप्रिय असलेले अरुणकाका यांचे समाजकारण व राजकारणातील योगदान … Read more

Content Writing Jobs : मराठी न्यूज वेबसाईटसाठी कन्टेन्ट रायटर्स हवे आहेत

तुम्हाला लेखनाची आवड आहे का ? मराठीमध्ये स्पष्ट, प्रभावी आणि आकर्षक भाषा वापरण्याची कला तुमच्याकडे आहे का ? तर ही तुमच्यासाठी संधी आहे पद : मराठी कन्टेन्ट रायटर ठिकाण: अहिल्यानगर / वर्क फ्रॉम होम कामाचा प्रकार: फ्रीलान्स / पार्ट-टाइम / फुल-टाइम कामाचे स्वरूप: चालू घडामोडींवर आधारित मराठीमध्ये बातम्या, लेख, ब्लॉग्स लिहिणे ट्रेंडिंग विषयांवर रिसर्च करून … Read more

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याने भारत संतापला! पाकिस्तानला धडा शिकवणारे ५ निर्णय

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सगळ्यांचंच धाबं दणाणलं. हा हल्ला इतका भयंकर होता की, सगळा देश हादरून गेला. पर्यटकांचं ठिकाण असलेल्या पहलगामसारख्या शांत जागी असा हल्ला होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. या हल्ल्यामुळे भारत सरकारने चांगलंच खडबडून जागं होत पाकिस्तानवर कडक कारवाईचा निर्णय घेतला. सरकारने एकदम पाच मोठे निर्णय घेतले, … Read more