आश्वी बुद्रुकमध्ये बिबट्याचा थरार – चिकन शॉपपर्यंत पोहोचला शिकारीच्या शोधात!

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या असून, विशेष म्हणजे तो थेट चिकन शॉपपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी इरिगेशन बंगला रोडवरील अरुण गायकवाड यांच्या शेळीला बिबट्याने आपले भक्ष्य बनवले. मात्र, त्यानंतर सोमवारी पहाटे बिबट्याने तौफिक … Read more

देहरे गावातील लैंगिक अत्याचार प्रकरण : ‘त्या’ दोन नराधमांना पुण्यातुन अटक

अहिल्यानगर तालुक्यातील देहरे येथे इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी तन्वीर शफीक शेख आणि त्याचा साथीदार सोहेल रियाज शेख यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे प्रभावी कारवाई केली. ही घटना १४ मार्च २०२५ रोजी घडली … Read more

कंटेनरच्या भीषण अपघातात टोलनाका भूईसपाट छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील घटना

अहिल्यानगर : छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील जेऊर शिवारातील बंद पडलेले टोल गेट वारंवार अपघाताला निमंत्रण देत असल्याने ते हटविण्याची मागणी नागरिकांमधून होत होती परंतु संबंधितांकडून या मागणीकडे कायमच दुर्लक्ष झाले त्यामुळे बंद असलेल्या टोल गेटला धडकून अनेक अपघात घडत होते गुरुवारी मध्यरात्री कंटेनरच्या झालेल्या अपघातात टोल गेट भुईसपट झाले आहे. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले … Read more

Ahilyanagar News : धक्कादायक! अहिल्यानगरच्या ‘या’ देवस्थानच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात?

मागील काही दिवसांपासून वक्फ बोर्ड अन वक्फ बोर्डाच्या बेकायदेशीर नोंदणी राज्यभरात चर्चेच्या विषय ठरत आहेत. परंतु आता अहिल्यानगरमधील अनेक ठिकाणच्या देवस्थानाच्या जमिनींची वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीर नोंदणी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संगमनेर नगरपालिका हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी असणारे तसेच संगमेर तालुक्यातील सुकेवाडी, घुलेवाडी, पारेगाव या देवस्थानाच्या जमिनींची वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीर नोंदणी झाली असल्याची माहिती … Read more

Breaking ! उन्हाच्या झळांमुळे शाळांची वेळ बदलली, आता सकाळी किती वाजता ?

वाढत्या उन्हाच्या झळा लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. जिल्हा परिषदेसह सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आता सकाळच्या सत्रात भरतील, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. हा निर्णय २० मार्च २०२५ पासून लागू होत असून, उन्हाळी सुटी लागेपर्यंत म्हणजेच १ मेपर्यंत शाळा सकाळी ७ ते दुपारी १२:३० या वेळेत चालतील. या संदर्भातील आदेश … Read more

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपातील आर्थिक ‘देवाणघेवाण’ चव्हाट्यावर ; पैसे घेऊनच कामे? आ. संग्राम जगतापांमुळे..

अहिल्यानगर महानगरपालिका ही नेहमीच विविध गोष्टींनी चर्चेत राहते. आयुक्त जावळे यांच्या लाचप्रकरणामुळे तर मनपा राज्यात गाजली. दरम्यान महानगरपालिकेतील काही विभाग हे पैशांशिवाय काम करत नाहीत असा आरोप अनेकदा सर्वसामान्य करत असतात. परंतु आता हा मुद्दा थेट विधिमंडळात समोर आणला गेलाय. आ. संग्राम जगतापांमुळे अनेक प्रश्नांना वाचा फुटणार आहे. त्याच झालं असं की, महापालिकेतील नगररचना विभागातील … Read more

Ahilyanagar News: गुडन्यूज ! अहिल्यानगर मनपात लवकरच भरती, आ. जगतापांनी विधिमंडळात केली मागणी

अहिल्यानगरमधील तरुणांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच मनपामध्ये भरतीप्रक्रिया सुरु होईल असे चित्र आहे. त्याच कारण असं की या भरती संदर्भात आ.संग्राम जगतापांनी थेट अधिवेशनात विधिमंडळात मागणी केली आहे. अधिक माहिती अशी : विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना आ. जगताप यांनी अहिल्यानगरमध्ये तातडीने टेक्निकल स्टाफची भरतीकरून अग्निशमन विभागाचेही आधुनिकीकरण करण्याची मागणी केली. शासनाने अहिल्यानगरच्या प्रलंबित समस्यांकडे गांभीर्याने पाहणे … Read more

दिशा सालियन हत्या अन आदित्य ठाकरे..; माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी आता स्पष्टच सांगितलं !

दिशा सालियन मृत्यू प्रकरण राज्यात गाजलं होत. दरम्यान या प्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव बऱ्याचदा आणण्याचा प्रयत्न झाला. नितेश राणे यांनी तर वारंवार त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आता दिशाचा सामूहिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा दावा करत पुन्हा चौकशी करावी अशी मागणी आता नव्याने दिशा यांच्या आई वडिलांनी केलीये. धक्कादायक म्हणजे, आदित्य ठाकरे … Read more

जलसंवर्धनाची कामे मोहिम स्तरावर करा- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर, दि.२०-  जिल्ह्यातील जलस्रोतांच्या पुनरूज्जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार तसेच जलयुक्त शिवार २.० या योजना जिल्ह्यात मोहिम स्तरावर राबविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना व जलयुक्त शिवार योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा … Read more

बँकांनी संवेदनशीलतेने कर्ज प्रकरणे मंजूर करावीत- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर, दि. २०- शासनमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना कर्ज वाटपामध्ये प्राधान्य देत बँकांनी संवेदनशीलतेने अधिकाधीक कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी रिझर्व बँकेचे प्रतिनिधी राजेंद्र कनीशेट्टी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक … Read more

रात्रीच्या वेळी अहिल्यानगरमधील ‘या’ महामार्गावरून जाताय? सावधान ! होतेय ‘असे’ काही

सध्या माणूस किती सुरक्षित राहिलाय असा प्रश्न पडायला लागलाय. महिलांची सुरक्षितता तर ऐरणीवर आलेली आहेच. परंतु आता पुरुषांनाही रात्रीच्या वेळी सावधरीत्या बाहेर पडावे लागणार असल्याचे चित्र आहे. याचे कारण असे की रात्रीच्या वेळी महामार्गावर लूटमार करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. नुकतीच रात्रीच्या वेळी वाहनचालकाला रस्त्यात अडवून मारहाण करत लुटल्याची घटना नगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) … Read more

एसएमबीटीत एकाच दिवसात दोन क्लिष्ट तावी शस्रक्रिया यशस्वी ! जगप्रसिद्ध कार्डीओलॉजिस्ट प्रा. यान कोवाच यांच्याकडून तासाभरात दोन शस्रक्रिया पूर्ण

नाशिक : हृदय आजारामुळे श्वसनाच्या त्रासाने अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या दोन रुग्णांवर एसएमबीटी हॉस्पिटलच्या हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये क्लिष्ट तावी शस्रक्रिया यशस्वी करण्यात आली. जगप्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट प्रा. यान कोवाच यांच्या उपस्थितीत या दोन्ही शस्रक्रिया झाल्या. एका तावी शस्रक्रियेसाठी किमान दीड तासांचा कालावधी लागतो मात्र, एसएमबीटीच्या अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये अनुभवी आणि कुशल वैद्यकीय टीमच्या सहकार्याने दोन्ही शस्रक्रिया अवघ्या … Read more

नगर-पुणे रेल्वेमार्गासाठी टास्कफोर्स हवा खा. नीलेश लंके यांचे रेल्वे बोर्डाच्या चेअरमनला साकडे वाढत्या औद्योगिकरणाची पार्श्वभूमी

अहिल्यानगर : अहिल्यानगर ते पुणे दरम्यान झपाटयाने वाढत असलेल्या औद्योगिकरणाच्या पार्श्वभूमीवर नगर-पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीशकुमार यांच्याकडे आग्रह धरला. दरम्यान, औद्योगीकरण म्हणजे विकास असे सांगत सतीशकुमार यांनी या मार्गासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही खा. लंके यांना दिली.  चेअरमन सतीशकुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान खासदार नीलेश लंके यांनी सुपा औद्योगिक … Read more

जल-जीवनच्या कामांची चौकशी करा खासदार नीलेश लंके यांची संसदेत मागणी योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात आदिवासी, दलित वस्ती भागातही जल जीवन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजना पुर्ण झालेल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या स्वप्नपुर्ती योजनेसाठी केंद्र सरकारच्या जल जीवन योजनेच्या संचालक पदाच्या अधिकाऱ्यांच्या केंद्रीय समितीमार्फत चौकशी करून सबंधित भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, संबंधित ठेकेदारास काळया यादीत टाकावे अशी आग्रही … Read more

Ahilyanagar Breaking : आता गोतस्करी अन गोवंश हत्या करणाऱ्यांविरोधात ‘मकोका’ लागणार ! आ. जगतापांच्या मागणीस मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंजुरी

गोरक्षक व गोसेवकांसाठी अत्यंत आनंदाची अन महत्वाची बातमी हाती आली आहे. आता यापुढे गो-तस्करी आणि गोवंश हत्या करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे. गोतस्करी आणि गोवंश हत्या करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आ. संग्राम जगताप हे आग्रही होते. त्यांनीच ही मागणी केली होती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकोका अंतर्गत कारवाईला विधानसभेत मंजुरी … Read more

Ahilyanagr News : नगर-पाथर्डी रोडवर भीषण अपघात ! एक ठार, एक जखमी

अहिल्यानगरमधून अपघाताचे एक वृत्त हाती आले आहे. वेगात आलेल्या किया कंपनीच्या कारने दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेली वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात नगर-पाथर्डी रोडवर झाला. आधी माहिती अशी : नगर तालुक्यातील कौडगाव शिवारात १९ मार्चला सकाळी ८.३० च्या सुमारस हा अपघात झाला आहे. या अपघातात … Read more

एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून युपीएससीच्या धर्तीवर होणार

मुंबई, दि. १९ : सन २०२५ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्यात येईल. तसेच या स्पर्धा परीक्षांचे आणि मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसार त्या घेतल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य शिवाजीराव गर्जे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी यासंदर्भात … Read more

संगमनेर ब्रेकिंग : छत्रपती शिवाजी महाराज यांची कमान कोसळल्याने राज्यात संतापाची लाट !

फक्त राजकीय उद्देश ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणारे संगमनेरचे शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी व महायुतीचे समर्थक कार्यकर्ते यांच्या गलथान कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांची उभारलेली स्वागत कमान कोसळली असून यामुळे महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाला असल्याने राज्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून आयोजकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी शिवप्रेमी व विविध … Read more