MLA Amol Khatal : निराधार योजनेअंतर्गत ६ कोटी रुपये वर्ग,शासनाच्या योजनेचा लाभ घ्या – आ. खताळ

२ जानेवारी २०२५ संगमनेर : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर, या तीन महिन्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना, सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत १८ हजार २७४ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ५ कोटी ९६ लाख ६५ हजार ९०० रुपये काल बुधवारी (दि. … Read more

स्थानिकांच्या जाचामुळे आईसह चार बहिणींची हत्या ! युवकाचे कृत्य, व्हिडिओतून मांडली व्यथा

२ जानेवारी २०२५ : उत्तर प्रदेशातील लखनौ शहर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका भयंकर हत्याकांडाने हादरले. स्थानिकांच्या त्रासाला कंटाळून युवकाने आपली आई व चार बहिणींची एका हॉटेलच्या खोलीत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. स्थानिकांनी आपले घर आणि भूखंड हिसकावून घेतल्याने कुटुंबाला संपविण्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नव्हता, असा दावा या २४ वर्षीय आरोपीने व्हिडिओतून केला. त्याने … Read more

पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर वाढले ! एका लिटरसाठी मोजावे लागतात इतके पैसे…

२ जानेवारी २०२५: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५६ पैसे आणि हायस्पीड डिझेलच्या दरात प्रतिलिटर २.९६ रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या पाकमधील जनतेला पेट्रोलसाठी प्रतिलिटर २५२.६६ रुपये आणि हाय-स्पीड डिझेलसाठी प्रतिलिटर २५८.३४ रुपये मोजावे लागणार … Read more

आता आमदार मिलिंद नार्वेकर यांचा नंबर ! लवकरच ठाकरे गट सोडणार ?

२ जानेवारी २०२५ मुंबई: शिवसेना पक्षात फूट पाडून मूळ शिवसेनेवर दावा केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेला सुरंग काही थांबता थांबत नसून रोज नवनवी नावे समोर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपयश आले.त्यानंतर पक्षातील मरगळ झटकून टाकण्यासाठी खांदेपालट करण्याच्या हालचाली ‘मातोश्री’तून सुरू झाल्या आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नार्वेकर यांच्या भूमिकेबाबत काय निर्णय येणार, … Read more

सांधे प्रत्यारोपण : सर्जरीबद्दल असलेले गैरसमज, साइड इफेक्ट्स…

सांधे प्रत्यारोपण सर्जरी आजच्या काळातील एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी उपचार आहे. याबद्दलच्या गैरसमजांमुळे रुग्ण योग्य वेळी उपचार घेण्यास टाळतात. तसेच रोबोटिक सर्जरी या तंत्रज्ञानामुळे सर्जरीची अचूकता आणि सुरक्षा वाढली आहे. योग्य सल्ला घेऊन, योग्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सांधे प्रत्यारोपण सर्जरी रुग्णासाठी एक जीवनभराचा आराम देऊ शकते. सांधेदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आणि … Read more

नवीन वर्षात कर्ज स्वस्त होणार कि नाही ? आर्थिक वाढीला वेग मिळणार ?

जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भारताला भौगोलिक आव्हानांना सामोरे जावे लागेल, महागाई नियंत्रित करावी लागेल, त्याचबरोबर खाजगी क्षेत्राला त्याचा खर्च वाढवण्यासाठी चालना द्यावी लागेल. कारण, सप्टेंबरच्या तिमाहीत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था मंदीला मागे टाकत असून नवीन वर्षात आणखी चांगली सकारात्मक कामगिरी करण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. २०२४-२५ वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी (जुलै-सप्टेंबर) उच्च-वारंवारता … Read more

देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींकडून नववर्षाची भेट ! पीक विमा योजनांना आणि खतांच्या किमती…

२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार दोन पीक विमा योजनांचा अजून एका वर्षासाठी विस्तार करण्यात आला आहे. तसेच डीएपी खतांची ५० किलोची पिशवी १,३५० रुपये दराने शेतकऱ्यांना मिळावी यासाठी ३,८५० कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मंजुरी दिली. प्रमुख … Read more

मुलीला मदत केल्याच्या संशयावरून बाप-लेकाने कोयता आणि कुऱ्हाडीने मुंडके छाटले; हाती घेत पोलीस ठाणे गाठले…

२ जानेवारी २०२५ : घरातून पळून जाण्यासाठी मुलीला मदत केल्याच्या संशयावरून बाप-लेकाने कोयता आणि कुऱ्हाडीने एकाचे शिर छाटले.त्यानंतर हे तुटलेले मुंडके घेऊन दोघांनीही थेट पोलीस चौकी गाठली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (१ जानेवारी) ननाशी (ता. दिंडोरी) येथे घडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गावात तणावाचे वातावरण असून, तेथे एसआरपीच्या तुकड्या व पेठ, दिंडोरी, बाहे, … Read more

सातारा जिल्ह्यात नवीन महाबळेश्वर तयार होणार कि नाही ? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

२ जानेवारी २०२५ मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अर्थात एमएसआरडीसीने १० ऑक्टोबर रोजी एक अधिसूचना जारी करून नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन प्रकल्पाच्या डीडीपीसाठी नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. या सूचना व हरकतींना ९०० जणांनी प्रतिसाद दिला असून त्यात १० टक्के प्रतिसादकर्त्यांनी आक्षेप नोंदवला आहे, तर याव्यतिरिक्त इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून विकसित करण्यात … Read more

बिग ब्रेकिंग ! प्रजासत्ताक दिनाची शाळांची सुट्टी रद्द ! शाळेत दिवसभर…

२ जानेवारी २०२५ : राज्यासह संपूर्ण देशात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना सकाळी झेंडावंदन केल्यानंतर सार्वजनिक सुट्टी दिली जाते. मात्र, यापुढे ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती … Read more

भारतासाठी २०२४ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ; जानेवारीत असे असेल हवामान…

२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : २०२४ हे भारतासाठी १९०१ सालापासूनचे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. गतवर्षात सरासरी किमान तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा ०.९० अंश सेल्सिअस अधिक होते.यापूर्वी २०१६ हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष होते. भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी बुधवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार २०२४ वर्षात संपूर्ण भारतात वार्षिक सरासरी भू पृष्ठभाग … Read more

तिसरी मुंबई आता लवकरच ! मुंबईचा कायापालट… मेट्रोसह २०२५ मध्ये काय होणार ?

१ जानेवारी २०२५ मुंबई: बुधवारपासून सुरू झालेल्या नवीन वर्षात अनेक क्षेत्रात बदल होणार असतानाच पायाभूत सुविधांच्या विकासाची गाडीसुद्धा या नव्या वर्षात सुसाट सुटणार आहे.यातील सर्वात मोठा व महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उल्लेख होणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पालाही या वर्षात गती येणार असून प्रत्यक्ष जमिनी अधिग्रहणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यातच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने सत्रू केलेली अनेक … Read more

Gold Price 2025 Prediction : ९० हजार रुपयांपर्यंत जाणार सोने ! वाचा काय आहेत कारणे

Gold Price 2025 Prediction : सुरक्षित गुंतवणूक म्हणून नवीन वर्षात सोन्याची लकाकी वाढणार आहे. परिणामी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८५,००० रुपयांवर जाऊ शकतो. त्यातही भौगोलिक-राजकीय तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता कायम राहिल्यास देशांतर्गत सराफ बाजारातील किमती ९० हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर जाऊ शकतात. नाणेनिधी धोरणातील मवाळ भूमिका आणि मध्यवर्ती बँकांनी केलेली खरेदीही सोन्याच्या दरात वाढ … Read more

आरोग्य चांगले ठेवायचंय ? नवीन वर्षांत हृदयासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवाच…

१ जानेवारी २०२५ मुंबई : दरवर्षी, तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यासाठी प्रत्येकजण नवीन वर्षाचे संकल्प करण्यास उत्सुक असतात.कारण, बहुतेक लोकांना निरोगी जीवनशैली बाळगण्याची इच्छा असते; परंतु त्याकरता नेमके काय करावे किंवा कुठून सुरुवात करावी, याबाबत गोंधळल उडालेला असतो. हृदयाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या महत्त्वाच्या पैलूंपैकी एक आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. या नवीन … Read more

उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धोका ! ‘तो’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

१ जानेवारी २०२५ मुंबई : ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक’ असा दावा करणारे शिवसेनेचे (ठाकरे) माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला (ठाकरे) ‘जय महाराष्ट्र’ केल्याने साळवी पराभूत झाले. त्यामुळे त्यांनी पक्ष … Read more

मानवी अस्तित्व संपल्यावर पृथ्वीवर राज्य करणार हा समुद्रातील जीव

१ जानेवारी २०२५ : पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे जीव राहतात. मनुष्य हा पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान प्राणी मानला जातो. वैज्ञानिक नेहमीच असा दावा करतात की, कधी ना कधी पृथ्वीचा नाश होईल आणि पृथ्वीवरून मनुष्य प्राणी लुप्त होईल. अशात अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की, मनुष्य पृथ्वीवरून लुप्त झाल्यावर किंवा मनुष्याचे अस्तित्व संपल्यावर पृथ्वीवर कोण शक्तिशाली असेल किंवा … Read more

महाराष्ट्र हवामान : पुन्हा एकदा थंडीला सुरुवात ! पहा काय आहे तुमच्या जिल्ह्यातील तापमान…

१ जानेवारी २०२५ पुणे : राज्यात पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होत आहे.आकाश निरभ्र झाल्यामुळे विविध भागांत किमान तापमानात घट होत आहे. मंगळवारी राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे १३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, पुढील सहा दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असून, किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा … Read more

महाविनाशाला आमंत्रण ! बनतोय मानवजात नष्ट करेल असा जिवाणू…

१ जानेवारी २०२५ वॉशिंग्टन : प्रयोगशाळेत तयार करण्यात येत असलेल्या एका जिवाणूमुळे महाविनाशाला आमंत्रण मिळू शकते. ‘मिरर लाइफ’ (प्रतिबिंबात्मक जीव) म्हणवले जाणारे हे जिवाणू (मिरर बॅक्टेरिया) संपूर्ण मानवजात नष्ट करू शकतात, असा इशारा प्रमुख शास्त्रज्ञांनी दिला असून, यासंदर्भातील संशोधन तातडीने थांबवण्याचे आवाहन केले आहे. निसर्गात आढळणाऱ्या रेणूंच्या प्रतिबिंबात्मक आवृत्त्यांपासून बनवण्यात येत असलेले हे सेंद्रिय जीव … Read more